महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आरक्षणाची मागणी केली आहे. महिलांना दिलेलं ५० टक्केच आरक्षण आम्हाला हवं. त्यात कमी किवा जास्त चालणार नाही. ४९ टक्केही नको आणि ५१ ही नको, महिलांना ५० टक्केच आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आरक्षणासह, महिला तसेच राज्यातील आणि देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
टीव्हीवरील मालिकांमध्ये बायकांची जी भांडण दाखवतात ती खऱ्या जीवनात नसतात. अनेक महिलाना त्यांचे पती मदत करत असतात, मात्र हे सिरीयलवाले उगाच महिलांच्या वादाचा भाग दाखवत बदनाम करत आहेत. सिरीयलवाल्याना सांगितलं आहे की महिलांची बदनामी बंद करा.
संसदेत झालेल्या घटनेवेळी ज्या खासदारांनी जे धर्य दाखवलं त्याबद्दल त्याचे आभार. जेव्हा त्यांनी गॅस सोडला तेव्हा समजलं हे काही तरी करायला आलेत. त्या दिवशी संसदेत काही घडू शकलं असतं. दोन तरुणांच्या जागी दहा असते तर असे अनेक प्रश्न मनात आले होते. समाजात अस्वस्थता आहे, शेतीमाल दर पहा कमी झाले आहेत,निर्यात बंद केली आहे. राज्यात पाऊस कमी झाला आहे. पाण्याचं योग्य नियोजन करावं लागणार आहे. निवडणूक येईल जाईल त्यात होईल ते होईल पण कुटुंब म्हणून गावात काम करा.मतभेद निवडणूकी पर्यत ठीक असतात पण नंतर काम केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
सगळयात अवघड माझं २०२३ वर्ष गेलं आहे. महिलामध्ये ताकद असते लढण्याची. पुरुषांच्या बरोबरीने बारामती लोकसभा मतदारसंघात महिला काम करत आहेत. अशी एक स्कीम सांगा जी आपल्याकडे नाही, सत्तेत असो वा नसो. मी देशात नंबर वन आहे त्यामागे तुम्ही आहात. १० वर्ष विरोधात खासदार आहे तरी मला वाटत नाही मी विरोधात आहे. माझ्यावर कसले आरोप नाहीत. काम करत रहायचं. कामात सातत्य ठेवायचं आहे. सत्तेत असतो तर यापेक्षा जास्त काय केलं असतं . शरद पवार यांची मुलगी आहे असं ओळखलं जात होतं, पण गेली 15 वर्ष जशी साथ दिली तशीच पुढेही साथ द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.