Marathi News LIVE Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन

Ganesh Chaturthi Festival 2024 LIVE Updates : आज गणेशोत्सव असून घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. यासंदर्भातील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊयात...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

मनोज जरांगे पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत. आज राज्यभरात गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील यांच्याही घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होत असतात. त्यानुसार जरांगे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून जरांगे यांनी गणपतीची आरती करत प्रार्थना केलीये.

Ravikant Tupakar: रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित

शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होत. आज चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. दरम्यान आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सरकारचा निरोप घेऊन प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी , पोलीस उपविभागीय अधिकारी तुकारांच्या भेटीसाठी पोहोचले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र रविकांत तुपकर यांना देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर व शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळांसोबत येत्या 11 सप्टेंबरला मंत्रालयात बैठक घेण्याचा आश्वासन देण्यात आल आहे आणि त्यामुळे रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरत स्थगित केलेलं आहे.

इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडले, 3939 क्युसेक्स वेगाने पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

मराठवाड्याच्या हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प असलेले ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने, आज सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत, ईसापुर धरणातून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आली असून 3939 क्यूसेक्स वेगाने या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे, दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी स्वतःसह शेतातील जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीत हिट अँड रन, कार चालकाने एकाला १० मीटरपर्यंत नेलं फरफटत

कनॉट प्लेसमध्ये एका कार चालकाने फुटपाथ राहणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिल्यानंतर त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कारने धडकल्यानंतर लेखराज (45) यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लेखराज फूटपाथवर राहत असायचे.

 Ganesh Festival 2024 : वनमंत्री मुनगंटीवार यांच्या घरी विराजमान झाले बाप्पा

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी आज बाप्पा विराजमान

गणरायाची विधिवत स्थापना करून मुनगंटीवार दांपत्याने गणरायाची पूजाआरती

अत्यंत घरगुती वातावरणात त्यांच्याकडे बाप्पा विराजमान

शाडूच्या मूर्तीला मुनगंटीवार स्वतः केसरी रंगाने सुशोभित करतात.

Gadchiroli : गडचिरोली जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती

जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून 10 सप्टेंबर रोजी भरण्यात येणार

दस्तऐवज तपासणी झालेल्या उमेदवारांना वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार .

उमेदवारांनी मूळ दस्ताऐवजांसह समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळवले आहे.

Deepika padukone :  दीपिका पदुकोन डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल

दीपिका पदुकोन डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल झाली आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. यामुळे चाहते आनंदात आहेत.

Akola Rain : अकोल्यात मुसळधार पाऊस, शेतकरी संकटात 

अकोल्यात आज मुसळधार पावसाने हजेरी

अचानक आलेल्या पावसामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ

अकोल्यात कालपासून पुढील चार दिवस पावसाचा इशारा

आज घरोघरी गणरायाचं आगमन होत असतानाच दुसरीकडं पुन्हा एकदा पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता

Nagpur Rain : बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी पावसाचं सरींनी स्वागत, नागपुरात अनेक भागात जोरदार पाऊस 

बाप्पाचं आगमनाच्या दिवशी पावसाचा सरींनी स्वागत

सततचा उकाडा जाणवत असताना पावसाच्या सरी

शहरातील अनके भगत जोरदार पाऊस

पावसानं यंदा अधून मधून वर्षाव करत सरासरी गाठली

पुढील चार दिवस हवामान विभागानं यलो अलर्ट पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अभिनेता सुनील शेट्टी यांनी घेतले लहरी यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शन

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते तसेच अभिनेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. स्वर्गीय बप्पी लहरी यांच्या जुहू येथील लहरी निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. बप्पी लहरी यांचे नातू रेगु वी यांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन केले यावेळी फिल्म इंडस्ट्री मधील अनेक कलाकार उपस्थित होते.

