Majhi Ladki Bahin Yojana : कुणी शाल तर कुणी शेळी पालन व्यावसाय, महिलांनी १५०० रुपयांचं नेमकं काय केलं?

Majhi Ladki Bahin Yojana benefits : 'लाडकी बहीण'मुळे काही महिलांच्या आयुष्याला नवा 'अर्थ' मिळाला आहे. अनेक महिलांनी मिळालेल्या १५०० रुपयांमधून नवनवीन व्यवसाय सुरु केले आहेत.
'लाडकी बहीण'मुळे आयुष्याला मिळाला नवा 'अर्थ'; महिलांनी १५०० रुपयांचं नेमकं काय केलं? वाचा
Majhi Ladki Bahin Yojana Saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातील बहुतेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक महिलांना या योजनेचे दोन हप्ते मिळाले आहेत. या योजनेच्या दोन हप्त्यात त्यांना ३ हजार रुपये मिळाले आहेत. या तीन हजार रुपयांमधून काही महिलांनी व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबीयांचं जीवन सुकर झालं आहे. याच व्यावसायिक महिलांनी या लाडकी बहीण योजनेविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेमुळे उदनिर्वाहासाठी वस्तू विकत घेण्यास सक्षम झाल्याने अनेक महिलांचं जीवन सुकर झालं आहे.

योजनेच्या पैशांतून सुरू केला शिलाई व्यवसाय

अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील साकुरी येथील प्रतिभा धनंजय गोराने यांनी योजनेच्या हप्त्याचा सदुपयोग केला आहे. प्रतिभा यांचे पती रोजांदरीचे काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतात. प्रतिभा यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी मोठा हातभार लागला. आता त्यांनी स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरु केला आहे. या माध्यमातून त्यांचे उत्पन्न सुरू झाले. कुटुंबाच्या उदनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणासाठी प्रतिभा यांना या योजनेमुळे मोठा आधार मिळाल्याने त्यांचं जीवन सुकर झालंय.

'लाडकी बहीण'मुळे आयुष्याला मिळाला नवा 'अर्थ'; महिलांनी १५०० रुपयांचं नेमकं काय केलं? वाचा
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला होणार जमा

दोन हप्त्यातून सुरु केला शाल बनवण्याचा व्यवसाय

शिर्डीजवळ राहणाऱ्या निकिता अमोल आढाव यांनाही सरकारी योजनेमुळे लाखमोलाची मदत झाली आहे. पती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरची परिस्थिती तशी बेताचीच. निकिता यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर या पैशांतून काहीतरी व्यायासाय सुरू करण्याचा विचार त्यांनी केला. शिर्डीत वर्षाकाठी कोटी भाविक साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. अनेक भाविक परत जाताना सोबत साईबाबांच्या प्रसादासह विविध प्रकारच्या शाली देखील घेऊन जातात. त्यामुळे परिसरात शाल बसवण्याचा व्यवयास मोठ्या प्रमाणात चालतो.

निकिता यांनी योजनेच्या पैशांतून कच्चे मटेरियल खरेदी करून स्वतःचा शाल बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद देखील मिळू लागलाय. त्यामुळे कुटुंबीयांना हातभार तर लागलाच यासोबतच आपल्या दोन मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करता येईल, अशा भावना निकिता आढाव यांनी व्यक्त केल्यात.

पगारे कुटुंबीयांनी सुरु केला शेळी पालन व्यवसाय

राहाता तालुक्यातील रत्ना बाळासाहेब पगारे यांचं लाडकी बहीण योजनेमुळे मोठी मदत लाभली आहे. त्यांना आणि त्यांच्या दोन सूनांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालाय. पहिले दोन हप्ते एकत्र मिळाल्याने त्यांनी हे पैसे शेळी पालन व्यवसायात गुंतवलेत. या माध्यमातून पगारे कुटुंबाला मोठा आधार मिळालाय. आता दर महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये मिळणार असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा हातभार लागणार असल्याने रत्ना पगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत.

'लाडकी बहीण'मुळे आयुष्याला मिळाला नवा 'अर्थ'; महिलांनी १५०० रुपयांचं नेमकं काय केलं? वाचा
Ladki Bahin Yojana Fraud : 12 भावांचा 'लाडकी'च्या पैशांवर डल्ला! फोटो, आधारकार्ड महिलांचं, अर्ज मात्र पुरुषांचा

'लाडकी बहीण'मुळे योजनेमुळे श्वेता आणि तिच्या आईला मिळाला मोठा आधार

श्वेता सुनील सोनवणे सध्या कोपरगाव येथे उच्च शिक्षण घेत आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आईने मोठ्या संघर्षातून श्वेताचे पालनपोषण केलंय. आज श्वेता उच्च शिक्षण घेऊन आईसाठी काहीतरी करू इच्छिते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे श्वेता आणि तिच्या आईला मोठा आधार मिळालाय. या योजनेचे पैसे श्वेता आपल्या शिक्षणासाठी खर्च करत असून आईचा आर्थिक बोजा हलका झाल्याचे समाधान तिला मिळतंय. गरजू महिलांना सक्षम बनवणारी योजना आणल्याने श्वेता सोनवणे हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com