सांगली: सांगलीत मदतीच्या मागणीसाठी पुरग्रस्तांनी चक्काजाम आंदोलन केले. सांगलीच्या पुरबधितांना अद्यापही मदत न मिळाल्याने तसेच अनेकांना तुटपुंजी मदत मिळाल्याने पुरग्रस्तांनी हे चक्काजाम आंदोलन केले. (agitation of flood victims in Sangli; demanded Urgent help)
हे देखील पहा -
पुरामध्ये झालेल्या नुकसाणीबाबत मदतीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी राज्य मार्ग रोखून धरला. सांगली-कोल्हापूर मार्गावर हा चक्काजाम करण्यात आला. यावेळी पूरग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भाजपा नेते शेखर इनामदार, पै. पृथ्वीराज पवार, धीरज सुर्यवंशी यांनी या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले. या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारत आपल्या मागण्या प्रशासनाला सांगितल्या.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.