CJPच्या सौरव दास आणि आशुतोष रांकांच्या अटकेनंतर दिपकेंनी कॅनॉट प्लेसवर तिरंगा मोर्चाची घोषणा केली...या आंदोलनाला दिल्लीत CJPच्या अनेक कार्यकर्त्यांनी हजेरीही लावली...मात्र ज्या अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात तिरंगा मोर्चा होणार होता... त्याचं दिपकेंना पोलिसांनी आंदोलनात सहभागी होण्याआधीच ताब्यात घेतलं...त्यामुळे दास-रांकांप्रमाणे दिपकेंनाही कोठडी सुनावली जाणार अशी भीती CJPच्या कार्यकर्त्यांमध्ये असतानाच दिपकेंना विशेष दंडाधिकारी न्यायालयानं मोठा दिलासा दिला...
अभिजित दिपकेंना अखेर सशर्त जामीन मंजूर झालाय...अटकेनंतर दिपकेंना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (SEM) हजर करण्यात येणार होतं...त्यामुळे सकाळपासूनच सर्व परिसरात पोलिसांचा कडेकडो बंदोबस्त पाहायला मिळाला... मात्र 12 वाजताची सुनावणीत दिपकेंना 2 वाजेपर्यंतही हजर करण्यात न आल्यानं दिपकेंच्या वकीलांनी न्यायालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेतला...
दरम्यान न्यायालयानं दिपकेंच्या सुटकेआधी काय केलं? पाहूयात..
दिल्ली पोलिसांनी दिपकेंवर कलम 126 आणि कलम 170 अंतर्गत कारवाई केली होती
न्यायालयीन सुनावणीनंतर सुटकेपूर्वी दिपकें यांना ‘पीस बॉण्ड’वर स्वाक्षरी करावी लागलीय...
पीस बॉण्डनुसार पुढील एक वर्षासाठी शांतता राखणे बंधनकारक असणार आहे...
दरम्यान याआधीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करण्यासाठी दिल्लीत आलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांना विमानातून उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हमी पत्र घेऊन सोडण्यात आले होते.... रांका आणि दास यांनी जंतरमंतरवर तिंरगा फडकावून शांतता कराराचा भंग केल्यामुळेच त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती...त्यामुळे दिपकेंच्या जामीनानंतर आता तिहारमध्ये असलेल्या रांका आणि दास यांनाही जामीन मिळणार का? दिपकेंवरील कारवाईनंतर आंदोलन थंडावणार की तीव्र होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.