Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील आहिल्याबाई चौकात एक तरुण हातात कोयदा घेऊन फिरत असल्याचा सीसीटिव्हीत व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा तरुण व्यापारी वर्गात दहशत माजविण्यासाठी हे कृत्य करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने या व्हीडीओ च्या आधारे पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही वेळेनंतर तो पुन्हा तरुण पुन्हा याच परिसरात कोयता घेऊन आला. संतप्त नागरीकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची खड्ड्यांवरून केडीएमसी प्रशासनाला चपराक व्हिडिओ व्हायरल

कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांची स्तुती करावी तेवढी थोडी. कल्याण ऐतिहासिक नगरी तर डोंबिवली सांस्कृतिक नगरी अशी ओळख असले शहरे आता खड्यांनी जर जर असलेली नगरी अशी नवी ओळख कल्याण डोंबिवली या दोन शहरांची झाली आहे.गणपती देवींचेआगमन आणि विसर्जन दोन्ही खड्डेमय रस्त्यातूनच झाले आता दिवाळी हा मोठा सण जवळ येत आहे पण रस्त्याची हालत जैसे थे आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, जागरूक नागरिक हे आंदोलन करून थकले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील देवल क्लब इथल्या टेंबे सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. जिथे मी कामाची सुरुवात केली त्यात कर्मभूमीत माझा सर्वांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे.

व्यासपीठावर उपस्थित असलेले नेते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांना काही देणं घेणं नसतं..

जरांगेंच्या आंदोलनात चोरी करणारा परप्रांतीय चोराला अटक

मनोज जरांगेपाटलांचा मराठा आंदोलनाचा मोर्चा जात असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला आळेफाटा पोलीसांनी ५ लाखांचा मुद्देमालासह अटक केली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीवर आधीच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

शक्ती वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोलसमुद्रात न जाण्याच्या सुचना

अरबी समुद्रात घोंगावणार शक्ती वादळ कोकण किनारपट्टीला धडकणार असल्याची शक्यता आहे. यामुळे मोठा फटका बसणार नसलातरी ताशी 40 ते 60 किलो मिटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये त्याच बरोबर समुद्र किनारी राहणाऱ्या नगरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर मंत्री माणिकराव कोकाटे....

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Raju Shetty : १५ रूपये कपातीच्या निर्णयाचा निषेधार्थ आंदोलन करणार - राजू शेट्टी

१५ रूपये कपातीबाबत राज्यात सर्वत्र शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून राज्यभर उस पट्यात या निर्णयाची होळी करणार : राजू शेट्टी

उद्या दिनांक ५ ॲाक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथे या निर्णयाची होळी करून आंदोलनास सुरवात करणार.

Navi Mumbai : दिलीप खेडकर यांना मोठा धक्का

माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी संबंधित घडामोडीत आज दिलीप खेडेकर मोठा धक्का बसला आहे. बेलापूर टँकर क्लिनर अपहरणप्रकरणात आरोपी म्हणून नोंद असलेल्या दिलीप खेडकर यांनी आज थेट बेलापूर न्यायालयाची पायरी चढत स्वतःसाठी कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून जामीन अर्ज दाखल केलास होता परंतु बेलापूर कोर्टाने तो फेटाळला आहे.

Nashik : नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर

- नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर

- शहरातील सर्वच भागात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी कॉम्बिंग ऑपरेशन

- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

- सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

- शहरातील सर्वच रस्त्यांवर पोलिसांची स्टॉप अँड सर्च मोहीम

- तब्बल ५१६ टवाळखोरांवर पोलिसांनी केली कारवाई

- तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या २२ जणांवर देखील मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई

- पोलिसांच्या कारवाई दोघा संशयितांकडून गावठी पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस हस्तगत, दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Palghar : पालघरमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीसह काही भागातील घरांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली.

पालघरच्या ग्रामीण भागासह सरावली, जामशेत, बाडापोखरण या भागात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली असून नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाणार असल्याचा आश्वासन यावेळी गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आलं.

