Ladki Bahin Yojana Fraud : 12 भावांचा 'लाडकी'च्या पैशांवर डल्ला! फोटो, आधारकार्ड महिलांचं, अर्ज मात्र पुरुषांचा
राज्यात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत रोज नवे नवे गैरव्यवहार समोर येत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अनेक भावांनी या योजनेत घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कन्नड तालुक्यातल्या 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्यानं खळबळ माजलीय. महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय.
एकीकडे या योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीमध्येच शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वाद रंगलाय. दरम्यान योजनेला खीळ बसावी यासाठी विरोधकांचा डाव असल्याची टीका आमदार संजय शिरसाटांनी केलीय.
यापूर्वी देखील सातारा आणि इतर ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आलं होतं. सुमारे दीड कोटी गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेत पारदर्शकता आणणं आणि गैरप्रकार रोखण्याचं मोठं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.