मध्यरात्री अपघाताचा थरार! २ भरधाव कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Two Women and Driver Die on the Spot: परभणी-वसमत मार्गावरील रहाटी परिसरात दोन कारची समोरासमोर धडक झाली. दोन महिला आणि एका चालकाचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी.
Two Women and Driver Die on the Spot
Two Women and Driver Die on the SpotSaam
Published On

परभणीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन भरधाव कारची समोरासमोर आल्याने धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या घटनेत दोन महिला आणि एका चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सध्या त्या व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघाताची घटना ६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परभणी- वसमत मार्गावरील रहाटी परिसरात दोन कारचा भीषण अपघात घडला. २ भरधाव कारची समोरासमोर धडक झाली. कारचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण धडकेत दोन महिलांसह एका कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

Two Women and Driver Die on the Spot
इंडिगोमुळे इतर विमान कंपन्यांची चांदी, तिकीटांचे दर गगनाला भिडले, ५ हजाराचे तिकीट ५० हजारांवर

हा अपघात परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने, ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. तसेच जखमी व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. सध्या जखमीवर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Two Women and Driver Die on the Spot
बीडकरांसाठी खूशखबर, बीड - वडवणीदरम्यान लवकरच रेल्वे धावणार; आज होणार इंजिन चाचणी

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. मृतांपैकी दोघेही वसमत तालुक्यातील आरळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर, एक पिंगळी (ता. परभणी) गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, वसमत तालुक्यातील आरळ गावातून ते एका रूग्णाला रात्री परभणीकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली.

जोरदार कारला धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com