Raigad News:मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बोरघाटात भीषण अपघात; खोल दरीत ट्रक कोसळून एकचा जागीच मृत्यू

मुंबई लेनवर खोपोली हद्दीत वाहनांच्या धडकेने दोन कंटेनर १०० फुट दरीत कोसळले गेले.
Raigad News
Raigad Newsसचिन कदम, रायगड
Published On: 

Raigad News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी बोरघाटात तीन ट्रकची समोरसमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की यातील दोन ट्रक १०० फूट दरीत कोसळल्या. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई लेनवर खोपोली हद्दीत वाहनांच्या धडकेने दोन कंटेनर १०० फुट दरीत कोसळले. यात दोन्ही कंटेनरचा चक्काचूर झाला आहे. घटना घडताच स्थानिक नारिक बचाव कार्यास धावून आलेत. तसेच महामार्ग वाहतूक पोलीस (Traffic Police), खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम घटनास्थळी मदत करीत आहे.

Raigad News
Mumbai News : सावधान! मुंबईत गोवरचा धोका वाढतोय; वडाळ्यात ५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता, की एक व्यक्ती जागीच ठार झाला. तसेच दरीत कोसळलेल्या कंटेनरमधील एक वाहन चालक गंभीर जखमी आहे. सध्या त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघात झालेल्या कंटेनरमध्ये कांदे आणि घरगुती भांड्यांची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचाही समावेश आहे.

Raigad News
Accident News: ऊसाच्या ट्रॉलीला धडकून‎ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू‎

या अपघातामुळे बोरघाट येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र आता अपघातग्रस्त वाहने (Vehicles) रस्त्याच्या कडेला घेऊन हळूहळू वाहतूक सुरळीत होत आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.