
नाशिकच्या येवला शहरात स्वतंत्र पूर्व काळापासून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते.
उद्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी शहरातील संवेदनशील असलेल्या भागातून पोलीसांचा रूट मार्च काढला
- विक्रम गायकवाड यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंगअंतर्गत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले
- ऑनर किलिंग घटनांमध्ये फाशीची, 'मोका'अंतर्गत तपासाची तरतूद करा, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी
- दोषींना शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु राहण्याचा निर्धार
- बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे.
- या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला.
सर्वसामान्य वीजग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरणाकडून सुरु केले असून याद्वारे वर्क फ्रॅाम करणाऱ्यापासून सर्व घटकांना व्यावसायिक (कमर्शिअल) वीज बिल आकारणार आहे. त्याविरोधात सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनानी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयेश अकोले यांनी दिली.
केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरावर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, त्याला पूर्णपणे हरताळ फासण्याचे काम महावितरण करत आहे. त्यामुळे या योजनेचा कोणताही फायदा होणार नाही.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयाचे निर्देशानंतर आज मेयो रुग्णलयातून प्रकृतीची खातरजमा करत कारागृहात रवानगी करण्यात आलीय...
2014 वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते.
त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आला होता.
सोमवारी हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी त्यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं...
केडीएमसी आयुक्त यांनी दिले ६५ बेकायदा इमारती प्रकरणी स्पष्टीकरण
६५ पैकी १० इमारती पाडल्या, पाच इमारती केडीएमसीच्या हद्दीबारेह तर तीन अस्तित्वात नाही
उर्वरीत ४७ इमारतीत नागरीकांचा रहिवास
सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी रहिवासियांकडे पर्याय आहे
याप्रकरणात जोपर्यत अन्य आदेश होत नाही. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार, प्रक्रिया सुरु
उद्या 19 फेब्रुवारीला देशभरात शिवजयंती साजरी होत आहे. शिवजयंतीसाठी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिव ज्योतनेण्याची अनेक मंडळांची प्रथा आहे.
त्याप्रमाणे आज शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. किल्ले रायगडावर जगदिश्वर मंदिरात पुजन करून शिवसमाधी स्थळी नतमस्तक होत शिवप्रेमी शिवज्योत प्रज्वलीत करीत असतात.
रायगडवरील शिवज्योत आल्यानंतर ठिकठिकाणी शिवजयंती साजरी होत असते.
मनसे नेते राजू उंबरकर यांना यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने दिला दिलासा
2017 मध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जिल्हा परिषद कृषी अधीक्षक कार्यालयात केली होती तोडफोड आंदोलन
राजू उंबरकर यांच्यासह 8 जणांवर झाले होते गंभीर स्वरूपाचे गुन्हे
या प्रकरणात यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
महारेरा घोटाळ्यातील ६५ इमारतीतील रहिवासी आयुक्तांची भेट घेण्यासाठी केडीएमसीमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी केडीएमसीत दाखल होणार आहेत. आयुक्तांसमवेत बैठक होणार आहे.
भिवंडी शहरातील ठक्कर प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाची दर मंगळवारी आढावा बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षातील नेते पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे दर आठवड्याला ही बैठक घेण्यात येणार आहे. यात पक्षाचे १४ नेते बैठकीला उपस्थित असणार आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीत ही बैठक पार पडली. लवकरच आमदार आणि खासदारांची देखील स्वतंत्रपणे बैठक होणार आहे. संघटना बांधणी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आता दर मंगळवारी बैठक होणार आहे.
सांगलीत डान्स बार सुरु होत असेल तर. महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार रोहित पाटील यांनी दिला आहे.
विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांवरील अपमानजनक मजकूर हटवा, भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी केली आहे.
विकिपीडिया या वेबसाईट प्लॅटफॉर्मवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपमानजनक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती प्रतिष्ठानने केला आहे. अपमानजनक मजकूर त्वरित काढून घेण्यात यावा, ही मागणी त्यांनी केली.
