
वाघोलीमधील फुलमळा भावडी रोड येथे कुटुंबासह दुचाकीवरून गवंडी काम करण्यासाठी जाणाऱ्याचे कार मधून अपहरण केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवंडी काम करणारे नवनाथ जाधव (रा. भावडी रोड) हे पत्नी, मुलासह काल सकाळी सव्वा नऊला दुचाकीवरून काम करण्यासाठी जात असताना स्विफ्ट कार चालकाने त्यांना थांबविले.
कारमधून उतरलेल्या अनोळखी व्यक्तींनी जाधव यांना जबरदस्तीने नेले. यावेळी विरोध करणारी पत्नी व मुलाला मारहाण, शिवीगाळ करण्यात आली.घडलेल्या प्रकाराबाबत पत्नी लताबाई जाधव यांनी वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार मधील तीन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार दिली आहे.
अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल आहे. त्यामुळे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.
गेले दोन दिवस समुद्रात वादळसदृश परिस्थिती स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकां देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. वादळसदृश वातावरण असल्याने मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. देवगड बंदरात उभ्या असलेल्या नौकांचे ड्रोनच्या माध्यमातून नयनरम्य दृश्य चित्रित केलंय वैभव केळकर यांनी
पालघरच्या पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या सातपाटी , शिरगाव , मुरबे या समुद्रकिनाऱ्यालगत रात्रीच्या सुमारास ड्रोन उडवले जात असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे . रात्री साडेअकरा ते मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पर्यंत मागील काही दिवसांपासून रोज नागरिकांना या भागात ड्रोन दिसून येत असल्याने मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीने सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . हे ड्रोन नेमकी कशासाठी उडवले जात आहेत आणि याची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का अशी विचारणा करत परवानगी आधीच प्रस्तावित जिंदाल बंदरा च्या बेकायदेशीर सर्वेसाठी हा ड्रोन सर्वे सुरू असल्याचा आरोप संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे . दरम्यान जिंदाल च्या मुरबे येथील बंदराची जन सुनावणी मागील आठवड्यातच पार पडली असताना लगेचच हा बेकायदेशीर सर्वे कसा सुरू करण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे . तर असे ड्रोन दिसून आल्यास त्वरितच पोलीस प्रशासनाला माहिती देण्याच आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थांना करण्यात आलय . मात्र असं असलं तरी या ड्रोन सर्वे मुळे सध्या स्थानिकांकडून बंदर विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठया प्रमाणावर शेती पिकाला बसला आहे,नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील निमगाव परिसरात झालेल्या पावसाने मका पाण्यात गेली,पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांची मजूर लावत मका गोळा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे
लातूरच्या रेनापुर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाल आहे, काढून ठेवलेल्या शेती पिकासह नागरिकांच्या घरात पाणी गेल आहे, तर तालुक्यातील गरसुळी येथे उत्तम कांबळे यांना पावसामुळे घर पडल्याने मोठे नुकसान झालं आहे , तर तिकडे रेनापुर शहरात देखील नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने, घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात आहेत.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि त्यांना कर्जमुक्त करावा या मागणीला घेऊन प्रहार नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या हजारो समर्थक आणि शेतकऱ्यांसह काल नागपुरात धडक दिली आहे. हैदराबाद - जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून त्यांनी बंद पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकतील अशी चेतावणी बच्चू कडू यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त वाढविण्यात आला असून एकंदरीतच परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप या आलेलं आहे.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी मकाचा चारा काढता आला नाही तर काही ठिकाणी काढून ठेवलेला चारा सुरक्षितस्थळी हलविता न आल्याने चारा शेतात भिजून सडू लागला आहे.त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. आधीच अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून ,आता चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पशुधन कसे जगवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
जालना जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.या पावसामुळं रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. पावसाचे हस्त नक्षत्र संपल्यावर बळीराजा ज्वारीची पेरणी करत असतो मात्र जिल्ह्यात हस्त नक्षत्रातच पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू,हरभऱ्याची पेरणी झालेली नाही. या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबल्याने पुढील रब्बी हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. मागील सात दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या असून खरिपातील कपाशी पिकाचं देखील अतोनात नुकसान झालं आहे..