Nagpur Rain : नागपूरमध्ये बाप्पाचं आगमनाच्या दिवशी पावसाचा सरींनी स्वागत केलं

नागपूरमध्ये बाप्पाचं आगमनाच्या दिवशी पावसाचा सरींनी स्वागत केलंय. सततचा उकाडा जाणवत असतांना पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शहरातील अनके भागात जोरदार पाऊस पडलाय. पावसानं यंदा अधून मधून वर्षाव करत सरासरी गाठली आहे. पुढील चार दिवस हवामान विभागानं यलो अलर्ट पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

Nanded News : अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी उत्साहात गणरायाची स्थापना

राज्यभरात आज गणरायाच्या आगमनाची धामधूम पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सहकुटुंब विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी माजी आमदार अमित चव्हाण, कन्या श्रीजया आणि सुजया चव्हाण उपस्थित होत्या. जागतिक शांतता टिकून राहावी अशोक चव्हाण यांनी गणरायाकडे साकडे घातलं आहे.

Amaravati News : अमरावतीत अभिनेता शिव ठाकरेच्या घरी वाजत- गाजत गणपती बाप्पाचं आगमन 

मराठी बिग बॉस विजेता अभिनेता अमरावती येथील शिव ठाकरेच्या अमरावतीच्या घरी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन झालंय. यावेळी कमरेला ढोल बांधत शिव ठाकरेनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.

Buldhana News : पारंपारीक वाद्य लावून उत्सव साजरा करा ; बुलढाणा पोलीस विभागाचं आवाहन 

आज गणेश चतुर्थी, गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच पार्षभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती.. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांनी सूचना दिल्या यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायदेने डीजे वाजविण्यावर बंदी असल्याने कोणीही डीजे लावू नये.. 75 डेसिबल जरी ठरवून दिले असले तरी त्याचे पालन होत नाही त्यामुळे डीजेवर बंदी घालण्यात येत आहे.. पारंपारीक वाद्य लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे..

Mumbai News : कुर्ला पूर्व येथील एका इमारतीच्या मजल्यावर घरात आग

कुर्ला पूर्व येथील एका इमारतीच्या मजल्यावर घरात आग लागली. संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. घटनास्थळी मुंबई पोलीस अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सवेरा या रहिवासी इमारतीला भीषण आग लागली होती.

Vaijapur News : वैजापूरच्या धोंदलगावात पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 9200 मेगा वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 3 मेगा वॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित झालाय. त्यामुळे 1 हजार 753 शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार आहे. अवघ्या चार महिन्यात हा प्रकल्प उभारून कार्यान्वित करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांना भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबतच स्वस्तात वीज उपलब्ध होऊन उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होणार आहे.

Navi Mumbai : गणेशोत्सवनिमित्त फॅन्सी मोदक खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

नवी मुंबईत गणेशोत्सव निमित्त मोदक खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा गणपती बाप्पासाठी रंगीबेरंगी डेकोरेटीव्ह मोदक, फॅन्सी मोदक आणि विविध फ्लेवर्सचे मोदक बाजारात आले असून आकर्षक सजावलेले हे मोदक ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहेत. 400 रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत हे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Pune News : पुण्यात ड्रग्स आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पुण्यात ड्रग्स आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने कारवाई केलीय. समीर शरीफ शेख असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेख याच्याकडून २०२ ग्रॅम एम डी ड्रग्स आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलीय. त्याचा कुठल्या गँग शी संबंध आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

Kalyan News:  कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गणेश उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष!

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात गेलीस पंचवीस वर्षापासून गणेशाची स्थापना केली जात आहे हे वर्ष पोलीस ठाण्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पोलीस म्हटले की त्यांना बारा तास ड्युटी असते. काही वेळेस बारा तासापेक्षा जास्त ड्युटी करावी लागते. विशेष करून सण उत्सवाच्या काळात पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त द्यावा लागतो. आपल्या व्यस्त कामकाजातून बाजारपेठ पोलिसांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशाची आराधना सुरू ठेवली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या आशयाची प्रार्थना त्यांनी गणेश स्थापनेच्या वेळी केली आहे. दहा दिवसाच्या पुजार्चेनंतर अनंत चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या हस्ते दररोज गणेशाची करण्यात आली .