लाभार्थ्यांना रेशनमध्ये ज्वारी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.. मात्र अनेक रेशन दुकानावर वितरित केली जात असलेली ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आलय.. अनेक वर्षे साठवणुकीतील ज्वारी वितरित होत असल्याने ज्वारी खराब झाली असून त्यात किडेही पडले आहेत.. अहिल्याननगर जिल्ह्यातील राहाता येथील स्वस्त धान्य दुकानात रेशन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.. शासनाने माणसांना खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करताय..
सध्या छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने छावा चित्रपटाचे प्राईम टाईमचे दर कमी करा, अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पार्ले सन सिटी थिएटरच्या मॅनेजरकडे केली आहे.
उत्तर भारतामध्ये हवामान बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. साधारणपणे दोन दिवस उन्हाचा तडाखा असणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन टक्क्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात सध्या सकाळी ऊन आणि रात्रीच्या वेळेस वातावरणात गारवा जाणवत आहे.
मानधन नको वेतन पाहीजे,अंगणवाडी सेविकेला शासकिय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा,यासह इतर मागण्यांसाठी शकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयावर ठिया आंदोलन केले. अंगणवाडी सेविकाना साडे तेरा हजार रुपये तर मदतनिस यांना सात हजार रुपये मानधन दिले जाते,मात्र हे मानधन तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. यात वाढ करून वेतन देण्याची मागणी अदोलकांनी केली.
जालन्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर
वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी, जिल्ह्यातील 26 आरोग्य मित्र बेमुदत संपावर...
विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्रांचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...
उत्तर भारतामध्ये हवामान बदलामुळे तापमान वाढ झाली आहे
साधारणपणे दोन दिवस उन्हाचा तडाखा असा असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
साधारणपणे एक ते दोन टक्क्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असल्याच हवामान विभागाने म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजारांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाने सध्या राज्यभरात धुमाकूळ घातला आहे.
राज्यातील अनेक चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
अशातच आता पंढरपुरातील श्रेयश हॉटेल मालकाने प्रेक्षकांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. छावा चित्रपट पहा आणि हॉटेलच्या जेवणाच्या बीलावर 25 टक्के सूट मिळवा अशी ऑफर सुरू केली आहे.
श्रेयस हॉटेलचे मालक व मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर आज पासून छावा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुरू केली आहे.
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने शिवजयंतीचे औचित्य साझत मनमाड शहरातील सकल मराठा समाजा तर्फे आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी अकरा वाजे पासून सुरु झालेल्या या रक्तदान शिबीरात अनेकांनी रक्तदान करत रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान हे पटवून दिले.दुपार पर्यंत १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणार्या आरोग्यमित्रांच्या प्रलबिंत मागण्या सोडवण्याच्या मागणीसाठी आरोग्यमित्रांनी यवतमाळ मध्ये काम बंद आंदोलन करीत संप पुकारला आहे.मागण्याच्या संदर्भात संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत अधिकार्यांची बैठक झाली. मात्र, या बैठकीत तोडगा निघाला नाही.सहाय्य संस्थेच्या पदाधिकार्यांनी आरोग्यमित्रांच्या मागण्यांसंदर्भात मुदत मागितली होती. यानंतरही निर्णय न झाल्याने आरोग्यमित्रांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे
कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे या प्रमुख मागणीसाठी आज पश्चिम महाराष्ट्रातील वकिलांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पक्षकारांना न्याय मागण्यासाठी 500 किलोमीटरहून अधिक चा प्रवास करून मुंबईत उच्च न्यायालयात जावं लागतं. यामध्ये वेळ, श्रम आणि पैसाही खर्च होतो. त्यामुळे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं यासाठी गेल्या 40 वर्षाहून अधिक ही मागणी करण्यात येत आहे. या मागणीकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष होत असल्याने सरकारला जाब विचारण्यासाठी या पाच जिल्ह्यातील वकिलांच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढून तीव्र निदर्शने करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली दरम्यान धनंजय देशमुख यांनी हत्या प्रकरणाचा सगळा घटनाक्रम सुळे यांना सांगितला दरम्यान सांत्वनपर भेटीदरम्यान सुप्रीया सुळे या देखील गहीरवल्या कारण घटनाच ही तशीच आहे. तसेच सुप्रीया सुळे यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये अस सांगितलय माञ जे गावकरी आहेत त्यांनी जे भुमीका घेतील त्यात आम्हीही सहभागी असणार आहोत अस धनंजय देशमुख यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदार, ठेकेदारांची बिल अदा करण्यात आलेली नाहीत. राज्यात 27 हजार कोटी रुपयांची बिल थकीत असल्याचा आरोप ठेकेदार आणि कंत्राटदाराने केलेला आहे. एक मार्चपर्यंत ही बिल अदा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदार आणि कंत्राट दराने दिलेला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या कंत्राटदारानी आपल्या वाहनांसह वाजत गाजत बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. या कंतत्रालदारां सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.
बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण
मध्य रात्रीच्या सुमारास काटाळे गावात बिबट्याचा कोंबड्यांवर हल्ला,
शेतकरी प्रसाद पाटील यांच्या पोल्ट्री फॉर्मवर बिबट्याचा हल्यात 200 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
एक आठवडयापूर्वी काटाळे गावात एका बकऱ्याच्या गोठ्यावर बिबट्याच्या हल्ल्यात 10 बकऱ्यांचा मृत्य तर 9 गंभीर जखमी झाले होते,
बिबट्याच्या शोधात वन विभागाच दुर्लक्ष,त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता,
सांगलीच्या विटा, लेंगरे च्या गुजलेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वयंपाक घरात गॅसचा स्फोट झाला. यावेळी स्वयंपाक घराचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवंत हानी झाली नाही. शाळेपासून दूर असलेल्या पत्राच्या शेड मध्ये स्वयंपाकघर होते. सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी अधिकारी पोहचले आहेत.
गेली अनेक वर्ष कोल्हापुर आणि बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अनेक जंगली हत्तींचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. या हत्तींकडून ऊस पिकांचं आणि शेतीचं नुकसान ही होत असतात अनेक वेळा हे हत्ती गावात शिरून वाहनांचं आणि घरांचं नुकसान ही करतात. मात्र बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीतील एका शेतात एका हत्तीच्या मागे एक कुत्र लागल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. कुत्रं या हत्तीच्या पिल्लाला त्रास देत असून हत्तीचं पिल्लू देखील या कुत्र्याच्या मागे लागत असल्याचं या दृश्यांवरून दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
शहादा शहरात हिट अँड रनची घटना घडलीय. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या आसह मुलाला भरधाव वाहनाने चिरडले आहे. भरधाव कारने आई आणि मुलांचा जीव घेतलाय. अपघातात २२ वर्षीय मुलासह ५४ वर्षीय आईचा मृत्यू झालाय. कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी यासह विविध मागण्यांसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये आंदोलन सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपला शंकर पाटील यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केला आहे.महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावे विजेत्या महाराष्ट्र केसरी एक कोटीचे बक्षीस देण्यात यावं त्याबरोबर पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवावी,अशा प्रमुख मागण्यांसाठी चंद्रहार पाटलांनी आंदोलन छेडले आहे,पहिला टप्पा म्हणून सांगलीमध्ये आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून राज्य शासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास पुढच्या आंदोलन थेट मंत्रालयासमोर आमरण उपोषण करू,असा इशारा देखील डबल महाराष्ट्र केसरी पाटील यांनी दिला आहे.
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची गोदावरी नदीच्या ब्ल्यू लाईनमधील प्रस्तावित कामं सुरू होण्याआधीच वादात
- गोदावरी नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये होणाऱ्या प्रस्तावित पक्क्या आणि कच्च्या बांधकामांना गोदाप्रेमींचा विरोध
- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत प्रस्तावित कामांना विरोध
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, गोदा घाट आणि पंचवटी परिसरात अनेक विकासकामे प्रस्तावित
- रामकाल पथ उभारणी अंतर्गत रामकुंड परिसरातील गांधी तलावात प्रभू श्री रामाचं भव्य शिल्प प्रस्तावित
- गोदावरीच्या आरतीसाठी गोदा घाटावर कठडे
नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारीच्या अखेरीस शेतक-यांनी उन्हाळी हंगामातील पिक लागवडीसाठी मशागत करण्यास सुरूवात केली आहे. मशागतीची लगबग सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अर्धापुर, बारड, उमरी आणि भोकर परिसरात अतिवृष्टीमुळे मुबलक पाणीसाठा असल्याने या परिसरातील शेतक-यांनी मशागत करून उन्हाळी ज्वारी ,भुईमूग लागवडीसाठी मशागत करण्यास सुरूवात केल्याच चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.
