क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता.. पण आता त्रास; कृषिमंत्र्यांचं वक्तव्य अन् लगेच सारवासारव

Bharane Controversial Statement: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादळ. "हा त्रास नाही, ही जबाबदारी आहे" असं भरणेंनी नंतर स्पष्टीकरण दिलं.
Bharane Controversial Statement
Bharane Controversial StatementSaam Tv News
Published On
Summary
  • कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादळ.

  • "हा त्रास नाही, ही जबाबदारी आहे" असं भरणेंनी नंतर स्पष्टीकरण दिलं.

  • शेतकरी कर्जमाफीसंदर्भात निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी सांगितलं.

  • विदर्भ, मराठवाडा दौऱ्याचा उल्लेख करत भाषणात भरणेंनी वक्तव्य केलं.

नुकतेच कृषीमंत्रिपदावर विराजमान झालेले दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 'क्रीडा व अल्पसंख्यांक खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता. पण आता त्रास घ्यावाच लागेल', असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. त्यांनी या वक्तव्यानंतर सारवासारव केली. 'आता हा त्रास नाही म्हणता येणार, जबाबदारी आहे', असं दत्तात्रय भरणे म्हणाले. भरणेंच्या वक्तव्यानंतर त्यांना कृषीमंत्री पदाचा त्रास होतोय का? त्यांना या पदाचा भार पेलवत नाहीये का? अशा प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधणे सुरू आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभात कृषीमंत्री भरणे उपस्थित होते. यावेळी भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. 'परवा मी विदर्भात होतो. मराठवाड्यात काल होतो. यामुळे थोडे धावपळ होते. क्रिडा - अल्पसंख्याक खातं बरं होतं. लय त्रास नव्हता. पण आता त्रास घ्यावाच लागेल', असं विधान कृषीमंत्री भरणे यांनी केले आहे.

Bharane Controversial Statement
'वसंतदादांचे सरकार मी पाडलं', शरद पवार जाहीर सभेत पहिल्यांदाच बोलले; नेमकं काय म्हणाले?

भरणेंनी कृषिमंत्रिपदावर केलेल्या वक्तव्यनंतर लगेच सारवासारव केली. 'खरंतर हा त्रास नाही, ही जबाबदारी आहे. आपल्यावर नेत्यांचा विश्वास आहे', असं भरणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. क्रिडा - अल्पसंख्याक खातं बरं होतं, लय त्रास नव्हता, याचा अर्थ आता कृषीमंत्रिपद पेलवत नाहीये का? कृषीमंत्री झाल्यावर खूप त्रास होत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

Bharane Controversial Statement
नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

शेतकरी कर्जमाफीवर दत्तात्रय भरणे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 'मी शेतकरी पुत्र आहे. माझा जन्म शेतकरी घरात झालेला आहे. सकाळी असो किंवा सायंकाळी मला सतत शेती दिसते. शेतकऱ्यांच्या अडचणी मला ठाऊक आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील', असं दत्तात्रय भरणे म्हणाले. धाराशिव येथील शेती नुकसान पाहणीदौरा केल्यानंतर कृषीमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.

Bharane Controversial Statement
पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com