पालघर जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील नैसर्गिक नाले बुजवले असल्याने पूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचा निदर्शनास आल्यानंतर गणेश नाईक यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Maharashtra : अज्ञात आजारामुळे १० बाळांचा मृत्यू

अज्ञात आजारामुळे १० बाळांचा मृत्यू

आतापर्यंत १० संशयितांचा मृत्यू

मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात २० बाळांचा मृत्यू

Nandurbar : मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Sharad Pawar: कृषी धोरण जाहीर करा, शरद पवारांची सरकारकडे मागणी

Pune: पुण्यात पर्वती परिसरात फुटली पाईपलाइन

पुण्यात पर्वती परिसरात फुटली पाईपलाइन

पर्वती परिसरात महात्मा फुले वसाहत येथे बोअरचे काम सुरू असताना फुटली पाईपलाईन

गेल्या अर्ध्या तासांपासून फुटली पाईपलाईन

लाखो लिटर पाणी वाया

महापालिकेचे अधिकारी अजूनही घटनास्थळी नाहीत

मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर

Pandharpur: पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकरांना टोला

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्री गोरे व माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमिलनाची भाषा सुरू केली आहे. त्यावर आज मंत्री जयकुमार गोरे यांनी मनोमिलनाची आता वेळ निघून गेल्याच स्पष्ट करत त्यांची खिल्ली उडविली.

Pandharpur: भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच जयवंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती त्यानंतर आमदार पडळकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त करत त्यांचे कान टोचले होते त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील हा माझ्यासाठी विषय संपलेला आहे त्यांच्याविषयी मी आता काही बोलणार नाही, असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला आहे.

Sangli: ट्रकभर हळद गायब करून व्यापाऱ्याला ३७ लाखांचा गंडा

सांगलीला नेण्यासाठी ३० टन हळद दिली असता ट्रकमधील तब्बल ३७ लाख ८१ हजार रुपयांची हळद लंपास करून खोटी तक्रार दाखल करणाऱ्या ट्रक मालक आणि चालकावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोखंडी सावरगाव कळंब फाटा परिसरात घडली.

Nashik: खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास ठेकेदार अन् संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसुली

- रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भातील महत्त्वाची बातमी

- खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसुली

- मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यसरकारला आदेश

- खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जखमी अथवा मृतांच्या नातेवाईकांना भरपाईसाठी धोरण तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश

- रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं सिद्ध झाल्यास रस्त्याचा ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून भरपाई देण्याचे आदेश

- जखमी तसंच मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

- पीडितांच्या भरपाईसाठी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचा पुढाकार

- तक्रारी देण्यास नागरिकांनी पुढे यावं, ग्राहक पंचायत

Kalyan: कल्याणच्या 'भगवा तलाव'वर 'हिरवळीची कत्तल'!

कल्याणच्या 'भगवा तलाव'वर 'हिरवळीची कत्तल'!

​स्मार्ट सिटीत 'झाडं तोडा, स्टॉल जोडा'चा घाट:

अधिकृत फूड प्लाझा बंद, मात्र लोखंडी स्टॉल्ससाठी झाडांची कत्तल!..

​मॉर्निंग वॉकर्स संतापले; 'वॉर्म-अप'ची जागा बळकावली: "आम्ही फिरायचं कुठे?" कल्याणकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल.

​सुशोभीकरणाला 'घाणी'चा धोका: फूड स्टॉल्समुळे कचरा वाढणार, तलावाची शांतता नष्ट होण्याची नागरिकांना भीती.

बेकायदेशीर काम त्वरित थांबवून अधिकृत प्लाझा सुरू करा, अन्यथा आंदोलन करणार कल्याणकरांचा प्रशासनाला थेट इशारा!

Nashik: कळवण येथे आदिवासी आंदोलकांचा पोलिस स्थानकावर दगडफेक

नाशिकच्या कळवण पोलिस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा ग पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर समोर ठिय्या आंदोलन सुरु केले असता पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन झाला त्यातूनच आदिवासी बांधवानी थेट पोलिस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली.दगडफेकीत पोलिस कर्मचारी व पत्रकार जखमी तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे...

