

पोलिसांच्या तपासानंतर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले
सात वाजेच्या दरम्यान महालक्ष्मी मंदिर परिसरात संशयित बॅग आढळल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर बॉम्बशोधक पथक अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्या तासाच्या आत बॅगेचा तपास करून मंदिर सुरू
पुण्यात सोमवारी महाविकास आघाडी मधील पक्षाची पहिली बैठक सोमवारी होणार
पुण्यातील काँग्रेस भवन येथे पहिली बैठक सोमवारी सकाळी १० वाजता होणार.
पुणे महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर हालचालींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली माहिती.
पाण्याच्या शोधात गेलेला बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याचे शेतकऱ्यांना आले आढळून
बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल
वनविभागाच्या वतीने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत आहे रेस्क्यू ऑपरेशन
गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला देऊन देखील वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप
बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी केली गर्दी
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून परिवर्त बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित १३ वे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात नाशिकच्या येवल्यात झाली असून यावेळी शहरातील मुक्तीभूमी येथून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली. संविधान मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीत साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन सुरु झाले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक,साहित्य संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत फर्ग्युसन महाविद्यालय मैदान येथे सुरू आहे.
धुळ्यात बिबट्याच्या वावरासंदर्भात खोडसाळपणा करणाऱ्यांमुळे वनाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची
पुण्यातील काळेपडळ परीसरात काल रात्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला होता आयोजित
मात्र याचवेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने उडाला गोंधळ
वाहतूक पोलीस आणि इंदुरीकर महाराजांमध्ये झाली बाचाबाची
पडघा-बोरिवलीत ईडीने छापेमारी केली. ईडीच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात आज युवा प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आंदोलनांचा भडका उडाल्याचं चित्र दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्जदार वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर 40 कोटींची जमीन 5 कोटींना परस्पर विकल्याचा आरोप केला आहे.. घोडके यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या संचालकांसह सात जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. यासह कर्जदार संजय मोरे, ओमप्रकाश खके आणि वसंत घोडके यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांनी समता पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे..
जालन्यात दोन दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ह.भ.प. जगद्गुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. साहित्य संमेलनानिमित्त परिसंवाद, अभंगवाणी, टॉक शो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार असून साहित्यप्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
मुख्यमंत्री युवाकार्य व प्रशिक्षण योजनेअंतर्गत हजारो युवक आणि युवतींचा नागपूर अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी यशवंत स्टेडियम मध्येच अडवला....
11 महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच ठिकाणी रोजगार देऊ अशी ग्वाही सरकारने कडून देण्यात आली होती परंतु त्या आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने तरुण आक्रमक झाले आहे...
नऊ तारखेपासून या तरुणांच आंदोलन सुरू आहे परंतु कुठलीही दखल न घेतल्याने आज तरुण मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहे...
आंदोलकांना विधानसभेवर जाण्याआधीच यशवंत स्टेडियम वरच आंदोलकांना अडवल्यामुळे आंदोलन आक्रमक
नागपुरात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी यावेळी रोखला. विधानभवनाकडे जाणारा मार्ग पोलिसांना रोखला.
जिमलगट्टा - रसपल्लीबिट न. 2 येतील शेतकऱ्यांचे दिनांक 9 तारखेला जंगलात चरा साठी बकऱ्याची कडप गेला असता त्या दिवशी कडपातून काही बकरे गायब झाले, दुसऱ्या दिवशी गुराखी तसेच बकऱ्यांचे मालक जंगलात शोध घेतला असता कम्पर्टमेन्ट नंबर 344 मध्ये पहाडीवर एकूण 31 बकरे मृता अवस्थेत दिसून आले. वाघानी बकऱ्या वर हल्ला केलेला दिसून आला. एकूण रसपली येतील एकूण 46 बकरे वाघाच्या हल्यात ठार झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाघाच्या दहशत्ती मुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखर कारखानदारी बाबत राज्याचे मुख्यमंत्री ब्लॅकमेलरच्या भूमिकेत..
साखर कारखानदारीत काटामारी होते हे मुख्यमंत्र्यांना मान्य
माजी खासदार राजू शेट्टी यांचा हल्लाबोल
ऊस दरवाढीसाठी पंढरपुरात होणारे शेतकऱ्यांचे उपोषण थांबले..
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व पुरवठा विभागातील लाचखोर अधिकारी गजानन अशोकराव देशमुख वय 36 वर्ष याला 16000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल आहे.