हायड्रोलिक पद्धतीच्या रेतीच्या ट्रालीचा नट कसत असताना ट्रालीच अंगावर कोसळली. यात ट्रालीखाली दबून तरुण मजुराचा जागीच करुण अंत झाला. लोकेश भाकरू बुद्धे (वय २७, राहाणार बेटाळा) असे मृताचे नाव आहे. लोकेश हा वैनगंगा येथील बेटाळा रेती घाटावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी गेला होता. नदीपात्रातील ट्रॅक्टरमध्ये पूर्णपणे रेती भरून झाली. यावेळी हायड्रोलिकमधून ऑइल येत होते. त्यामुळे लोकेशने हायड्रोलिक वर केले. ऑइल कुठून लिकेज होत आहे, हे बघायला तो गेला. हायड्रोलिक बघितल्यावर तेथील लोखंडी नट पाणाने कसायला सुरुवात केली. नट कसत असताना हायड्रोलिकची ट्रॉली अकस्मात खाली कोसळली.यात ट्रॉलीच्या खालच्या भागात तो पूर्णपणे सापडला. हायड्रोलिकच्या जागेवर त्याची मान व खांदा सापडला गेल्याने त्याला तेथून निघता न आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच मोहाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. ट्रॅक्टरमध्ये सापडलेल्या लोकेश बुधे याला बाहेर काढण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यात महाविकास आघाडीची संघटनात्मक बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष उपस्थित होते. महापालिका निवडणुका लवकरच लागणार त्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी कामाला लागलीय. पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरवात झाली आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अद्यापही सुरू आहे असे असताना डिसेंबर मध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. एका वर्षात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणे अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेचे महत्व कमी होईल. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठी परंपरा इतिहास आहे. संपूर्ण देशातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही स्पर्धा जोडली गेली आहे. तिचा सन्मान कायम ठेवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून कुस्तीतील मोठ्या लोकांनी एकत्र यावे आणि यावर तोडगा काढावा असे चंद्राहार पाटील यांनी म्हटलेले आहे. यासाठी आज ते एक दिवसाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या आज मसाजोग या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्या परळीतील महादेव मुंडे यांच्या पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.... दरम्यान भेटीपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या खून प्रकरणाचा तपास हा (SIT)एसआयटी किंवा सीआयडीकडे( CID) कडे देण्याची मागणी केलीय...,
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन एक आठवडा होत आहे. मात्र केवळ चौकशी केली जातेय. प्रकरणाला साधारण दीड वर्ष पूर्ण होत आहे.. तरी देखील न्याय मिळत नाही.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी...
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली जातं आहे.सोलापूरच्या चार हुतात्मा पुतळ्यासमोर सलग 19 तास, 19 मिनिट आणि 19 सेकंद दांडपट्टा चालवून छत्रपती शिवाजी महाराजांना ही म्हणवंदना दिली जातं आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सलग हा दांडपट्टा चालवला जाणार आहे.ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन आणि भारतीय लाठी महासंघाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय.सोलापुरात 7 मावळे हा दांडपट्टा चालवण्यासाठी मैदानात उतरल्याच चित्र दिसून येत आहे.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..
अमरावती महानगरपालिकेकडून शहरात थकीत मालमत्ता कर विरोधात कारवाया सुरू....
25 कार्यालय व अनेक आस्थापनांकडे धडकले महानगर पालिकेचे वसुली पथक...
आज पर्यंत 40 कोटीच्या वर गेली नव्हती वसुली परंतु आता प्रथमच 60 कोटी पर्यंत वाढली आहे..