Ganeshotsav 2024: पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी श्रीगणेशाची स्थापना

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथिल घरी श्रीची स्थापना करण्यात आली.यावेळी संपुर्ण भुसे कुटूंबाने विविधवत पुजा करत मंगलमय वातावरणात दादा भुसे श्री गणेशाच्या आरतीत रंगले,यावेळी त्यांनी राज्यासह नाशिक जिल्ह्यातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या तर राज्यातील गोर गरीब जनता,कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला सुखी ठेव अशी प्रार्थना बाप्पाला साकडे घातले.

Dhule News: धुळ्यातील मानाचा खुनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे, पारंपारिक पद्धतीने या कुणी गणपतीची मिरवणूक ही टाळ मृदुंगाच्या गजरात दरवर्षीप्रमाणे करण्यात आली आहे, शहरातील जुन्या धुळ्यातील भोई गल्लीतील गणपती म्हणून प्रचलित असून, हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते,

या गणेश उत्सवाला मोठा पारंपारिक वारसा असून शहरातील मुख्य बाजारपेठातून या मिरवणुकीला सुरुवात झाली असून, पालखीतून या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आहे, पारंपारिक पद्धतीने वाद्याचा वापर मिरवणुकी केला जातो, कुठल्याही प्रकारचा गुलालाची उधळण न करता या ठिकाणी आलेल्या भक्तांना बुक्का लावण्याची परंपरा आहे, इंग्रज कालीन प्राचीन असा हा खुणी गणपती आहे.

Ganeshotsav 2024: गणपतीत पोलिसांना नाचण्यापासून मनाई, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई!

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काढले आदेश, गणेशोत्सवादरम्यान पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास सक्त कारवाईची दिली तंबी. गणेशोत्सवातील सुरक्षा आणि बंदोबस्त आढावा बैठकीत आयुक्तांनी दिली अधिकाऱ्यांना ताकीद.

Uddhav Thackeray Visit Lalbagcha Raja: उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी

संपूर्ण देशभरात आज पासून गणेश उत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे सामान्य नागरिकांपासून राजकारणी तसेच अभिनेत्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. शिवसेना ठाकरेगट प्रमुख आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Amravati News: अमरावतीत  २ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली इमारत कोसळली.

ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली असल्याची माहिती

घटनास्थळी परतवाडा पोलीस व जिल्हा आपत्ती पथक दाखल

इमारत झाली होती आधीच कोलअँप्स..

Pandharpur News:  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गणेश‌ मूर्तीची प्रतिष्ठापना

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परंपरेप्रमाणे आज गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर पंढरपुरातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली. विठ्ठल मंदिरातही विठ्ठलाचा आणि वारकऱ्यांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. दहा दिवस बसणाऱ्या विठ्ठल मंदिरातील पारंपारिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Latur News: लातूरच्या अहमदपूर येथे भोंदूगिरी करणाऱ्या भामट्यांना गावकऱ्यांनी दिला चोप

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील चिखली गावात बोंदगिरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे... शनी दूर करून घरातील गुप्तधन काढून देतो म्हणत पूजा घरात पूजा पाठ करताना ग्रामस्थांनी पोलिसांना बोलवून चांगलाच चोप दिला आहे.. तर तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.,मात्र दोघेजण फरार झाले आहेत....

Kolhapur News: काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन

माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचं स्वागत करत पारंपारिक पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना केली. या वेळी संपूर्ण पाटील कुटुंबीय गणेश आगमन सोहळ्यात सहभागी झाले हो

Nashik News:  लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी चक्क ५६ भोग थाळी,  किंमत  २१०० रुपये

नाशिकमध्ये लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी चक्क ५६ भोग थाळी तयार करण्यात आल्या आहेत. बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, मावा मोदक यासह ५६ वेगवेगळ्या मिठाईंची ५६ भोग थाळी तयार करण्यात आली आहे. नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई या मिठाई व्यावसायिकांनी यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा खास नैवेद्य तयार केला आहे. या ५६ भोग थाळीची किंमत २१०० रुपये आहे.

Maharashtra Ganeshotsav: मावळातील भात शेतकऱ्यांचा गणेशोत्सव साजरा, भाताच्या बांध्यावरून श्री गणेशाचं  आगमन

पवन मावळ भागात ह्या वर्षी भातपीक जोमात आल्याने शेतकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यातच आता आपल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन झाल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याने शेतकऱ्यांनी भातशेतीच्या बांधावरून गणरायाची वाजतगाजत मिरवणूक काढत गणरायची स्थापना केली. शेतकरी आता पूर्ण दहा दिवस हा उत्सव जल्लोषात साजरा करतात. मावळच्या शिळिंब गावातील शेतकऱ्यांनी गणरायाची वाजत गाजत भातशेतीच्या बांधावरून मिरवणूक काढत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली...

