Maharashtra Live Update: रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 7th December 2024 : आज मंगळवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिवसेनाला कोणती खाती मिळणार? अर्थ खातं पुन्हा अजित पवारांकडेच जाणार? मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 6 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती

रत्नागिरीत डी मार्ट समोर मोठा आवाज करत सीएनजीच्या टँकरमधील वायू गळती होत आहे.

रात्री 8 च्या सुमारास डी मार्टसमोर अचानक प्रचंड मोठा आवाज झाला. सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून वायू गळती होण्यास सुरुवात झाली. टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पसरत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरी नगर परिषदेचा बंब घटनास्थळी दाखल झालाय.

आमदार आमश्या पाडवी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

आमदार आमशा पाडवी यांच्या जामीन अर्जावर शहादा कोर्टाने आज जामीन मंजूर केले आहे.

बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ,दौड तालुक्यातील घटना

दौंड तालुक्यातील कडेठाण येथील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. लताबाई बबन धावडे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या महिलेचे नाव असून बिबट्याने महिलेवर हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले होते. व त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वांद्रे परिसरात भरधाव पोर्शे कारला अपघात, दुचाकीला दिली धडक

भरधाव पोर्शे गाडीने फूटपाथवर उभ्या आलेल्या दुचाकीला धडक दिली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही. बड्या व्यावसायिकाचा मुलगा गाडी चालवत आल्याची माहिती आहे. चालक ध्रुव गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवारी पहाटे वांद्र्याच्या साधू वासवानी चौकात अपघात झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झालीय आहे.

वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला विशेष दिलासा पॅकेज द्या : किसान सभा

विधानसभेच्या निवडणुकीच्या 60 दिवसाच्या कालावधीत विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत, असे डॉ. अजित नवले म्हणालेत.

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी पात्रात ४ जण बुडाले

बचाव पथक, पोलिस घटना स्थळी दाखल, बचाव कार्य सुरू आहे. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश तर दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे. बुडालेल्यांमध्ये तीन महिला एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्वजण नवी मुंबई येथील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते.

मुंबई गोवा महामार्गावर मोटर सायकल आणि कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू तर कारमधील एक प्रवासी जखमी आहे. इंदापूरनजीक तिलोरे गावाच्या हद्दीत अपघात झाला. जखमी व्यक्तीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बीडच्या माजलगाव जवळ भीषण अपघात; दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली, एक ठार

बीडच्या माजलगाव जवळ परभणी महामार्गावर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकी वरील १ जण जागीच ठार झालाय, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना पाथरी येथील रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली..दरम्यान माजलगाव परिसरात वेगवेगळे साखर कारखाने असून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळं यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

मधुकर पिचड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. ४ महिलांसह ११ जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झालेत. तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हेलिपॅडवर 10 ते 15 मिनिटे खोळंबा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोळंबा झालाय. हेलिपॅडवर 10 ते 15 मिनिट खोळंबा झाला.

हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरत असल्याने मुख्यमंत्र्यांना वाट बघावी लागलीय.

महाराष्ट्रातील सहा ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार

पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र शासनाला ६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पुरस्कार प्राप्तीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समित्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. २०२२ ते २०२४ काळातील कामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राचा सन्मान केला जाणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार, ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार, कार्बन न्यूट्रल कंट्रोलसह इतर पुरस्कारांनी महाराष्ट्र सन्मानित होणार आहे.

धुळ्यात EVM विरोधामध्ये ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने विशाल मशाल मोर्चाचे आयोजन

धुळ्यात EVM विरोधामध्ये ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, या संदर्भात आज ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली आहे, 9 डिसेंबर सोमवार रोजी या मशाल मोर्च्याची सुरुवात धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून होणार आहे, त्यानंतर धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळाजवळ या मशाल मोर्चाची सांगता होणार आहे, मशाल मोर्चा सोबतच ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा देखील काढण्यात येणार आहे.