एक लाखांपेक्षा अधिक कर असलेल्या थकबाकी दारांविरोधात कारवाई सुरू..
वाशिम जिल्ह्यातील कारंजा,रिसोड, वाशिम आणि मंगरुळपिर या चारही एसटी आगारातील बसेस खिळखिळ्या झाल्याने त्या रस्त्यातच नादुरुस्त होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या चारही एसटी आगारातील एकूण 156 बसेस पैकी अनेक बस 10 वर्षा पेक्षा अधिक आयुर्मानाच्या झाल्याने त्या कित्येकदा रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यासाठी वाशिम जिल्ह्यातील एसटी आगारांना नवीन बस देण्याची मागणी प्रवाशी संघटनांनी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात नेत्यांनी बीडमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली. आज बीडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्या आईला अश्रु अनावर झाले आहेत. 'मी कुठ माझ लेकरु शोधू, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला संरक्षण द्या', अशी मागणी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली. यावेळी सुप्रीया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांना धीर दिला.
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत नागपूरमधून चोरलेला ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा लसूण जप्त केला आहे.
सुप्रीम कॉलनीत एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बेकरीतून ४ लाख ८५ हजार रुपयांचा लसून जप्त केला. बेकरी मालक या मालाविषयी विचारले असता, त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे
सुप्रिया सुळे यांच्यासमोर देशमुख कुटुंबियांना अश्रु अनावर
आम्ही खुप आनंदी होतो पण आता सावरणे खुप अवघड आहे
वैभव देशमुख यांनी सुप्रीया सुळे यांना सांगितली वडिलांच्या हत्येची माहिती
भंडारा वनविभागाच्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सीतासावंगी कक्ष क्रमांक 65 राखीव वनात एक नर वाप मृतावस्थेत आवळून आला. ही घटना गुराख्यांमार्फत उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (SOP) गठित समितीने घटनास्थळ आणि मृत बाधाची पाहणी केली. घटनास्थळी झालेल्या प्राथमिक तपासणीत मृत वाघ हा अंदाजे 3 ते 4 वर्षे वयाचा नर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या तोंडावर, मानेवर आणि मागील पायावर जखमा आढळल्या असून, मृत वाघाचे सर्व अवयव साबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुवैद्यकीय अधिका-यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाल्याची शक्यता आहे
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मासाजोग मध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुलगी वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंब यांची सुप्रिया सुळे आज सांत्वन भेट घेणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी वॉटर स्प्रिंकलर टँकर महानगरपालिकेने खरेदी केला आहे. या टँकरद्वारे विविध प्रकारे रस्ता स्वच्छता व पाणी फवारणी करता येते. हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी या मशिनद्वारे हवेत पाण्याने फॉगिंग करणे, रस्त्यावरील धुलीतन कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्पिंकलद्वारे धुणे, डिव्हायडर धुणे, डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठी सुद्धा या गाडीचा वापर करता येणे शक्य आहे. या गाडीचा काल पासून शहरातील मुख्य रस्त्यावर वापर सुरू करण्यात आला आहे. या गाडीचा दैनंदिन वापर जेथे मोठ्या प्रमाणात धुलीकन हवेत आहेत आणि जिथे जास्त प्रमाणात वाहतूक आहे अशा ठिकाणी वापर करून शहरातील प्रदूषण कमी करण्यात येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत 74 कॉपी बहादर सापडले...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जात असून,
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत नाही...
सोमवारी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळी एकूण 74 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले...
छत्रपती संभाजी नगर विभागांमध्ये प्रत्येक पेपरला सर्वाधिक कॉपी प्रकरणी आढळून येत आहे...
नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.नांदेडच्या किनवट तालुक्यातील मानसिंग नाईक तांडा,तोटंबा भागात अचानक भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतातील उभी पिके करपून गेली आहेत.बदलत्या हवामानामुळे येंदा शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यातच आता रब्बी हंगामातील पिके पोटच्या मुलांसारखी वाढावीली असताना किनवट तालुक्यातील टोटंबा या भागातील पिके आता पूर्णतः करपून जात आहेत.दरवर्षी या भागात मे महिन्या पर्यंत पाणी पातळी कायम राहते.येंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभा टाकलं आहे.रब्बी हंगामातील गहू,हरभरा,मक्का,ज्वारी यासारखी पिके पाण्या अभावी करपून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.शासनाने या भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलीय.
