Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Shirdi News : नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केला आहे. दरम्यान शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यात तब्बल ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाला आहे.

अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे जवळपास ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भूपेंद्र सावळे या ठगसेनाने नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केला आहे. दरम्यान शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे. 

Fraud Case
Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

गुंतवणूकदारांना तक्रार करण्यापासून रोखले 

फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. तर काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते. मात्र मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळेने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल; असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले. याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे.

Fraud Case
Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल 

तसेच शिर्डीत देखील या भूपेंद्र सावळे याने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे. शिर्डी आणि परिसरातील २१ गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २१ गुंतवणुकदारांची १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com