Maharashtra Live News Update: पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज आणि उद्या रद्द

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक २३ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Pune Railway: पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज आणि उद्या रद्द

पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज - उद्या रद्द.

पुणे रेल्वे विभागाच्या दौंड काष्टी स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नोंद इंटरलॉकिंगच्या कामाकरिता दोन दिवसांचा ब्लॉग घेण्यात आला आहे.

त्यामुळे 24 व 25 जानेवारीला धावणाऱ्या तब्बल 26 एक्सप्रेस तर बारा डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत.

तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

पुणे सोलापूर व पुणे भुसावळ मार्गावरील सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे..

Ratnagiri: रत्नागिरीत शिंदे सेनेत बंडखोरी

रत्नागिरीतल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात शिंदे शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.. पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील का ठेवलं हा आपल्यापुढे प्रश्न असून, फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही.. त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण असं असलं तरी जनमताचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं परशुराम कदम यांनी स्पष्ट केलं आहे.. 21 तारखेपासून मला अनेकांचे फोन आले, मी केलेल्या कार्याला अनेक जण पाठींबा देत असल्याचं देखील कदम यांनी म्हटलं आहे..

Pune: पुणे सायकल टूरमध्ये सायकल पट्टूंचा अपघात

पुणे सायकल टूर मध्ये दुपारी डेक्कन भागात सायकल पट्टूंचा अपघात…

अपघातनंतर सायकल पटूमध्येच वादावादी झाली…

काही सायकलपटू आणि पोलिसांनी हा वाद मिटवला आणि पुन्हा स्पर्धा सुरु झाली

दुपारी डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे

Raigad: रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण

रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी अंती जिल्हा परिषदेसाठी 361 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समितीसाठी 656 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Pune: डेटिंग अ‍ॅपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड

पुण्यात डेटिंग अ‍ॅपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड

डेटिंग अ‍ॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लूटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिल अकील शेख (वय १९, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय १८, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (वय २५, रा. अंजलीनगर, कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय १८, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवरआत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत.बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर मयताच्या पत्नीसह नातेवाईकानी ठिय्या केला. गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.सुसाईड नोटमध्ये जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासन हेतू पुरस्कार या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेत नाही. असा आरोप ही नातेवाईकांनी केला आहे.गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी ही करण्यात आली.

Shirur-केसनंदमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

पुणे केसनंद पंचायत समिती गटातुन कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय

केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातुन भाजपाची मोठी ताकद वाढलीय यापुर्वी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती मात्र कुशाल सातव केसनंद परिसरात भाजपात प्रवेश केल्याने मोठी ताकद वाढली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दोन कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरण

पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी शिरूर येथे एका गॅरेज चालक शादब रियाज यास दोन कोटी दहा लाख रुपयांचा १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन

(एमडी) सह पकडले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्स अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याने घेतले होते अशी प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. मात्र आता या प्रकरणात अनेक धकादायक खुलासे होत असून अहिल्यानगर पोलिसांनी हे एमडी ड्रग्स हे श्रीरामपूर येथे छापा टाकून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केले होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com