खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय. धरण क्षेत्रात पाऊस थांबल्याने विसर्ग पूर्णपणे बंद केलाय. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 9 हजार 416 क्युसेक्स विसर्ग रात्री 9 वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
मनसेकडून ठीक ठिकाणी बॅनरबाजी तसेच लालबाग येथील मनसेच्या शाखेसमोर मनसेकडून ढोल वाजवून जल्लोष करण्यात आलाय. बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदगावकरांचे अभिनंदनाचे बॅनर देखील लावले आहेत.महिला पदाधिकारी देखील जल्लोषात सहभागी झाल्या आहेत.
लोकल रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. परळ, ठाणे, घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. मराठवाड्यातील सर्व आमदारांबरोबर देवेंद्र फडणवीस चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता. हा फटका कशा पद्धतीने भरून काढायचा यासंदर्भात प्रत्येक आमदारांशी चर्चा होणार आहे.
सोनिया दूहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत त्या प्रवेश पक्षप्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोनिया यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोनिया दुहान यांनी घेतली होती.
बांगलादेश मधील परिस्थिती पाहता Air India चा मोठा निर्णय. एअर इंडियाने बांगलादेशसाठी विशेषत: ढाकाला जाणारी सर्व विमानांते उड्डाणे रद्द केली आहेत. Air India कंपनी प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्यात येणार आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग पुन्हा कमी केलाय. 21 हजार 175 क्युसेक्स विसर्ग कमी करण्यात आलाय. आता 9 हजार 416 क्यूसेक्स करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांना तर कोणत्यातरी एखाद्या वाशिमच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आणून भरती करण्याची गरज आहे, का वाशिममध्ये हॉस्पिटल अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये. ते वाशिम येथील भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीसाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्यं केलंय.
एकता नगरमध्ये मुख्यमंत्री यांनी लोकांशी संवाद साधला. खडकवासला धरणाच्या पुराने एकता नगरमध्ये मोठे नुकसान झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. अधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल. या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन याच ठिकाणी योग्य पद्धतीने केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकता नगरमधील रहिवाशांना सांगितले.
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे उंचीवरून दरड कोसळली. झाडासकट दरडी घाटमार्गावर कोसळल्याने रस्ता बंद झाला. तीनसमाळ गावाचा धडगाव तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
सुप्रीम कोर्टात उद्या पहिली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडेल. त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टात 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार आहे. सुनावणी एकाच दिवशी होणार मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार
माजी खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर धारणी येथे आभार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले. पाच वर्षे पूर्ण प्रामाणिक काम मो केलं खूप त्रास होतो, जेव्हा मेरिट विद्यार्थी नापास होतो. माझ्याविरोधात खोटा प्रचार केला गेला. त्यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर टीका केली.
उद्या सुप्रीम कोर्टात पहिली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही सुनावणी एकाच दिवशी होणार मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी होईल. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे. निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील उद्या होण्याची शक्यता आहे.
शेख हसीना पुढील काही दिवस दिल्लीत राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीत राहून त्या काही बैठका घेणार असल्याची माहिती आहे.
शेख हसीना याआधी अनेक वर्षे दिल्लीत राहिल्या आहेत.
सध्या त्यांचं विमान भारताच्या हद्दीत असून त्या दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंगोलीत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकरी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते संजय लोंढे यांच्यासह शेकडो जणांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला.
तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार. दर्शनानंतर राज ठाकरे आज धाराशिव येथे मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे.
खडकवासाला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर पुण्यातील एकता नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं. आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणीसाठी आले आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत.
ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.
कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू
दुपारी अडीच वाजण्याची घटना
बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता
बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे निर्णय मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे
शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता
२० ऑगस्टला होणाऱ्या काँग्रेसच्या सभेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले BKCत दाखल झाली आहे.
मैदानाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आणि नसीम खान BKCतील मैदानात पोहोचले आहे.
२० तारखेला मुंबईत राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
पुण्यातील पूरग्रस्त भागाची आणि पूरग्रस्तांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील पूरग्रस्त भागाची एकनाथ शिंदे पाहणी करणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार आहे. शिवाजीनगरनंतर मुख्यमंत्री शिंदे सिंहगड रोड येथील एकता नगरकडे रवाना होणार आहे.
इंदापुरातील उजनी धरण 100% भरले आहे. धरणात सध्या दोन लाख पाच हजार विसर्गने पाणी येत आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीत एक लाख क्युसेक विसर्ग केला जात आहे. सध्या धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा वेग वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. अक्कलपाडा धरणातून 5750 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रात करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. ते पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. पूरग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत करणार आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय. वेळेवर सभेचा अजेंडा भेटत नाही यासह विविध विषयांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विरोधकांनीा सभा त्याग केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे विमानतळावरून पिंपरी चिंचवडकडे रवाना झालेत. पिंपरी -चिंचवडमध्ये सांगवी येथील पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहे. सांगवी येथे पूरग्रस्तांच्या भेटी देखील ते घेणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडजवळील हातनूर टोल नाक्यावर मनसेने टोल बंद आंदोलन सुरू केले आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर येथील टोलनाक्यावर मनसे आक्रमक झाली आहे. ६० किलोमीटरच्या आत टोल येत असल्यामुळे हा टोल अनधिकृत असल्याचा मनसेने आरोप केला आहे.
