Shirdi : घरगुती वाद, पतीकडून पत्नीची हत्या; नंतर भिंतीवर मजकूर लिहून पतीनं आयुष्य संपवलं

Crime News : पत्नीसोबत वाद झाल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर पतीने गळफास घेत स्वत:चे आयुष्य देखील संपवले. घरात दोन मृतदेह आढळल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime Newsx
Published On
Summary
  1. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली.

  2. घटनेनंतर पती घरात मृत अवस्थेत आढळून आला असून भिंतीवर मजकूर लिहिला होता.

  3. या दुहेरी मृत्यूमुळे चासनळी गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

संजय बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shocking : अहिल्यानगरहून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. घराच दोघांचेही मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. ही घटना अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात सदर घटना घडली आहे. गावातील रहिवासी दिलीप शंकर मुजगुळे आणि त्यांची पत्नी स्वाती मुजगुळे या दांपत्याचे मृतदेह घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगावचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.

Crime News
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आणि स्वाती यांच्यामध्ये वाद झाला होता. भांडणाच्या रागात पती दिलीप याने स्वातीला मारहाण केली. त्यानंतर उशी वापरुन नाकतोंड दाबत स्वातीची हत्या केली. दिलीपने आपल्याला होणारा त्रास याबाबत घरातील भिंतीवर मजकूर लिहीला आणि गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवले.

Crime News
Crime : शाळेत गोळीबाराचा थरार! कानाखाली मारल्याचा राग, विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी

एका घरामध्ये दांपत्यांचे मृतदेह आढळल्याने चासनळी गावात खळबळ उडाली आहे. घरगुती भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत पतीने देखील आत्महत्या केली असे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोपरगाव तालुका पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

Crime News
POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com