अकोल्यात साडे सात लाखाच्या ब्राऊन शुगरसह आरोपी अटकेत
अकोल्यात साडे सात लाखाच्या ब्राऊन शुगरसह आरोपी अटकेतजयेश गावंडे

अकोल्यात साडे सात लाखाच्या ब्राऊन शुगरसह आरोपी अटकेत

अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
Published on

अकोला - तब्बल साडे लाखांची ब्राऊन शुगर सह आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती वरून ही कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यात ब्राऊन शुगर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे. अकोल्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

हे देखील पहा -

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी अफजल खान करीम खान हा युवक ब्राऊन शुगर या अंमली पदार्थांसह आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी अर्धा किलो ब्राऊन शुगर ज्याची किंमत तब्बल साडे सात लाख रुपये आणि एक मोबाईल असा एकूण 7 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, गोपिलाल मावळे, गणेश पांडे यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com