- नागपूर जिल्ह्यातील 5750 रेशन लाभार्थी हे शासकीय, निमशासकीय सेवेत असतानाही रेशनच्या मोफत धान्याचा लाभ घेत होते.. त्यांचे रेशन कार्ड अपात्र ठरविण्यात आले.
- यामध्ये शहरातील 3589 तर ग्रामीण भागातील 2161 शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश..
- शासनाच्या सेवार्थच्या तपासणी ही बाब आढळून आल्यानंतर अन्नपुरवठा विभागाची कारवाई...
- अन्न पुरवठा विभागाकडून कारवाईचे संकेत दिले होते, त्यानंतर काहींनी स्वतःहून नाव कमी करून घेतले होते.
- नागपूर जिल्ह्यात आठ लाखांच्यावर रेशन कार्ड धारक असून त्यांना मोफत स्वस्त धान्याचा लाभ मिळतो...
देहुरोड च्या गांधीनगर भागात तेरा फेब्रुवारी ला गोळीबाराची घटना मध्यरात्री घडली होती, यात विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला होता. यामुळे मावळात एकच खळबळ उडाली होती. नंदकिशोर यादव यांच्या घरी भावाच्या मुलीचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान आरोपी शाबीर शेख व साईतेजा चितमला यांची नंदकिशोर यांच्या किरकोळ वादातून भांडण झाले होते. त्यात शाबीर शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विक्रम गुरूस्वामी रेड्डी यांच्यावर गोळाबार केला यात त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा पासून आरोपी फरार झाले होते. याबाबत पोलिसांनी तीन पथके तयार केली होती, आता दोन आरोपींना जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. देहुरोडच्या पोलीसांनी साबीर शेख साईतेजा चितमला उर्फ जाॅन याला सोलापूर येथुन अटक केली आहे. तर फैजल शेख हे अद्याप फरार आहे. तर रझिया शेख या महिलेला पोलीसांनी अगोदरच अटक केली आहे...
पुणे कोथरूड येथे रस्त्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला महापालिकेने शोधून काढून पाच हजार रुपयांचा ऑनलाइन दंड भरण्यास भाग पाडले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातर्फे ही कारवाई करण्यात आली.
आरोग्य निरीक्षक करण कुंभार व मुकादम वैजीनाथ गायकवाड हे कोथरूड भागात पाहणी करत असताना त्यांना कमिन्स कंपनीच्या मागील सार्वजनिक रस्त्यावर जैववैद्यकीय टाकल्याचे निदर्शनास आले. हा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने या दोघांनी या कचऱ्यात काही माहिती मिळते का याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांना त्यात एका कागदावर एका व्यक्तीचे नाव मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर संपर्क साधून कचरा टाकल्याबद्दल चौकशी केली.
येरवडा, लक्ष्मीनगर परिसरात १२ रिक्षा आणि दोन दुचाकींची तोडफोड करणाऱ्या सराइताला येरवडा पोलिसांनी अटक केली. ज्या भागात गुंडाने वाहनांची तोडफोड केली, त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली.
दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पुणे विभागाकडून उत्तरेकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्या पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात येत आहेत. महाकुंभसाठी प्रवाशांची गर्दी असल्याने रेल्वे सुरक्षा पोलीस, सुरक्षा रक्षक आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणारा महाकुंभ अंतिम टप्प्यात असताना प्रवाशांची प्रयागराजच्या दिशेने जाण्यासाठी धडपड कायम आहे. रस्ते मार्ग, रेल्वे आणि हवाई सेवेला अद्यापही मागणी आहे. त्यातच दिल्ली येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊन चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ व्यक्तींचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक स्थानकावर सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून दानापूरला जाणारी साप्ताहिक रेल्वे कडेकोट बंदोबस्तात प्रयागराजच्या दिशेने रवाना करण्यात आली.
