मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेच्या चाव्या हाती घेत ठाकरे सरकारला विरोधी बाकावर बसवलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गट यांच्यात सुरु झालेला राजकीय संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा तमाम शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.
शिवसेनेला संपवण्याचं नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचे घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटं पडू देऊ नका. आम्हाला सांभाळून घ्या, असं भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात घेतलेल्या सभेत केलं आहे.
आदित्य ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले,स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते. मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली. जिथे आहेत तिथे आनंदाने राहा, मात्र थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणूक लढा, असा इशारा ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिला. 33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली.शिवसेनेसोबत यांनी उठाव केला, क्रांती केली असं हे सांगत आहेत.
पण यांनी केलेल्या गद्दारीला बंडखोर क्रांती म्हणत असून त्याची इतर देशांनी दखल घेतल्याचे सांगत आहे. मात्र, 33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली, असा घणाघात ठाकरे यांनी विरोधकांवर केला. आदित्य विरोधकांवर निशाणा साधताना पुढे म्हणाले, हे सरकार म्हणजे गद्दारांचं सरकार आहे. बेईमानांचं सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच.
मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला. बोटिमध्ये एके ४७ रायफल सापडल्या.मात्र या, चाळीस गद्दारांना त्याचं काही घेणं देणं नाही.स्वत:च्या स्वार्थासाठी हे सगळं केलं आहे. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, ते तात्पुरते मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.