Pune News : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ; स्वागत सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाचा आहे. तुळशीबाग मंडळाकडून यंदा ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिर साकारण्यात आलंय. धार्मिक आणि पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ यंदा १२४ ढोल ताशा पथकासह स्वागत सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहे. तुळशीबाग मंडळाची मूर्ती १४ फूट आहे.

Beed News : बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला दिलासा; मांजरा धरण 71.66 टक्के भरले 

बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा देणारी बातमी बीडमधून आहे. या 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे, बीडच्या केज तालुक्यातील धनेगावचे मांजरा धरण, आता 71.66 टक्के जिवंत पाणीसाठ्याने भरले आहे. यामुळे या तीन जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटणार असल्याने, आता बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे..

Pune Ganpati Festival: मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात

तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. केळकर रस्त्यावरील मंदार लॉड्ज चौकातून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीला सुरुवात झाली असून पारंपरिक नगारा वादन, ढोल पथक आणि केशव शंख पथक सहभागी झाले आहेत. दुपारी १२:३० वाजता स्वानंद निवास गणेश प्रसादात अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापणा होणार आहे.

Ahmednagar News: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गणरायाची स्थापना

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाच विधिवत पूजन करत स्थापना केली.. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना गणेश स्थापनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहे.. दरवर्षी निवासस्थानी गणेश पूजा न करता कारखाना कार्यस्थळावरच विखे परिवार गणेशाची स्थापना करतात.. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासह पत्नी शालिनी विखे यावेळी उपस्थित होत्या.. तर यावर्षी तीन वर्षीय नातू अभिमन्यू ( सुजय विखे यांचा मुलगा ) देखील गणेश स्थापनेच्या पूजेत सहभागी झाला होता..

Beed News:  बीड जिल्ह्यात 6 लाखांवर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर, लाडक्या बहिणींना लाभही मिळाला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बीड जिल्ह्यातील 6 लाख 33 हजार महिलांनी आत्तापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 6 लाख 6 हजार अर्ज मंजूर झाले आहे. तर अनेक महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा झाले आहेत. काही महिलांचे आधार अपडेट झालेले नाही किंवा इतर कारणावरून योजनेस पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिना अखेरपर्यंत महिला आपले अर्ज सदरील योजनेसाठी दाखल करू शकतील.

Kolhapur News : गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून अंबाबाईचरणी 30 लाखांचे दागिने

गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि त्यांच्या पत्नी विजयादेवी यांनी गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाईच्या चरणी 30 लाख 11 हजार 17 रुपये किमतीचे दागिने अर्पण केले. यामध्ये 168.540 मिलिग्रॅमचा 13 लाख 76 हजार 750 रुपयांचा सोन्याचा दुपदरी साज आणि 200.590 मिलिग्रॅम चे 16 लाख 34 हजार 267 रुपयांचे सोन्याचे एक जोड तोडे असे सुवर्णदान केले आहे.

Pune News : पुण्यात कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

पुण्यात कसबा गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली असून रास्ता पेठेतून गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली आहे. मिरवणुकीत सनई चौघडा, बँड पथक, ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. मिरवणुकीनंतर अष्टविनायकापैकी एक श्री सिद्धटेक देवस्थानांच्या प्रतिलात्मक मंदिरात बाप्पा विराजमान होणार आहे. सकाळी ११:४५ वाजता कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती आणि विश्वस्थ अदृश्य कांड सिद्धरश्वर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

Bhandara News : सासरा ते मिरेगाव पुलावरील रस्त्याला दोन महिन्यातच पडलं भगदाड 

दोन महिन्यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सासरा ते मिरेगाव मार्गावरील नवीन पुलावरील रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यातच मोठं मोठे भगदाड पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्यातच पडलेल्या भगदाडमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भंडारा जिल्ह्याच्या सासरा ते मिरेगाव हे गाव घनदाट जंगलात वसलेले असून येथे हिंस्त्रप्राण्यांचा वावर आहे.नागरिकांना दळण वळणासाठी रस्ते पूल चांगले रहावे हे शासनाचे प्रयत्न असले तरी काही भ्रष्ट्राकंत्राटदारामुळे गुणवत्तेनुसार काम होत नाही त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे.

