कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा; शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरींचा आस्वाद

सत्तार यांचा साधेपणा सुद्धा बघायला मिळाला.
Abdul Sattar
Abdul SattarSaam TV
Published On

यवतमाळ : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या मराठवाड्यासह विदर्भ दौऱ्यावर आहेत. सत्तार हे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी करत, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी त्यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, आज यवतमाळकरांना सत्तार यांचा साधेपणा सुद्धा बघायला मिळाला. (Abdul Sattar News Today)

Abdul Sattar
Gulabrao Patil : आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत; गुलाबराव पाटलांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

नेमकं काय घडलं?

आज सकाळी ७ वाजेपासून यवतमाळ जिल्ह्याचा दौरा सुरू होता. दिवसभर त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सत्तार हे उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी शेतकरी भगिणीला सांगितले की, ताई अजून खूप गाव पाहणी करण्याचे बाकी आहेत. आम्ही अजून जेवण सुद्धा केले नाही.

यावर त्या शेतकरी माऊलीने आमच्याकडे जेवण आहे. पण साहेब आपल्याला आमच्या गरिबांकडचे जेवण चालेल का? असे विचारले. तेव्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या शेताच्या बांधावर बसून पिठलं-भाकर,कांदा,चटणी तसेच आंब्याच्या लोंचाचा आस्वाद घेतला. (Abdul Sattar Latest News)

Abdul Sattar
ठाकरे कुटुंबीयांना एकटं पडू देऊ नका, सांभाळून घ्या, आदित्य ठाकरे भावुक, म्हणाले...

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पाहून उपस्थित सर्वच जण अवाक् होऊन गेले. मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिला प्रसंग नसून ते दौऱ्यात असतांना सर्व सामान्य माणसाला मोठ्या आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात. यावेळी सुद्धा त्यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांना धीर दिला.

कोरोना संकटात जेष्ठ नागरिक व लहान मुलांना आपल्या हाताने मास्क घालून त्यांनी मास्कचे महत्व पटवून दिले. अनेक वेळा ते चहाच्या टपरीवर बाकावर बसून चहा घेतांना दिसतात. अशा एक ना अनेक प्रसंगातून मंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा पाहायला मिळातो.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com