जुन्या वादातून तरुणाचं अपहरण, फ्लॅटमध्ये बेदम मारहाण, मृतदेह कारमध्ये नेऊन डोंगरात जाळला; महाराष्ट्र हादरला

Ahilyanagar Crime News : शनिवारी नगरमधून अपहरण करण्यात आलेल्याची घटना उघडकीस आली सुरवातीला या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. वैभव शिवाजी नायकोडी याचं २२ फेब्रुवारीला अपहरण झालं होतं.
Ahilyanagar youth kidnap beaten body burned mountains
Ahilyanagar youth kidnap beaten body burned mountains Saam Tv News
Published On

अहिल्यानगर : नगर शहरात एक अत्यंत भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका युवकाचं अपहरण करत त्याला डोंगरात जाळण्यात आलं आहे. अहिल्यानगर शहरात जुन्या भांडणातून एका युवकाचं भर दुपारी अपहरण करण्यात आलं. त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कारमधून डोंगरात जाळून तेथील हाडे आणि राखही फेकून देऊन पुरावा नष्ट केला. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

शनिवारी नगरमधून अपहरण करण्यात आलेल्याची घटना उघडकीस आली सुरवातीला या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. वैभव शिवाजी नायकोडी याचं २२ फेब्रुवारीला अपहरण झालं होतं. सुरवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारोतीराव पाटील, नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे या आरोपींना अटक केली.

Ahilyanagar youth kidnap beaten body burned mountains
Ahilyanagar Crime: सोशल मीडियावर ओळख, श्रीरामपूर येथे 17 वर्षीय मुलीला लॅाजवर नेऊन अत्याचार

आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, आम्ही आरोपीचं अपहरण केलं. मात्र तो आमच्या ताब्यातू पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा शोधाशोध सुरू केली. संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून विशाल दिपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, करण सुंदर शिंद, रोहित बापुसाहेब गोसावी आणि स्वप्नील रमाकांत पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांकडे हे भयानक कृत्य केल्याची कबुली दिली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेची अधिक माहिती दिली.

Ahilyanagar youth kidnap beaten body burned mountains
Ahilyanagar Crime: चेष्टा केल्यानं मित्रावर कात्रीने हल्ला, युवकाचा मृत्यू, घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com