ईव्हीएम मध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा आरोप मारीत करीत स्टाँग रूम परिसरात जामर बसवावा या मागणीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व काँग्रेस उमेदवारांनी नगर पालिकेच्या प्रवेशद्वाराखाली उपोषण सुरू केले आहे. जामर बसविण्याची वारंवार मागणी करून प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीर यांच्यासह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांचा छापा
तीन कारागीरांसह स्थानिक एक जण असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात
सावरी गावामध्ये एका शेडमध्ये एमडी ड्रग्स बनवत असल्याची प्राथमिक माहिती...
याआधी मुंबई येथे मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवत असल्याची मिळाली होती माहिती
हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडून आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा विधानभवनाकडे मार्गस्थ असून काँग्रेस नेते बंटी शेळके या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत काँग्रेसने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनाद्वारे सत्य बाहेर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी सायंकाळी तब्बल दोन तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. विनोदेनगर चौकातील एका खासगी शाळेने दोन ते तीन वेळा रस्ता अडवून पालकांची वाहने सोडली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
या अर्जावर आज सुनावणी झाली. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांवर खून आणि मकोका कायद्यानंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी ३१ डिसेंबर २०२४ पासून आरोपीवाल्मिक कराड अटकेत आहे.
याप्रकरणात जामिन मिळावा, यासाठी कराड याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती सुशिल एम. घोडेस्वार यांच्या न्यायालयात ही याचिका आज सुनावणी आली.
० कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने माणगावमध्ये लांबच लांब रांगा
० माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या पर्यंत वाहनांच्या रांगा
० शनिवार - रविवार विकएन्डच्या सुट्टीमुळे मुंबईकर निघाले कोकणात
चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये ‘अण्णा’ नावाचा हत्ती आढळून आला असून, कलीवडे परिसरात अचानक हत्ती समोर आल्याने ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे. सध्या हा हत्ती पार्ले भागात असल्याची माहिती असून, वन विभागाकडून हत्तीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी पंढरपुरात ऊस संघर्ष समितीचे उपोषण सुरू आहे. ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर दाखल झाले आहेत.
मागील सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे यांचे वाखरी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे.
आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढू लागला आहे.
जालन्यातील बदनापूर पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या 23 जनावरांची सुटका केली आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजारात पोलिसांनी धाड टाकून कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेण्यात येणाऱ्या 23 जनावरांची सुटका केलीय.या प्रकरणी जालना येथील पाच संशयित आरोपींविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनापूरचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गेवराई बाजार भागात काही व्यापारी मोठ्या प्रमाणावर जनावरे जमा करत आहेत. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी गेवराई बाजारात धाड टाकून कत्तलीसाठी जाणाऱ्या 23 जनावरांची सुटका केली आहे...
उद्या दोन्ही पक्षाची एकत्र "अनौपचारिक" बैठक
पुणे शहर शिवसेना भवन येथे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांचा एकत्रित "चहापान"
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि मनसे चे मुख्य पदाधिकारी यांचा एकत्रित "चहापान"
पुणे पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता
* दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल, कालपासून ६०० झाडं नाशिकमध्ये पोहचली
* नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू
* मखमलाबादच्या भोईर मळा परिसरात झाडांसाठी खड्डे खोदण्याचं काम सुरू
* तब्बल 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार
* 15 फुटांपेक्षा उंच देशी झाडं नाशकात दाखल
* वड,पिंपळ, निंब, यासह देशी झाडं दखल..
* गिरीश महाजन आणि सामाजिक संस्था, संघटनांच्या उपस्थितीत सोमवारी होणार वृक्ष लागवड कार्यक्रम
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू झालीय. गेल्या ४ दिवसात २००० इच्छुकांनी अर्ज घेतले असून आजपासून भाजप कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. पुणे भाजप चे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महानगर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्याकडे आज इच्छुक उमेदवार मुलाखती देत आहेत. हे सगळी नावं भाजप शहर कडून प्रदेशाला पाठवले जातील आणि त्यानंतरच तिकीट वाटप होईल अशी माहिती यावेळी देण्यात येतील.
मालेगावच्या चोंडी घाटा जवळ दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक झाली ठप्प..
सुमारे 10 किमी पर्यत वाहनाची लागली रांग..वाहनधारकांसह इतर वाहना मध्ये अडकलेले प्रवासी झाले होते त्रस्त
घाटातील अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्यात यश
त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश..
वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनांच्या मात्र लांब रांगा
आज इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती
पुणे शहर भाजप कार्यालयात मोठी गर्दी
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. १२२ नगरसेवकांसाठी ३१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या आरक्षण सोडतीवर गंभीर आक्षेप घेत शिंदे शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.रवी पाटील यांचा दावा आहे की, प्रभाग क्रमांक ३, ५ आणि १५ मध्ये नियमबाह्य पद्धतीने आरक्षण लावण्यात आले आहे. काही प्रभागांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी अशी तिन्ही आरक्षणे एकाच वेळी टाकण्यात आली असून, ही प्रक्रिया जनसंख्येनुसार नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आमचा निवडणुकीला विरोध नाही, मात्र नगरविकास विभागाने काढलेल्या जीआरनुसार जी प्रक्रिया अपेक्षित होती, ती राबवली गेलेली नाही. समान संधीचा दावा करणारा निवडणूक आयोग एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पुरुष आणि महिला उमेदवारांवर अन्याय होत आहे.
सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या किंवा चक्क शिवीगाळ करून दहशत पसरवणाऱ्या रिल्स अपलोड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. पुण्यातील खडकी भागात २ तरुणांनी येरवडा जेल, दो भाई, दोनो तबाही, जिंदगी खराब करून टाकेल अशा प्रकारच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओ मधून गुन्हेगारी प्रवृत्त करणारे वाक्य असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओ बद्दल माहिती मिळताच खडकी पोलिसांना या तरुणांचा शोध घेण्याचं ठरवलं आणि अखेर ते दोघे सापडले. खडकी पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेतलं त्यांचं मुंडन करून त्यांना थेट कॅमेरा समोर माफी मागायला लावली. पुणे पोलिसांकडून सध्या अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे..
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याचे प्रमाण वाढले असून बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने ठीक ठिकाणी पिंजरे लावले आहेत मात्र बिबट्याची काही कमी नाहीत वन विभागाच्या पिंजऱ्या जवळ येऊन पुन्हा माघारी फिरणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ वन विभागाच्या ट्रँप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे...
पारनेर तालुक्यातील किन्ही येथील ढाकऱ्या तलाव परिसरात देखील वन विभागाने पिंजरा लावलेला आहे.या पिंजऱ्याच्या समोर येऊन बिबट्या पिंजऱ्यात न जाताच माघारी परतला असल्याचे दृष्य वन विभागाने लावलेल्या ट्रँप कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
गोलीत केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय अंतर्गत कापसाची खरेदी करण्यात येत आहे मात्र कापूस घेऊन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतातील कापूस वाहनात भरून सीसीआय खरेदी केंद्रावर दाखल झाले आहेत मात्र सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालकांकडून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच क्विंटल 20 किलो कापसाची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान आमच्या शेतात एक एकर कापूस शेतीमध्ये पाच क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन झाल्याने हा कापूस कुठे विक्री करावा असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकरी सरकारला विचारत आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी धुळ्यामध्ये 6.1° c तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तापमानामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी देखील भरली आहे,
गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट जाणवत असल्याचे दिसून येत आहे, सातत्याने तापमानामध्ये घट होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता धुळेकरांवर होताना दिसून येत आहे, सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना गरम व उदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे, पुढील काही दिवस तापमानामध्ये अशाच प्रकारे घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी काल सात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सात साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. निवडणुकीच्या घोषणेची ही पूर्वतयारी असून, सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल बाजणार, असेच स्पष्ट होत आहे. दरम्यान काल महापालिका अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणांची पाहणी केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या पाहणीनंतर ती ठिकाणे अंतिम केली जाणार आहेत. त्याचदिवशी अंतिम मतदारयादीही प्रसिद्ध केली जाईल.महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी आयोगाकडून तयारी सुरू केली आहे. त्यातून निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले होते. त्याप्रमाणे काल सात अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर सहाय्यक अधिकाऱ्यांमध्ये नायब तहसीलदार आणि निवासी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. चार सदस्यांच्या प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी असेल, तर पाच सदस्यीय आणि चार सदस्यांच्या एका प्रभागासाठी स्वतंत्र निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी असेल. प्रारूप मतदार यादीतील हरकतींवर निर्णय घेऊन सोमवारी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रे ही निश्चित करण्यात येणार आहेत.
नागपुरात संघाने आयोजित केलेल्या उद्याच्या बौद्धिकाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणीही उपस्थित राहणार नाही. संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची, आमदार अमोल मिटकरी यांची 'साम'शी बोलतांना प्रतिक्रिया. मागच्या वर्षीही संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुणीही राहिलं नव्हतं उपस्थित. यावेळी 'साम'शी बोलतांना अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू -फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा असल्याचे म्हटलं. संघाकडून उद्याच्या बौद्धिकचं महायुतीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना निमंत्रण. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार बौद्धिकाला उपस्थित राहण्याची शक्यता.
वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या १६ बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी या सर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
या निलंबित सदस्यांमध्ये जिल्हा चिटणीस करूणा कल्ले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष वैभव उलेमाले, सदस्य राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, वाशिम शहर उपाध्यक्ष संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, उत्तर आघाडी प्रकोष्ठाचे सावंतसिंग ठाकूर, 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' सेलचे प्रमुख सचिन पेंढारकर, महिला शहर उपाध्यक्ष अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांचा समावेश आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे.
भाईंदराच्या खारेगाव परिसरातील महिला शिवसैनिकांनी आमदार नरेंद्र यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. माजी नगरसेविका प्रीती पाटील यांच्या कामावर विश्वर ठेऊन शेकडो महिला कार्यकर्त्यांनी हा भाजपात प्रवेश केला आहे.
महानगरपालिकेची निवडणुका जवळ आल्याने मीरा भाईंदर शहरात राजकीय हालचालींनी घेत घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांचे पदाधिकारी पक्षांतराच्या उड्या मारताना दिसत आहेत. काही पदा साठी तर काही नगर सेवकाच्या तिकीट साठी जात असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात अवैध लॉटरी सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी खात्री करताच तेथे छापा मारत लॉटरी सेंटरच्या दोघा चालकांसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या क़डून रोख दोन लाख ७६ हजाराचा मुद्देमाल मिळाला असून पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
: लातूरच्या अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातल्या एका रूमला भीषण आग लागल्याची घटना घडली, या आगीत रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य जळून खाक झाले आहे, सुदैवाने या भीषण आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येतील, वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र ही आग नेमकी कशाने लागली याचा शोध सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांना अर्ज वाटप आज पासून सुरु झालं आहे.मनसेच्या शहर कार्यालयात अर्ज घेण्यासाठी गर्दी झालीय.आज मनसेच्या शहर अध्यक्षकाकडून इच्छुकांना अर्ज वाटप सुरु करण्यात आली आहे.
इच्छुक उमदेवारांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. शिवसेना आणि मनसे युती झाली तर आम्ही युतीमध्ये लढण्यासाठी तयार आहोत.
‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा- २०२५’ उत्तीर्ण परंतु व्याहवसायिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे २ हजार २०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काल वयाच्या 90 वर्षी अखेरचा श्वास घेतला, लातूरच्या देवघर येथील स्वघरी काल पहाटे त्यांचं निधन झालं, दरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज लातूरच्या वरवंटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, तर शिवराज पाटील चाकूरकर यांचे अंतदर्शन घेण्यासाठी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, राज्यसभाचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , शरदचंद्रजी पवार यांच्यासह इतर देशातील आणि राज्यातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
कुर्ला पूर्व येथील एसटी बस डेपोजवळील नाल्याजवळ एका पुरूषाचा मृतदेह आढळला. स्थानिकांनी अधिकाऱ्यांना माहिती देताच, अग्निशमन विभाग आणि कुर्ला पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिसराची सुरक्षा करण्यात आली आहे आणि अधिकारी मृतदेह तिथे कसा आला याची तपासणी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नगरपालिका कार्यालयातील EVM स्ट्रॉंग रूमला अभेद्य सुरक्षा कवच देण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास सीसीटीव्हीची नजर, सशस्त्र पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि डिटेक्टर मशीनद्वारे काटेकोर तपासणी अशी बहुअस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नाव नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध वातावरण दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य या मशीनमध्ये सुरक्षित मिळत आहे. 21 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची उलटी गणती सुरू झाली असून उमेदवारांची उत्सुकता आणि धाकधूक दोन्हीही वाढली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात थेट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्च्याचा आयोजन करण्यात आलं होतं
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अंदा गोंदी तसेच प्रशासनाकडून काम केली जात नाही येत चुकीच्या पद्धतीने कामांना मंजुरी देणे आणि ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी काम केली जातात तसेच नवी मुंबईमध्ये काही माजी नगरसेवकांना कोटी कोटी रुपये कामे दिले जातात काही प्रभागांमध्ये दिली जात नाही असा आरोप नामदेव भगत यांनी पालिका प्रशासनावर केला आहे
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरातील कमाल अन् किमान वातावरण कमी झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.