Ganeshotsav 2024 : राज्यभरात गणेश चतुर्थीचा उत्साह, बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या

गणेश चतुर्थीनिमित्त राज्यभरात उत्साह दिसून येतोय. बाप्पाच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहेत. घरगुती मूर्तींची स्थापना करण्यासाठी भाविक आता मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. गणेश मूर्तींची दुकाने सजली आहेत. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कुटुंबावरील अरिष्ट दूर कर, सर्वांना निर्विघ्न ठेव, अशा भावनांसह बाप्पा आज स्थापित केला जात आहे.

दगडुशेठ बाप्पाची सिंहरथातून मिरवणूक सुरु

दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक आता निघाली आहे. सिंहरथातून बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येत आहे. ब्रँड पथकाकडून वाजत गाजत ही मिरवणूक करण्यात येत आली. गणेशभक्तांनी मिरवणूकीसाठी प्रचंड गर्दी केली आहे.

रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडेंनीही फोन केला होता.मात्र, तुपकर आपल्या मागण्यांवर ठाम आहे. ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा दिला इशारा त्यांनी दिला आहे. तोंडी आश्वासनांना आम्ही शेतकरी कंटाळला. आता रिझल्ट द्या, तुपकरांची मुंडेकडे आग्रही मागणी.. सरकारला जर माझा जीव घ्यायचा असेल तर मी त्यासाठी तयार आहे. आज गणपती आगमन असल्याने शेतकरी आंदोलन करणार नाही.. मात्र उद्या राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील .तुपकर यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

पंढरपुरात गणेश मूर्तीचे मोफत वाटप

आज लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. या निमित्ताने पंढरपूर येथील अनिल सावंत यांच्या वतीने सुमारे एक हजार गणेश भक्तांना मोफत गणेश मूर्तीचे वाटप केले. यावर्षी गणेश मूर्तीच्या किंमतीमध्ये सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेश भक्तांची गरज ओळखून सावंत यांनी एक ते फूट उंचीच्या आकर्षक अशा गणेश मूर्तीचे वाटप केले. त्यांच्या या मोफत गणेश मूर्ती वाटप उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Pune Ganeshotsav : पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोरया-मोरयाच्या घोषणा

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर ढोल वादन सुरू असून काहीच वेळात मूर्ती मूळ मंदिरातून स्वागत मिरवणुकीसाठी बाहेर काढली जाणार आहे. बाप्पाचं रुप आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत. सध्या मंदिर परिसर हा मोरया-मोरयाच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.

Railway Accident : मध्यप्रदेश मधील जबलपूरमध्ये रेल्वेला अपघात

मध्यप्रदेश मधील जबलपूरमध्ये रेल्वेला अपघात झाला. सोमनाथ एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे.

Mumbai Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव काळात मुंबईत रात्री साडेबारापर्यंत धावणार मेट्रो

मुंबईकर आणि गणेश भक्तांसाठी मेट्रो प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी कामकाजाचे तास वाढवण्याची घोषणा मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना गणपती पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सात सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात मेट्रो ने रात्री उशिरापर्यंत आपल्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Ganesh Festival : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या

गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज झाले असून ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन केलं जातंय. शहरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहता मेट्रोही पुणेकरांच्या सेवेत हजर झाली आहे. पुणे मेट्रोच्या वेळा आणि फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. उत्सवाचे पहिले ३ दिवस पुणे मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत धावणार आहे. तर विसर्जनाच्या दिवशी मेट्रो दिवस आणि रात्रभर धावणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात महा मेट्रो प्रथमच सलग 40 तासांची धाव घेणार आहे.

Lalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी

जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात असून मयुरासनावर विराजमान झाला आहे.

आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. आज लालबागच्या राजाची पारंपारिक विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com