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीच आयोजन

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला ओबीसी नेत्यांचा विरोध

आजच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बैठकीला येण्यास दिला आहे नकार तर निमंत्रण नसल्याच कारण देत लक्ष्मण हाके यांची देखील बैठकीकडे पाठ

Dharashiv: ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण

शेतकरी कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू

शेतकरी अमोल जाधव,मंदागिनी बारकुल यांनी सुरू केले आहे आमरण उपोषण - उपोषणाला अनेक शेतकऱ्यांचा पाठिंबा

शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले रास्ता रोको आंदोलन तर दुसरीकडे उपोषणकर्ती महीला चढली थेट झाडावर

Girgaon: गिरगावात फूड स्टॉलला लागली मोठी आग

दक्षिण मुंबईतील गिरगावातील खाडिलकर रोड येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास एका फूड स्टॉलला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. गॅस सिलेंडरमुळे आग पसरली आणि संपूर्ण स्टॉल जळून खाक झाला.

सुदैवाने स्थानिक पोलिस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे सिलेंडरचा भीषण स्फोट होण्यापासून बचाव झाला.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Amit Shah: अमित शहांच्या स्वागतासाठी अहिल्यानगर जिल्हा सज्ज

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आज रात्रीच ते शिर्डी मुक्कामी येणार आहेत.. उद्या सकाळी साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार असून लोणी आणि कोपरगाव येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकार मधील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत..

रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार- अनिल परब

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळचे सहकारी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत याच आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार जी रक्कम त्यातून येईल ती दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू

रामदास कदम आणि दसरा मेळाव्यात नीचपणा केला

याचे उत्तर देण्याचे गरज वाटत नव्हती

भाडगे करणाऱ्यांना उत्तर देऊन त्यांची लायकी नाही

बाळासाहेबांच्या मृत्यवर प्रश्न उपस्थित केलाय म्हणून उत्तर देतो

बाळासाहेबांच्या मृत्यू झाला तेव्हा मी 24 तास तेथे उपलब्ध होतो

सर्व घटनेचा मी साक्षीदार आहे

बाळासाहेब गेल्यानंतर 14 वर्ष नंतर त्यांना कंट फुठला आहे

उद्धव ठाकरे नी त्यांना आमदार केलं

मुलाला आमदारकी दिली

रामदास कदम कुठल्या बाकड्यावर चुकले होते तो बाकडा मी शोधात आहे

Nandurbar: नंदुरबारमध्ये एका माथेफिरूने ने केली पेट्रोल पंपाची तोडफोड....

धनाजे गावातील प्रतीक्षा पेट्रोल पंपावर लोखंडी फावड्याने केली तोडफोड....

पेट्रोल पंपावरील तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद....

माथेफिरूचा विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

Satpuda: काठी संस्थांची अश्व स्पर्धा पाहण्यासाठी सातपुड्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी.....

सातपुड्यातील प्रसिद्ध काठी संस्थांची 800 वर्षांची परंपरा आजही कायम असून दरवर्षी काठी संस्थांच्या वतीने भव्य अश्व स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात अश्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता या अश्व स्पर्धेत 84 घोडेस्वारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेत राया पाडवी यांच्या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक मोलगीच्या कंजाई या गावातील चेतकने पटकावला.आहे चित्तथराक असणारा या अश्व स्पर्धेसाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात सह मोठ्या संख्येने पर्यटक जे ते सातपुड्यात दाखल झाले होते...

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता...

गौतमी पाटील वाहन अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग...

गौतमी पाटीलच्या अमली पदार्थ किंवा मध्य सेवन केले होते का याचा तपास सुरु...

त्यावेळी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले..

गौतमी पाटीलला 30 तारखेला जबाब देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी दिलीय....

CCTV footage पोलिसांनी मिळवले असून, त्याचा तपास सुरु केलाय...

सिंहगड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 2 टीम तपासकामी रवाना करण्यात आल्या आहेत...

संतोष उभे नावाचा चालक अपघात झाला तेव्हा वाहन चालवत होता अशी पोलिसांकडून माहिती दिली जातेय....

अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील वाहनात होती का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू....