कोथरूड परिसरात सातत्याने डुकरांचा मृत्यू होण्याचे कारण अखेर समोर आले आहे. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून उघड झाले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथक नेमले असून, ते परिसरात तपासणी करीत आहे.
कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत. यातील एका डुकराचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या रोग नियंत्रण केंद्राने या डुकराच्या अवयवांची तपासणी केली. डुकराच्या अवयवांमध्ये कार्बामेट हे विष आढळून आले.
नांदेड गाव परिसरात गुइलेन बॅर सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्राची तपासणी सुरू केली आहे. कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचा संसर्ग आढळून आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरले आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि जागतिक विमानतळ सेवा गुणवत्ता (एसक्यू) सर्वेक्षण अहवालानुसार पुणे विमानतळाचे स्थान उंचावले आहे. विमानतळाने ७४ व्या स्थानावरून ६७ व्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, विमानतळावरील असुविधांबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम असल्याने सेवासुविधांच्या बाबतीत घसरण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वसतिगृहातील रिक्त जागांवर अल्पसंख्याक समाजातील दहावी ते बारावी, आयटीआय, पदविका, तंत्रनिकेतनांतील विद्यार्थिनींनाही प्रवेश दिला जाणार असून, या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनींची सोय होऊ शकणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २८ फेब्रुवारीला पक्षाचे विद्यामान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदारांची बैठक बोलाविली आहे. मुंबई येथे ही बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षाने बारावीच्या परीक्षेला स्वतःच्या जागी डमी परीक्षार्थी बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अरबाज अस्लम कुरेशी असं या शहराध्यक्षाचं नाव असून त्याचा डमी म्हणून बसलेल्या अहमद खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
2014 मध्ये एप्रिलपासून तुरीच्या दरात सुधारणा झाली आठ ते नऊ हजार रुपये क्विंटलची तुर नोव्हेंबर महिन्यात 12 हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहोचली मात्र डिसेंबर आखरेच्या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली. 12 हजारांवरून तूर आता थेट सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत खाली आली आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय बाजार समितीमध्ये तूरीची आवक वाढली मात्र आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तुरीची विक्री करावी लागत आहे.
बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाली आहेत. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अध्यापही फरार आहे. त्याचा शोध घ्यावा व त्याला अटक करावी अशी मागणी काल मसाजोग मध्ये गावकऱ्यांनी बैठकीमध्ये केली आहे. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आज सकाळी 9:00 वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सांत्वन पर भेट घेणार आहेत. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे परळी येथे 11:00 वाजता महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 16 महिने पूर्ण झाली आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एकही आरोप अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक केला नाही खासदार सुप्रिया सुळे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परळी येथे देखील जाणार आहेत. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित राहणार आहेत खासदार सुप्रिया सुळे मसाजोग मधनं काय मागणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन, तूर ही पिकाच नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आल्याचे पुढे आले कृषी विभागाच्या अहवालावरून या प्रकरणात ऑक्टोंबर 2024 मध्ये पीक विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता या गुन्हाचा तपास एसआयटीमार्फत केला जात आहे.
यवतमाळ शहराची 2016 मध्ये हद्द वाढ करण्यात आली लगतचे ग्रामपंचायत क्षेत्र नगरपालिकेत समाविष्ट केले गेले त्यावेळी कर आकारणी करताना नगरपालिकेने थेट मालमत्ता मूल्यांकन करून नवी आकारणी केली ही कराकारणी नियमानुसार नसल्याची याचिका प्रथम श्रेणी न्या दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली त्यावर न्यायालयाने नगरपालिकेची कर आकारणी नियमानुसार नसल्याने ती रद्द करण्याचा आदेश दिला.
जालन्यातील जुनी एमआयडीसी भागामध्ये असलेल्या एका कुलरच्या साहित्य बनवनाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागलीय . या आगीत कंपनी मधील साहित्य जळून खाक झाल,सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र याआगीमध्ये लाखो रुपयांचे कुलरच साहित्य जळून खाक झाले आहे . पहाटे पर्यंत ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, होते.दोन तासानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल, दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर येऊ शकल नाही.
