ऐकलंत... फक्त वरळी मतदारसंघात 19 हजार 333 मतदारांबाबत घोळ असल्याचे पुरावेच आदित्य ठाकरेंनी उघड केलेत... त्यामुळे निवडणुक आयोग आणि सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलयं...मात्र ठाकरेसेनेचा हा निर्धार मेळावा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला बुस्टर देणारा ठरलाय. आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर कसे ताशेरे ओढलेत..
या सादरीकरणानंतर आदित्य ठाकरेंनी ठाकरेसेनेचं नेतृत्व आपल्या हाती घेण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय. खुद्द उद्धव ठाकरेंनीच आदित्य़ ठाकरेंना सादरीकरणासाठी पुढे केल्यानं ठाकरेसेना आदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट करत असल्याचं चित्र दिसलं. या सादरीकरणात आदित्य ठाकरेंनी कोणते मुद्दे उपस्थित केले
व्होट चोरीविरोधात आदित्य ठाकरेंचा 'गांधी पॅटर्न'
वरळीत 22 हजाराहून अधिक मतदारांची नावे बनावट
19333 मतदारांच्या माहितीमध्ये गडबड
मतदाराचे आडनाव वेगळे आणि त्याच्या वडिलांचे आडनाव वेगळे अशी 720 नावे
643 महिला मतदारांचे लिंग पुरुष म्हणून नोंदवलेले
मतदार आणि वडिलांचे नाव एकच असलेले 502 मतदार
एकाच EPIC क्रमांकाचे दोनवेळा नाव असलेले 133 मतदार
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी गांधी पॅटर्न राबवला असला तरी भाजपनं मात्र राहुल गांधींचाच दाखला देत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवलीय. तर ठाकरेसेनेनं मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय.
उद्धव ठाकरेंनंतर ठाकरेसेनेची धुरा अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरेंकडेच येणार आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट चोरी मुद्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसंत...त्यामुळे य़ा निवडणुकीत ठाकरेसेनेच्या कामगिरीक़डे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.