Sillod: सिल्लोड तालुक्यात लंपी आजाराने घेतले जनावरांचे प्राण; लसीकरणाअभावी शेतकरी चिंतेत

सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात लंपी आजारामुळे तब्बल दहा जनावरे दगावली आहेत. याशिवाय तालुक्यातील अनेक गावांमध्येही हा आजार झपाट्याने फैलावत असून मोठ्या प्रमाणावर जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.

धानोरा गावासह तालुक्यातील कोणत्याही गावात अद्यापपर्यंत शासकीय लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली नाही, ही बाब विशेष धक्कादायक ठरत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, त्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे.

सिल्लोड तालुक्यात लंपी आजाराने घेतले जनावरांचे प्राण; लसीकरणाअभावी शेतकरी चिंतेत

सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात लंपी आजारामुळे तब्बल दहा जनावरे दगावली आहेत. याशिवाय तालुक्यातील अनेक गावांमध्येही हा आजार झपाट्याने फैलावत असून मोठ्या प्रमाणावर जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.

धानोरा गावासह तालुक्यातील कोणत्याही गावात अद्यापपर्यंत शासकीय लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली नाही, ही बाब विशेष धक्कादायक ठरत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, त्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे.

समाजसेवक राधाकृष्ण काकडे यांनी प्रशासनाकडे तात्काळ मागणी करताना सांगितले की,

"जर त्वरित लंपी आजाराचे लसीकरण हाती घेण्यात आले नाही, तर शेतकऱ्यांना अजून मोठ्या प्रमाणावर जनावरे गमवावी लागतील व त्यामुळे गंभीर आर्थिक संकट ओढवेल."

Maharashtra Live News Update : कृषिमंत्र्यांकडून 'त्या' बातमीची दखल, 7 ऑक्टोबरला बोलावली बैठक

अकोल्यात 'स्कायमेट वेदर स्टेशन'चा चुकीच्या अहवालामूळ 2 हजारांवर शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.. या संदर्भात बातमी साम टीव्हीनं दाखवली होती.. त्यानंतर आता कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी दाखल घेतली असून मंगळवारी अर्थातच 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. दुपारी अडीच वाजता ही बैठक पार पडणारेय. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या उमरा मंडळातील बाधित शेतकरी उपस्थित असणार आहे.

उमरा मंडळात 'स्कायमेट कंपनीने 'वेदर स्टेशन'अर्थात पाणी मापक यंत्र चुकीच्या ठिकाणी बसवल्यामूळ अतिवृष्टी आणि पावसाची नोंद घेण्यास असमर्थ ठरलं होत.. हे पाणी मापक यंत्र नाल्यात बसवल्यानं मोठा गोंधळ झाला आणि 2000 पेक्षा अधिक शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले.

रबाळे पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जातील पत्त्यावर पुन्हा नोटीस चिकटवली

बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराच्या बाहेर लावली नोटीस.

रबाळे अपहरण प्रकरणात मनोरेमा खेड़करला ३० सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला आहे.पण या अर्जात तिने “कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही” असा दावा करत,चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध दाखल झालेला ताजा गुन्हा पूर्णपणे लपवला आहे.

१४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी पुण्यात छापा टाकला असता,मनोरेमा खेड़करने पोलिसांना अडथळा आणल्याचा गंभीर आरोप आहे.या प्रकरणात ती मुख्य आरोपी असून सध्या फरार आहे.

दरम्यान पुणे व नवी मुंबई पोलिस तिचा शोध घेत आहेत.पोलिसांनी तिच्या जामीन अर्जातील पत्त्यावर नोटीस चिकटवली आहे.तरीसुद्धा ती अद्याप बेपत्ता आहे.

भाजप पदाधिकारी मेळावा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कंबर कसली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज भाजपचा महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर याठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या वतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल.

हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत,सरसकट कर्जमाफी,ओला दुष्काळ जाहीर करा, शिबदरा येथील गावकऱ्यांनी केली मागणी.

