देशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. संसदेची इमारत देशात सर्वात सुरक्षित मानली जाते. महत्त्वाची इमारत जर सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित असेल? संसदेत घुसलेला व्यक्ती जर विरोधी पक्षाच्या खासदाराच्या शिफारशीने आलेला असता तर त्या खासदाराला UAPA चे कलम लावून आंतकवादी घोषित केलं गेलं असत. त्याच्या पक्षाला देश विरोधी घोषित केलं असतं. त्याची खासदारकी रद्द करून अटक झाली असती, असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे. तसेच ते सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. ते या षडयंत्रात सहभागी होते का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी आज शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा हे बोलवत असतात आणि ते जेव्हा बोलावतात तेव्हा मी साईदरबारी नक्की येतो. साईबाबांचा मी खूप मोठा भक्त आहे, त्यामुळे मी नेहमीच शिर्डीला येतो. तसेच मी लवकरच पत्नी परिणीतीसोबत साईदरबारी येईन, असं राघव चढ्ढा यांनी सांगितलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे (Parliament Winter Session) कामकाज सुरू असताना लोकसभेत तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सदस्यांच्या बाकावर उड्या मारल्या. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. तरुणांनी धुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेनंतर नवीन संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न (Parliament Security Breach) ऐरणीवर आला. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ५ आरोपींना अटक केल्यानंतर सहावा आरोपीही पोलिसांसमोर शरण आला. विरोधकांनी यावर केंद्र करकार आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरले असून भाजपच्या खासदाराच्या चौकशीची मागणी केली आहे. तर यावरू विरोधी पक्षांच्या १३ खासदारांचे निलंबनही करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.