Ahmednagar News: चोर असल्याचे समजून परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून मारहाण, धक्कादायक VIDEO बघा!

Ahmednagar Young Man Beaten Video: चोरीच्या संशयावरून अहमदनगरमध्ये तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
Ahmednagar News: चोर असल्याचे समजून तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, ४ जणांना अटक; धक्कादायक VIDEO व्हायरल
Ahmednagar Young Man Beaten VideoSaam Tv

सुशील थोरात, अहमदगनर

अहमदनगरमध्ये (Ahmednagar) चोर असल्याचे समजून तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी करण्यासाठी घरात घुसल्याच्या संशयावरून परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अहमदनगर शहरातील सारसनगर भागात ही घटना घडली आहे.

तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ५ जणांविरोधत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.

अहमदनगरच्या नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरातील सारसनगर भागामध्ये चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय तरुणाला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून ही अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

Ahmednagar News: चोर असल्याचे समजून तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, ४ जणांना अटक; धक्कादायक VIDEO व्हायरल
Pune Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅक्टर- कारची समोरासमोर धडक; १ ठार, ३ जखमी

तरुणाला मारहाण केल्याची ही घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. राजू हिरा घोष असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. या तरुणाला चोरी असल्याचे समजून काही गावकऱ्यांनी झाडाला बांधून बेदम मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुण 'मारू नका' अशी विनवणी करत आहे तरी देखील तरुणाला काठीने बेदम मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये ५ जणांविरोधामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar News: चोर असल्याचे समजून तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, ४ जणांना अटक; धक्कादायक VIDEO व्हायरल
Ahmednagar News: साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पैसे थकवल्यानं कारवाई

किरण औसरकर, बाबासाहेब पुंड , विशाल इंगळे, ऋषिकेश जायभाय आणि ऋतिक पुंड यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर एकाचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मारहाण करण्यात आलेला तरुण राजू हिरा घोष हा चोर असल्याच्या संशयावरून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. सध्या राजूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ahmednagar News: चोर असल्याचे समजून तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, ४ जणांना अटक; धक्कादायक VIDEO व्हायरल
Zika Virus in Pune : सावधान! पुण्यात झिका व्हायरसची एण्ट्री; वारीच्या तोंडावर नागरिकांचं टेंशन वाढलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com