मागील दोन महिन्यापासून सतत अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस,उडीद, मूग, हळद,यसह इतर पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अशी मागणी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सिबदरा येथील गावकऱ्यांनी केली आहे.शेती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेली हेक्टरी 8500 अनुदानाची तुटपुंजी रक्कम घेण्यास सिबदरा येथील गावकऱ्यांनी नकार दिला असून या संदर्भात शीबदरा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन विरोध करण्यात आलाय.ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शासनाच्या वतीने हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर केले असून ही तुटपुंजी रक्कम आम्ही स्वीकारणार नाही, 85 रुपये गुंठा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे.त्यामुळे शासन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. अनुदान देऊ नका द्यायचे असेल तर 50 हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या, हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, पिक विम्याचे निकष बदला, सरसकट कर्जमाफी करा,अशा मागण्या सिबदरा येथील ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.

रामदास कदम कधीच भरोशाचा माणूस नव्हता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोन वेळेस विधानपरिषद दिली. पक्षातील नेत्यांचा विरोध असतानाही ठाकरेंनी त्यांना संधी दिली.
संजय राऊत

हिंगोलीच्या गुगुळ पिंपरी गावात भरला अनोखा उत्सव

हिंगोलीच्या गुगुळ पिंपरी गावात विजया दशमीच्या निमित्याने अनोखा उत्सव भरविण्यात येतो, शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी ,गणपती ,महादेव, श्रीकृष्ण, मारुती, गरुड आणि भवानी माता अशा या सहा देवांचे लाकडी मुखवटे तयार करत सजावट करून चांदीचे टोप परिधान करण्यात येतात या मुखवट्याना भरजरी वस्त्र परिधान करून सजावट करत आगळावेगळा देखावा या ठिकाणी साजरा केला जातोय, पंधरा दिवस आधी तयारी करत

विजयादशमीनंतर एकादशीला या देवांची गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात येते.

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, बेदम मारहाणीत डॉक्टर रक्तबबाळं !

जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना भादली गावातील फटाका फुटून जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान घडली. रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचवले. नातेवाईक रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णालयात गेले. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता,गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.तर दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी,सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन, मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

भर रस्त्यात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

- भर रस्त्यात पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

- पतीकडून पत्नीला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल

- पती धीरज पवार वर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई

- पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या रागातून पत्नीला मारहाण केल्याची पतीची कबुली

- पंचवटी पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवरून शोध घेऊन पती धीरज पवारला घेतलं ताब्यात

nashik-yeola-अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापा-याचा मृत्यू

-नाशिकच्या येवल्यातून जाणा-या मनमाड-नगर महामार्गावर वाहनांची अवजड वाहनांची ट्राफीक वाढली असून येथिल विंचूर चौफुली वर वारंवार अपघात घडत असून काल रात्रीच्या सुमारास या मार्गावरुन दूचाकीवरुन जात असलेले व्यापारी पिंटू आहेर यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.वारंवार होणा-या अपघातां मुळे नारिकांनी रोष व्यक्त केला आहे.

अग्निशमन दलाने तीन तास शोधूनही सापडला नाही, अंधारानंतर शोध मोहीम थांबवली

मित्राच्या घरच्या देवीचे विसर्जनासाठी गेलेला १९ वर्षीय तरुण गिरणा नदीपात्रात पाय घसरून वाहून गेला. ही घटना घडली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तीन तास शोधून घेऊन देखील तरुण सापडला नाही.खोटे नगर परिसरातील दादावाडी मंदिराच्या मागे असलेल्या मयुरेश्वर कॉलनी रहिवासी व पाळधी येथील जिल्हा बँक शाखेतील कर्मचारी कविता संतोष पाटील या हिमेश व हितेश पाटील या जुळ्या मुलासह राहतात. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता त्यांचा मोठा मुलगा हिमेश उर्फ राम संतोष पाटील १९) हा कॉलनीतील तीन-चार मित्रासोबत गिरणा नदीवर देवीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. नदीपात्रात उतरून हिमेशने देवीचे विसर्जन केले. त्यानंतर त्याचा पाय घसरला. त्याला स्वीमिंग येत असल्याने त्याने पोहण्याचा प्रयत्न केला; परंतु मागून जोरात पाण्याचा लोढे येत असल्याने काही अंतर गेल्यावर त्याचा दम सुटला व तो पाण्याबरोबर वाहत गेला. हिमेश वाहून गेल्याचे लक्षात येताच आयुष महाजन या तरुणाने माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे बचाव पथक