Maharashtra Live Update : एकनाथ शिंदे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

आजपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. २००४ पासून आत्तापर्यंत असे पाच वेळा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde
मी महाविकास आघाडी मधून बाहेर पडत आहे. शिवसेनेबरोबर आम्ही राहणार नाही, बाबरी मशीद बाबत आमचा अपमान झाला आहे. माझे सर्व आमदार वेगळा गट स्थापन करू. मी आज शपथ घेतली आहे. मी अजित पवार यांनी भेटलो. 
अबू आझमी

शरद पवार गटाचे बापू पठारे समाजवादी पक्षचे अबू आझमी यांनी शपथ घेतली

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृह नेते राहण्याची शक्यता

भाजप-मनसे एकत्र, बीएमसीसाठी महायुतीचा प्लॅन

भाजपच्या टाळी ला मनसेचे टाळी...

आगामी निवडणुका भाजप मनसे एकत्र लढवणार असल्याची माहिती...

सूत्रांची माहिती..

जर भाजप प्रस्ताव ठेवेल त्यावर मनसे देखील सकारात्मक प्रतिसाद देणार असल्याची सूत्रांची माहिती..

नाशिकच्या देवळा तालुक्यातील निंबोळा गावी शेतकरी कुटुंबाच्या घरावर दरोडा 12 तोळे सोनं आणि 20 हजार रुपये लंपास

नाशिकच्या देवळा तालुक्यातील निंबोळा येथील शेतकरी श्री. अनिल भाऊराव निकम यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी मोठी चोरी केली आहे. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडत घरात प्रवेश केला,घरातील कपाटात ठेवलेले 12 तोळे सोनं आणि 20 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करत चोरटे फरार झाले,बाहेरगावाहून निकम कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तात्काळ त्यांनी देवळा तालुका पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस प्रशासनाने या घटनेचे त्वरित दखल घेत घटनास्थळी दाखल झाले,पोलिसांनी नाशिक येथील फॉरेन्सिक टीमला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले,फॉरेन्सिक टीम तपासणीत हाताचे ठसे घेण्याचा प्रयत्न करत असून पोलीसांनी या प्रकरणी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानभवन प्रांगणात आगमन. आगमनानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार तसेच विधीमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.

Maharashtra Live Update
Maharashtra Live Update

पुष्पा चित्रपट बंद पडण्याचा इशारा

पुष्पा 2 चित्रपटासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो बंद केल्याने मराठी सिनेमावर अन्याय असून संभाजी महाराज चित्रपट न दाखविल्यास पुष्पा चे शो बंद करण्याचा इशारा कराड येथे आस्था सामाजिक संस्थेने दिला आहे.

अन् हेमंत रासने विरोधी बाकांवर जाता जाता राहिले

भाजपचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकांवर जाण्याऐवजी चुकून विरोधी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसत होते. तितक्यात अजितदादांनी त्यांना हाताला धरून सत्ताधारी बाकांवर बसवले.. (सभागृहात हास्यकल्लोळ)

Maharashtra Live Update : विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार?

शपथविधी सोहळ्याला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षाचे सर्व आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांच्यासह ठाकरे, पवार गटाचे आमदार बाहेर गेले आहेत.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात

आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.

Maharashtra Live Update : देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांनी एकमेकांचे अभिनंदन केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायऱ्यावर उभे होते. त्याच वेळेस आदित्य ठाकरे आणि सचिन आहिर आले होते. त्यावेळी एकमेकांना नमस्कार करून हस्तांदोलन केले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

अजित पवार यांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो की त्यांची बेनामी संपती जप्त केली होती ती रिलीज केली आहे. ७० हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला होता. शपथ घेतल्यानंतर ८ दिवस तरी थांबायला पाहिजे होतं.अजित पवार, प्रफुल पटेल यांना दिलासा मिळाला आता नवाब मलिक यांना दिलासा मिळेल. मला तर उद्धव ठाकरे यांना सोडून सोबत येण्याची ऑफर होती पण मी ती मान्य केली नाही म्हणून माझं राहत घर जप्त केलं. मराठी माणसाचं हक्काचं रहात घर ED ने जप्त केलं. पण मी उद्धव ठाकरे यांना सोडलं नाही.
संजय राऊत, शिवसेना(UBT)

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची अपेक्षा रब्बी हंगामावर

नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावर आहे मात्र सरकारने मोठा गाजावाजा करत एक रुपयात पिक विमा योजनेची सुरुवात केली होती मात्र पावसाळ्यात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने रब्बी हंगामासाठी पिक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित करत पिक विमा कंपनीचे वाभाडे शेतकऱ्यांनी काढले आहेत.