धाराशिव जिल्ह्यातील कळंब मधुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दुचाकी चोरणाऱ्या दोघांना जेरबंद केल आहे.त्याच्याकडुन एक लाख 55 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी देखील ताब्यात घेतल्या आहेत.या चोरीच्या दुचाकी विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी अर्जुन साहेबराव काळे,नितीन विश्वास शिंदे या चोरट्यांना ताब्यात घेतले अन्य साथीदारांचा पोलिसांकडुन शोध सुरू करण्यात आला आहे.
02 सप्टेंबर रोजी शासनाने काढलेला जीआर रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी ओबीसीचा महाएल्गार मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात धुमाकुळ घातल्यानंतर आता मागील सात दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळं शेतकऱ्याच वेचणीला आलेलं पांढर सोन शेतातच भिजून काळवंडू लागलंय. यामुळ जालना जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय.जालन्यातील अनेक शेतकऱ्यांचा वेचनीला आलेला कापूस शेतातच भिजत असल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. भिजलेला कापूस या शेतकऱ्यांना कमी दराने बाजारात विकावा लागणार आहेत. एकीकडे जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे तर आता शेतकऱ्यांना कमी दराने कापूस बाजारात विकावा लागणार असल्याने दुहेरी फटका बसत आहे
यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चार लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे या सोबतच रब्बी हंगामातील पेरणी करिता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 584 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
त्यामुळे इच्छुकांना घर खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे
सुधारित वेळापत्रकानुसार अर्जांची संगणकीय सोडत आता ११ डिसेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार
२० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत
दिनांक २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल
मावळ तालुक्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आणि राष्ट्रीय काँग्रेस या पाच पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे.. या आघाडीचा उद्देश स्पष्ट आहे, मावळ तालुक्यातील सत्तेवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रभावाला पर्याय उभा करणे. या नव्या आघाडीने ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अशा सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाची ताकद ज्या भागात आहे त्याला तिकीट देऊन निवडणूक लढविणार आहे. दरम्यान विकासाच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी पाणीपुरवठा रस्ते आणि शिक्षण या सर्व क्षेत्रातील समस्यावर आता एकत्रितपणे लढा उभारला जाईल. आमचे विचार वेगवेगळे असले तरी मावळचा विकास करणे हेच आमचे ध्येय धोरण आहे..
ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच, धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल
१३ पानी अहवालासमवेत ४३१ पानांचे कागदपत्रे अहवालात जोडले
पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग येथे १४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.
ट्रस्टने बांधकाम व्यावसायिकास जागेची विक्री करण्यास परवानगी मागताना केलेल्या अर्जात या मंदिराचा उल्लेख केला नाही, असा आक्षेप ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती ने केला होता
ट्रस्ट जागेच्या आवारात जैन मंदिर आहे का, याची पाहणी करून २७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांना दिले होते.
सह धर्मादाय आयुक्त यांनी अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला असून, त्यामध्ये बोर्डिंगच्या जागेत भगवान महावीर यांचे मंदिर असल्याची खातरजमा केली आहे
कोरोना काळात आयसीयू बेडची संख्या वाढविणाऱ्या अधिकारी आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त
आयएएस अधिकारी पवनीत कौर यांची आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
सध्याचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची सात महिन्यामध्ये राज्य सरकारने केली बदली
पवनीत कौर या २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हापरिषदेच्या मुख्य अधिकारी, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त, अमरावतीच्या जिल्हाधिकारी, भूवैज्ञानिक सर्वेक्षण व विकास संस्थेच्या संचालकपदी काम केले आहे. त्या पुण्यातील यशदामध्ये उपसंचालक या पदावर कार्यरत होत्या
प्रदीप चंदन यांची मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) प्रकल्प अधिकारी म्हणून बदली
सुरत वरून शिर्डी कडे साईबाबाच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव रायते शिवारात अपघात झाला आहे.
आंदोलनामुळे रस्ता जाम असतांना रुग्णवाहिकेला मात्र आंदोलकांनी वाट मार्ग काढून दिली..
शेतकरी आक्रमक झाले आहे....सातबारा कोरा झाल्याशिवाय निघणार नाही, अशी भूमिका शेतकरी यांनी घेतली आहे...
रत्नागिरी जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आलाय.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला गेलाय.अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा आदेश दिलाय.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.