घटनास्थळी दाखल झालेला शोध कार्य सुरू केले मात्र त्यांना कुठल्याही प्रयत्नाल यश आलेला नाही

मुहूर्तावर सोने खरेदी ७० कोटींवर दसऱ्याला लाखावर भाव, तरीही खरेदीला ग्राहकांचा उत्साह

जळगाव, विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. यामुळे यादिवशी सोने खरेदी शुभमानली जाते. जळगावसह जिल्ह्यात विजयादशमीला सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅमला १ लाख १७ हजार २०० रुपये (विना जीएसटी) तर चांदीचा भाव प्रती किलो १ लाख ४७हजार ५०० रूपये (विना जीएसटी) होता. सोने खरेदीत सुमारे ७० ते ७५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा

मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना इशारा

मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे प्रशासना कडून स्पष्ट इशारा

तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्‍यता

मुख्य म्हणजे पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

Ambegoan;:- यात्रेच्या मिरवणूकीत पुजा-याने ओढल्या 12 बैलगाड्या

यात्रेनिमित्ताने भंडाराची उधळण करत धनगरी ओव्या गाऊन भक्तांच्या श्रद्धेचा माहोल रंगवला. यावेळी पुजारी गणपत मंचरे यांनी ७७ व्या वर्षी कमरेला बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने मानाच्या १२ बैलगाड्या ओढून दाखवल्या. हा थरारक व पारंपरिक खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती

MUMBAI | सोमवारपासून परतीच्या सरी

गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज आहे.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या व अंदाजानुसार, मध्य भारत महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

RATNAGIRI : - रत्नागिरीत पडलेल्या पावासामुळे भातशेतीचं नुकसान झालय

रत्नागिरी -  रत्नागिरीत पडलेल्या पावासामुळे भातशेतीचं नुकसान झालय

पोमेंडी खुर्द गावातील नदीकाठी असलेल्या भातशेतीचं नुकसान

कापणीस योग्य झालेली भातशेती झाली आडवी

 गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत अधूनमधून पावसाच्या सरी 

पडणारा  पाऊस शेतीसाठी ठरतोय अडचणीचा 

हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावण्याची बळीराजाला भिती

DHARASHIV : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी निवडणूकीची वाट न पाहता तातडीने कर्जमाफी करावी

मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपुर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते माञ या कर्जमाफीसाठी निवडणूकीची वाट न पाहता कर्जमाफी करावी हीच योग्य वेळ आहे अस आवाहन हभप सतीश महाराज कदम यांनी मुख्यमंत्र्याना केलय.धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व पुर परिस्थिती मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अशात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी व हेक्टरी ७० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी भुम च्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी पुञ याच्या वतीने हभप सतीश महाराज कदम यांनी आमरण उपोषण सुरू केल आहेत.जो पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होत नाही आणि जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहे तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा हभप सतीश महाराज कदम यांनी दिलाय.

आंबेडकरांची मोदींवर टीका जहरी टीका... तर मोदी विश्वगुरू नव्हे तर चपराशी असल्याचा टोला

मोदीला टाटा बाय-बाय करा, अन देश वाचवा.. 

सिंदूरमध्ये एकही देश आपल्या बाजूने उभा नव्हता.. आज मोदी इगो जपण्यासाठी आज देशाला बळी देतोय...सनातनो 'देश महत्वाचा की इगो' हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्त्वाचा असेल तर या 'इगोला' टाटा बाय-बाय करा : प्रकाश आंबेडकर.

Maharashtra Live News Update : पुणे उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

दुपारी १२ वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्तालाप 

१ वाजता अजित नागरी पतसंस्था महिला मेळावा 

२ वाजता शिवसेना शाखा प्रमुख व पदाधिकारी बैठक अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती

३.४५ वाजता कात्रज चौक शिवसेना शाखा येथे स्वागत 

४.३० वाजता श्रीकांत ठाकरे संगीत स्टूडियो उद्घाटन.

गुजर - निंबाळकरवाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com