Jarange On Maratha Reservation: 'मराठ्यांना आरक्षण देण्यापासून आता देवही रोखू शकत नाही...', मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटीतून इशारा

Jarange On Maratha Reservation: आले. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीतून दिला.
Jarange On Maratha Reservation
Jarange On Maratha ReservationSaam Digital
Published On

Jarange On Maratha Reservation

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं ही आपली मागणी असून सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. १९६७ पूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आधी आरक्षण द्यायला हवं होतं. ओबीसी आरक्षण त्यानंतर देण्यात आलं. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीतून दिला आहे.

ओबीसीमध्ये धनगर समाजाला वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळे त्यांना धक्का लागणार नाही. आपण ओबीसीमध्ये आहोत फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मराठ्यांना इतक्या हल्क्यात घेऊ नका, मतांसाठी आमच्या पोरांचे मुडदे पडणार नाहीत याची काळजी घ्या. तुन्हाला मोठं करायचं मराठ्यांनी आणि त्यांनीच आरक्षण देणार नाही, अशी टीका त्यांनी राजकीय नेत्यांवर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदींच्या आधारावर कायदा करावा, यासाठी २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. ते शब्द आपले नाहीत, ते त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत त्या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे आणि आम्ही ते आम्ही घेणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे. शिंदे समितीने २४ डिसेंबरपर्यंत नोंदीचा अहवाल देणार आहे. मात्र यापुढे नोंदी तपासण्याचे काम सुरूच ठेवले पाहिजे.काही अधिकारी सांगत आहेत की आमच्या तालुक्यात नोंदी सापडत नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.

Jarange On Maratha Reservation
Political News : स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलतात व प्रसिद्धी मिळवतात; आमदार विश्वनाथ भोईर यांचा आमदार राजू पाटलांना प्रत्युत्तर

हे आरक्षण चॅलेंज होत नाही. नोंदी सापडल्या आहेत.मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होत नाही. घाबरायचे नाही. सभेला जशी गर्दी होते त्यापेक्षा जास्त गर्दी बैठकीला झाली आहे. सरकार काय करतंय?, समाजाने काय केले? आतापर्यंत आरक्षणाबाबत काय झाले? सरकारची भूमिका काय आहे? यावर आज चर्चा करायची आहे. २४ डिसेंबर नंतर आंदोलनाची दिशा काय यावर चर्चा करायची आहे. आता हार आपल्याला घ्यायची नाही, असं आवाहन मराठा समाजाला त्यांनी यावेळी केलं

Jarange On Maratha Reservation
Satara News : ...तर निवडणूकच लढणार नाही; भाजप आमदार जयकुमार गोरेंची कार्यक्रमातच घोषणा, नेमकं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com