अहिल्यानगरमध्ये राडा, पोलिसांचा मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं? व्हिडिओ आला समोर

ahilyanagar rada News : अहिल्यानगरमधील कोटला गावात पोलिसांनी मुस्लीम आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मुस्लीम धर्मगुरुचे नाव रस्त्यावर लिहून समाजकंटकाने हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला. नगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
ahilyanagar kotla village rada
ahilyanagar kotla village rada
Published On

अहिल्यानगरमधी कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे नगरमधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपिला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरु होतं. अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

ahilyanagar kotla village rada
पराभवानंतर सलमान बिथरला, पाकिस्तानच्या कर्णधाराने रनरअपचा चेक फेकला अन्...

अहिल्यानगरमध्ये नेमकं काय झालं?

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला. नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं. कुणीही अफवांवर वर विश्वास ठेवणे पोलिसांनी आवाहन केले. तसेच हे कृत्य करणाऱ्या एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज आक्रमक झाला अन् रस्त्यावर उतरला. त्यांनी नगर- छत्रपती संभाजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मुस्लिम समाजाचे धर्मगुरूंचे नावाची विटंबना केल्या प्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झाला होता. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. नगर शहरात तणावपूर्ण शांतता.

ahilyanagar kotla village rada
IND vs PAK : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पोस्टने पाकिस्तानला मिर्ची लागली, संरक्षण मंत्री म्हणाले आम्ही ६/० ने पुढे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com