9 ऑगस्ट क्रांतिदिनी मनोज जारांगे पाटील यांची कोल्हापुरात शांतता रॅली निघणार आहे. क्रांतीस्तंभाला अभिवादन करून या रॅलीला सुरूवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्ययातील हजारो मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी होणार आहेत.
पंढरपुरातून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
वर्ध्यात अज्ञात ट्रॅकची ऑटोने धडक दिलीय. धडकेत ऑटोतील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर पाच लोक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर मुंबई महामार्गवरील केळापूर शिवारातील घटना आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक परिसरामध्ये भीमा नदीला पूर आला आहे. यामुळे कर्जत दौंड रस्त्यावर असणारा भीमा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.
जळगावातील ओंकारेश्वर मंदिर येथे भाविकांनी आज महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी महादेवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला असून दुपारच्या सुमारास मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. रात्रीच्या सुमारास मंदिरावर विद्युत अशी आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.
बीडमध्ये मोकाट जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगर पालिकेने मोकाट जनावरांना पकडून नगरपालिकेच्या कोंडवाड्यात ठेवलेले असताना ही धक्कादायक माहिती समोर आलीय. पालिकेच्या कोडवाड्यात पाच महिन्यांची गर्भवती असलेली गाय मृत झालीय. यावेळी तिचे शवविच्छेदन केले असता, तिच्या पोटात वासरू अन् तब्बल 40 किलो प्लास्टिक निघाले आहे. तर या गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज, आता पशुधन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उद्या मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडून समितीची स्थापना करण्यात आलीय. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ सदस्यांचा समितीत समावेश आहे.
हिंगोलीत शिंदे सेनेने पुन्हा एकदा उबाठा आणि काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. शेकडो कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश झालाय. कळमनुरी तालुक्यातील बाळापुर व शेवाळा परिसरातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणं 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे पानशेत वरसगाव खोऱ्यातील नागरिकांनी धरणाच्या पाण्याचं जलपुजन केलंय. पुष्पहार,श्रीफळ,खण,ओटीचे साहित्य, हळद-कुंकू, जलाशयात अर्पण करून जलपूजन करण्यात आलंय. यावेळी ज्येष्ठ धरणग्रस्तांंसह प्रमुख कार्यकर्त्यांनी इतिहासाला उजाळा दिला
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने उद्या मुंबईत महायुतीच्या नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 सदस्यांचा समितीत समावेश मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची बैठक होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. लातूरच्या लामजना बस स्थानकात औसा-उमरगा हि,प्रवाशांनी भरलेली बस अचानक बंद पडली. बराच वेळ बस चालू होत नसल्याने अखेर वयोवृद्ध प्रवाशांना खाली उतरून गाडीला धक्का द्यावा लागला. मात्र प्रवाशांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या पाझर तलावावर मित्रासह फिरण्यास गेलेल्या एका उद्योजक पर्यटकाचा पोहत असताना बूडून मृत्यू झाला. मनोज सदाशिव मोरडे असे त्याचे नाव आहे. काल ही दुर्घटना घडली आहे. सर्वजण फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. मनोजचा खताचा व्यवसाय असून गोकुळ शिरगाव येथे त्याचा कारखाना आहे. एका तरुण उद्योजकाच्या मृत्यूने हळूहळू व्यक्त होत होती.
सातारा पुणे महामार्गाच्या दरम्यान वाई तालुक्यातील पाचवड येथे रस्त्यावरच आज सकाळी आठच्या सुमारास साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणारा तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने शॉर्टसर्किटमुळे अचानक पेट घेतला. घटनास्थळावरील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक मध्ये लागलेली आग इतकी मोठी होती की संपूर्ण ट्रक आगीत जळून खाक झाला.
मध्य प्रदेशातून प्रवाशांना घेऊन नागपुरात आलेली खासगी बस अचानक डिव्हायडरवर चढली. शहरातील मानकापूर चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुणालीही दुखापत झाली नाही. बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तिन्ही धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या खडकवासला धरणातून 35948 तर पानशेत धरणातून 8664 क्यूसेक्स इतका विसर्ग केला जातोय. वरसगाव धरणातून सुरू असलेला 9502 पाण्याचा विसर्ग आता 8091 इतका करण्यात आलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर जाणार असून पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. जुनी सांगवी येथील मनपा शाळेपासून दुपारी १२.४५ च्या सुमारास दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर घोले रोड, शिवाजी नगर, वाकडेवाडी, एकता नगर परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेतली. दुपारी १.४५ च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधतील
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.