Maharashtra Live News Update: राज्यात निवडणुकीच्या धामधूमीत नवीन पक्षाची एंट्री

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.

भंडाऱ्यावरून तिरोडा दिशेने कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात भंडारा - तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथे घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे घडलेल्या अपघातानंतर तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. यामुळे पहाटे प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मोहाडी पोलिस, वाहतूक पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात मदत केली.

Khed -राजगुरुनगरच्या रणांगणात शिंदे गटाचं रणशिंग

अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटानं नगराध्यक्षपदासाठी मंगेश गुंडाळ यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेत. दोन जागा समन्वयासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अपक्ष किरण आहेर आणि बापू थिगळे यांच्या एन्ट्रीमुळे स्पर्धा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहे मात्र या निवडणूकीत भाजप मागे पडताना दिसत असुन शिवसेनेचा शिंदे गट रणशिंग फुंकल्याने राजगुरुनगरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालीय.

उलटफेर झालं तर आम्हाला जबाबदार धरू नका, महेंद्र दळवी यांचा भाजप राष्ट्रवादीला इशारा

आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसऱ्याचा पक्ष घेऊन बुडायचं हा ट्रेंड रायगडच्या राजकारणात एका कुटुंबाच्या माध्यमातून आला असल्याची टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यास तयार आहोत पण बदलत्या राजकारणात काही उलटफेर झालं तर त्यांनी आम्हाला दोष देऊ नये असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला. ते पेण इथं बोलत होते. पेण नगर पालिका निवडणुकीत महायुती फिस्कटली असून शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

nashik-manmad-मनमाड नगर परिषद निवडणूक सर्वसामान्य प्रतिक्रिया

गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्य व नगरसेवक पदासाठी निवडणूका जाहीर झाल्या असून,गेल्या सात वर्षा पुला खालून बरेच पाणी वाहून गेल्याने आणि पुन्हा अनेक वर्षांपासून तेच ते चेहरे यंदा पुन्हा नको,नविन चेह-यांना संधी मिळावी,शहराचा विकास कराचा असेल तर जुन्या अनुभवी नेत्यांना संधी मिळावी अशा प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या असून त्यांच्याशी संवाद साधला आहे.

धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जाचा पाऊस,299 अर्ज धडकले

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापु लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असुन 15 नोव्हेंबर रोजी अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.आत्तापर्यंत आठपैकी सात नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सुरूवातीचे दोन तीन दिवस अर्ज दाखल करण्याकडे इच्छुकांनी पाठ फिरवली होती त्यामूळे अर्जाचा ओघ कमी होता माञ 14 नोव्हेंबर पासून प्लो वाढला असुन धाराशिव सह सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली जात आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.

राज्यात निवडणुकीच्या धामधूमीत नवीन पक्षाची एंट्री

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडलीय... राज्यातील राजकारणात आता नवीन पक्षाची एंट्री झालीय.... तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP). ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांनी या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर केली.

अकोल्यातील त्या अविवाहित तरुणाच्या लग्नासाठी बुलढाण्यातील मानस फाउंडेशनचा पुढाकार...

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांकडे आपलं लग्न जुळऊन देण्यासंदर्भात पत्र दिले होते.. त्याची बातमी पुढारी न्युजने दाखवताच बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने सदर तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे.. मानस फाउंडेशन अनेक वर्षापासून विधवा, परितक्ता, एकल महिलांच्या पुनर्विवाह आणि रोजगारा संदर्भात चळवळ राबवत आहे, आणि या तरुणांसोबत मानस फाउंडेशनने संपर्क केला असून येत्या दोन दिवसांमध्ये त्याच्या घरी जाऊन त्याला योग्य ते स्थळ सुचवले जाणार आहे.. आणि त्याच्या लग्नापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी मानस फाउंडेशन पुढाकार घेणार आहे...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या तोंडावरती विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी चे नेते योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे बीड नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी हस्तक्षेप करत स्वतः पॅनल उभा करून सर्व सूत्रे यांच्या हाती घेतल्याने योगेश क्षीरसागर नाराज झाले असल्याची माहिती समोर आली आहे त्या स्वतः पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत

परभणीत थंडीचा जोर कायम ,शहरासह जिल्ह्याला भरली हुडहुडी

परभणी शहरासह जिल्ह्याचे तापमान अत्यंत घसरल्यामुळे मागच्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये थंडीच्या कडाका कायम आहे काल जिल्ह्याचे तापमान 7.9° चे तेवढे होते तर हेच तापमान आज 8.5 एवढे झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये कुठे भेटायला लागलेले आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी नागरिक विद्यार्थी दूधवाले उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत

रत्नागिरीत सदस्यांसाठी ९३ अर्ज तर नगराध्यपदासाठी ५ अर्ज दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या चार नगरपरिषदा आणि गुहागर, लांजा, देवरुख या तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहाव्या दिवशी सदस्यांच्या जागेसाठी ९३ आणि थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी ५ अर्ज असे एकूण ९८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सदस्याच्या जागेसाठी १११ आणि थेट नगराध्यक्षाच्या जागेसाठी १० अर्ज आले आहेत. रत्नागिरीत मात्र, नगराध्यक्षाच्या जागेसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही..

रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महायुतीमधून नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून ९, भारतीय जनता पक्षाकडून ६ अर्ज भरण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाकडून २ अर्ज आणि अपक्ष २ अर्ज दाखल झाले आहेत. चिपळुणात नगराध्यक्ष पदासाठी ३ आणि नगरसेवक पदासाठी २६ अर्ज दाखल झाले. खेड नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ उमेदवारी अर्ज आणि भाजपकडून २ अर्ज दाखल झाले आहेत.

Sangli : उत्तम मोहिते खून प्रकरणातील संशयित आरोपांची काढण्यात आली धिंड

सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. शहरातल्या इंदिरानगर,गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरे सह टोळीची धिंड काढत,दहशत मोडून काढली आहे.3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण पणे खून करण्यात आला होता.खुनाच्या घटने दरम्यान संशयित हल्लेखोर पैकी एकाचा मृत्यू देखील झाला होता.या दुहेरी खुणाच्या घटनेमुळे सांगली हादरून गेली होती.या खून प्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह चौघांना अटक करण्यात आली होती,या टोळीचे असणारी परिसरातील दहशत म्हणून काढण्यासाठी, उत्तम मोहितेंचा खून झाला,परिसरामध्ये मोरे टोळीची धिंड काढण्यात आली.

वेचणीला मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने अजूनही पडूनच

जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घालून शेतकऱ्यांच्या शेती पिकांना प्रचंड तडाखा दिला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागच्या पंधरा दिवसापूर्वी अनेक ठिकाणी कपाशीची बोंडे चढली तर कापसाच्या वाती झाल्या. मात्र आता शेतातच फुटलेल्या कापसाला वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने जालना जिल्ह्यातल्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतात शेतकऱ्यांचे पांढरं सोनं अजूनही पडूनच आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

कर्जत नगरपरिषद थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई डॉ.सौ.स्वाती अक्षय लाड यांना शिवसेना भाजप आरपीआय आठवले गट महायुती कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

SAMBHAJINAGAR : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर 

वसंतराव नाईक पुतळा अनावरण आणि भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे करणार उद्घाटन 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगरचा महत्त्वाचा दौरा 

काही नेत्यांचा प्रवेश सोहळा आज होणार होता मात्र प्रदेशाध्यक्षना दिल्लीला जावं लागलं असल्याने प्रवेश सोहळा रद्द

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री साधतील संवाद

YAVATMAL: धुक्यात हरवला राष्ट्रीय महामार्ग रस्ता

यवतमाळ जिल्ह्यात सकाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात धक्के पडल्याने राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना हेडलाईट लावून हळूहळू रस्ता शोधावा लागत होता. काही ठिकाणी तर एवढे धुके दाटले की संपूर्ण परिसर धुक्याच्या भिंतीने वेढल्यासारखा भासत होता.

KOPARGOAN : अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...

अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...

कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...

काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाची कारवाई...

गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ...

एकाच आठवड्यात घेतले दोन बळी...

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू...

वन विभागाकडून सुरू होता नरभक्षक बिबट्याचा शोध...

अखेर सहा दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश...

आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीआयएससीई च्या वतीने घेण्यात येणाऱ्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीआयएससीईच्या वेळापत्रकानुसार आयसीएसई’ची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ३० मार्च

आयएससी’ची परीक्षा १२ फेब्रुवारी ते ६ एप्रिल दरम्यान होणार

यंदाच्या ‘आयसीएसई’ची परीक्षा सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक, तर ‘आयएससी’ची परीक्षा सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी

आयसीएसई’च्या ७५ विषयांची आणि आयएससी’च्या ५० विषयांची परीक्षा होणार

‘सीआयएससीई’च्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक ‘https://cisce.org/’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याशी संवाद

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील पन्नास विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी मिळाली. बालदिना निमित्ताने राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात हे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला भविष्यामध्ये काय बनायचे आहे? कुणी सांगितले डॉक्टर, वैमानिक, लष्कार, पोलिसमध्ये जाणार असल्याची उत्तरे दिली. पण, राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित असलेल्या भोरमधील आपटी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सोहम पारठे या सहावीतील विद्यार्थ्याने ‘‘मला राष्ट्रपती व्हायचंय,’’ असे उत्तर दिले. या उत्तराने चकित झालेल्या मुर्मू यांनी ‘‘तू भविष्यात नक्की राष्ट्रपती होशील, पण त्यावेळी तुझ्यासोबत मला फोटो घेण्याची संधी मिळेल की नाही, हे माहिती नाही. म्हणून मी तुझ्यासोबत आजच फोटो घेते.’’ असे म्हणत त्यांनी सोहमसोबत आपुलकीने फोटो घेतला आणि तो एक्सवर पोस्टही केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com