Maharashtra Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ?

राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा व परिस्थिती वेगळी आहे - कोर्ट

जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊ

सुप्रीम कोर्टाच महत्वाचं निरीक्षण

"ईशाद" या NGO कडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिपण्णी

फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती याचिका

फक्त ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नसल्यानं, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले?

फक्त ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नसल्यानं, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले?

वर्षानुवर्षे मंत्रीपदे भूषविलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा

दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या तिन्ही पक्षांमधील आमदारांना मंत्रिपदं मिळेल याची अशा

महायुतीकडून मात्र यंदा अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदे देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती

पक्ष वाढवण्यात योगदान, निवडणूक प्रचारात आमदाराची साथ, जनतेतील प्रतिमा या निकषावर महायुती मधील नेत्यांना मंत्रीपद दिली जाणार

मंत्र्यांचा शपथ विधी ११ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता

मंत्रिपदासाठी महायुती काय फॉर्म्युला ठरवणार याकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार आज पहिल्यांदाच विधानभवनात

१) सिंदखेडराजा- मनोज कायंदे

२) अनुशक्तिनगर - सना मलिक

३) शिरूर - माउली कटके

४) भोर - शंकर मांडेकर

५) पारनेर - काशिनाथ दाते

६) गेवराई - विजयसिंह पंडित

७) फलटण - सचिन पाटिल

८) पाथरी- राजेश विटेकर (विधानसभा पहिल्यांदा)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

१) उत्तमराव जानकर- माळशिरस

२) रोहित पाटील- तासगाव कवटे महाकाळ

३) बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी

४) अभिजित पाटील- माढा

५) नारायण पाटील- करमाळा

६) राजू खरे- मोहोळ

अंजली दमानिया यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका

अंजली दमानिया यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका

बेनामी संपत्ती प्रकरणात अजित पवारांना क्लीन चीट मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांची पोस्ट

"शाब्बास ! १००० कोटी ? भाजप ला पाठिंबा द्या, उप मुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात?" अशी पोस्ट दमानिया यांनी X वर केली आहे

मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पून्हा धमकीचा मेसेज

मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पून्हा धमकीचा मेसेज

मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज समोरील व्यक्तीने पाठवला आहे

इतक नाही तर बाॅम्बस्फोट घडवून ही हत्या केली जाणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे

तसेच दोन व्यक्तींची नाव लिहून ती दोघं आयएसआय एजंट असल्याचेही म्हटले आहे

दरम्यान पोलिस मेसेज करणार्या त्या व्यक्ती शोध घेत आहेत. मात्र मानसिक तणावतून किंवा मद्पान करून हा धमकी वजा खोडसाळणे पाळवला असल्याचा पोलिसांना संशय आहे

मेथीसह इतर भाजीपाल्याच्या दरामध्ये घट - बाजारपेठेत आवक वाढल्याने दरामध्ये झाली घट

धाराशिव -गेल्या काही दिवसांपासून 20 ते 25 रुपयांना मिळणारी मेथीची जुडी सध्या 5 ते 7 रुपयांना मिळत आहे.बाजार समीती भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामूळे किरकोळ बाजारात मेथीसह अन्य पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत.सध्या ग्राहकांना पालक,मेथी,कोथिंबीरीसह रानभाज्यांची जुडी ५ ते ७ रुपयांना मिळत आहेत. दरम्यान भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान दर घटल्याने शेतकऱ्यांना काढणीसह वाहतुकीचा खर्च देखील निघत आवक अधिक असल्याने आगामी काही दिवस सर्वच भाज्यांचे दर कमी राहणार आहेत.

Maharashtra Live Update : विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता

विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता

विधान परिषदेचे सभापतीपद मागील दोन वर्षांपासून रिक्त

सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com