Ahmednagar News: ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर! राहुरीत वृद्ध, अपंग आणि गरोदर महिलांचे प्रचंड हाल

Rahuri Rural Hospital Issue: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्ध, अपंग आणि गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
Rahuri Rural Hospital Issue
Rahuri Rural Hospital IssueSaam Tv
Published On

सचिन बनसोडे

Rahuri Rural Hospital Issue

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. रूग्णालयाची जागा उपलब्ध असताना गेल्या आठ वर्षापासून तात्पुरत्या तीन मजली इमारतीत हे रूग्णालय सुरू आहे. येथील नागरीकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. (Latest Marathi News)

राहुरी शहरात सर्वसामान्य गोरगरीबांसाठी वरदान असलेलं ग्रामीण रूग्णालय (Rahuri Rural Hospital) आता मात्र शाप ठरताना दिसतंय. अनेक दशकं ज्या रूग्णालयात सहजतेने उपचार मिळत होते, ते रूग्णालय आता अखेरच्या घटका मोजत आहे. रूग्णालय मोडकळीस आल्याने सात वर्षापूर्वी प्रशासनाने नगरपालीकेच्या तात्पुरत्या जागेत स्थलांतर केलं आहे. मात्र तीन मजली असलेल्या या इमारतीत वृद्ध, अपंग आणि गरोदर महिलांना जिना चढून जाणं जिकरीचं बनलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न

नगर मनमाड महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळं अपघातांचं प्रमाण देखील जास्त आहे. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला मात्र इथे कोणतेही उपचार मिळत (Rahuri Rural Hospital Issue) नाही. रूग्णांना जिल्ह्याच्या मुख्यालयी रेफर केलं जातंय. गेल्या सात वर्षाचा विचार केला, तर वेळीच उपचार न मिळाल्याने दोनशेपेक्षा जास्त रूग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे.

गेल्या सात वर्षांपासून तातपुरत्या जागेत रूग्णालय सुरू आहेत. तीन मजली इमारतीत जाण्यास रूग्णांना मोठी कसरत करावी (Rural Hospital) लागत आहे. जिल्हा परिषदेने नविन इमारत बांधण्याची गरज आहे. वृद्ध अपंग आणि गरोदर महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Rahuri Rural Hospital Issue
BMC Hospital : मुंबईतील हॉस्पिटलमध्येही होणार वीजनिर्मिती; कसं ते जाणून घ्या?

नागरिकांचे प्रचंड हाल

खरंतर राहुरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जुन्या रूग्णालयाची जवळपास 25 गुंठे जागा उपलब्ध आहे. अनेकदा कोट्यावधीचा निधी येवून परत माघारी गेलाय. मात्र रूग्णालयात कोणत्याही सुधारणा केल्या जात (Ahmednagar News) नाहीत. नागरीकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लवकर नवीन रूग्णालय उभारले जावं, ही अपेक्षा नागरीक व्यक्त करत आहे.

जुनी इमारत मोडकळीस आल्याने स्थलांतर करण्यात आलंय. परंतु या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात (latest marathi news) नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

Rahuri Rural Hospital Issue
Maharashtra Hospital: राज्यातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा होणार कायापालट; धाराशिवमध्ये ५०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com