Yavatmal News: अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक, यवतमाळच्या मुळावा येथील घटना

Ahilyabai Holkar Jayanti: यवतमाळमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञातांनी केली दगडफेक.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक, यवतमाळच्या मुळावा येथील घटना
Yavatmal NewsSaam Tv

संजय राठोड, साम टीव्ही, यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या दगडफेकीमध्ये जवळपास 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन जखमींना उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे. सध्या मुळावा येथील वातावरण तापलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक, यवतमाळच्या मुळावा येथील घटना
Lok Sabha Election: चमत्कार काँग्रेसला तारणार? निकालापूर्वी काँग्रेसचा अंतर्गत अहवाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीचा विश्वास

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावात मिरवणूक निघाली असताना अज्ञातांनी अंदाधुंद दगडफेक केल्याने मिरवणुकीतील 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले.

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक, यवतमाळच्या मुळावा येथील घटना
Mumbai News: जम्बो मेगाब्लॉकचा फटका! पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; मुलुंड ते भांडूपपर्यंत वाहनांच्या रांगा

या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने वातावरण तापलं आहे. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्यासहघटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com