किल्ले शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला परिसर भगवामय झाल्याचे पहायला मिळत असुन महाद्वारावर विद्युत रोषणाई सह भव्य कमानी उभ्या करण्यात आल्यात राज्य सरकारच्या वतीने पाच दिवसांचा शिवनेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये बैलगाडा शर्यत कुस्तीचा आखाडा,महिला बचत गटाचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण परिसर रंगरंगोटीने करुन सजविण्यात आलाय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने किल्ले शिवनेरीच्या परिसरात भल्या मोठ्या कमानीनी संपुर्ण परिसर बोलका झालाय
शासनाने नागपूर- गोवा द्रुतगती शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित केला असून यवतमाळ जिल्ह्यातील चार उपविभागातून हा महामार्ग जाणार असून भूमी अभिलेख विभागाने मोजणीसाठी पैसे भरावे असे पत्र दिले मात्र एमएसआरडीने अजूनही पैसे भरले नाही त्यामुळे भूसंपादनाला घोडा बसला आहे.
जालन्यातील घनसावंगी येथे शिवजयंती आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडलीय. अंबडचे डीवायएसपी विशाल खांबे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलीय. यावेळी डीवायएसपी विशाल खांबे यांनी शांतता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करत शिवजयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. या बैठकीला घनसावंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव अनियमित सेवेमुळे आणि सेवेचा विस्तार वाढत नसल्यामुळे इंडिगोसारख्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करावी, या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे.काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव विमानतळावर दाखल झाले.होते विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विकासाचा आराखडा सादर केला.तसेच या आराखड्यांतर्गत येणाऱ्या अडचणींविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच धावपट्टीवाढीसाठी मंजूर केलेल्या निधीनुसार होणाऱ्या कामाविषयीदेखील माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली.
जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी छापा मारलाय. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या 2 दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. त्या माहिती वरून पोलीस पथकाने नवीन मोंढा येथील दुकानांवर छापा मारून 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज आणि उद्या दोन दिवस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे ते आज मुक्कामी असणार आहेत. तर उद्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची महापूजा करून ध्वजारोहण करणार आहेत. पुढे धाराशिव शहरातील शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे बस मधून प्रवास करणार आहेत. 19 आणि 20 फेब्रुवारी असे दोन दिवस ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असून या काळात सोलापूर ते धाराशिव असा प्रवास ते एसटी बस मधून करणार आहेत. एसटी बसेसची सद्यस्थिती व कराव्या लागणाऱ्या सुधारणा या संदर्भात ते यावेळी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांशी संवाद साधतील.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा यवतमाळ जिल्हा भाजपचे संपर्क मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला यावेळी मंत्री उईके यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख सदस्य नोंदणी केली जाणार अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
:शेतकरी अनुदानासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.सुभाष कदम असे या शेतकऱ्याचे नाव असून कसबे तडवळे येथील तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्याने अनुदान मिळण्यास अडथळा येत असल्याने त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
रायगड जिल्ह्यातील विठ्ठल भक्त मीना राजेंद्र पाटील यांनी पावणे दोन लाख रूपये किंमतीची सोन्याच्या पानाची माळ विठ्ठलाला अर्पण केली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी भाविक मीना पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.
कापूस खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर गत दहा दिवसांपासून बंद पडल्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला असून प्रारंभी एका दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर होईल असे सांगितले गेले मात्र प्रत्यक्षात दहा दिवस झाले तरी यातील तांत्रिक अडचणी दूर झाली नाही यामुळे शेतकऱ्यांची हमी केंद्रावरील कापूस खरेदी वांद्यात सापडली आहे.
जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेंदुर्णी येथे कुस्ती स्पर्धेनिमित्त आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करण्याची तयारी केली. मात्र, फडणवीसांनी हा प्रवेश थांबवून वाघ यांना मुंबईला येण्याच्या सूचना दिल्या आहेत.दौऱ्याच्या ठिकाणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट भाजप प्रवेशासाठीची होती. दरम्यान, वाघ यांच्या भाजप प्रवेशाला फडणवीस यांनी तात्पुरता थांबवून मुंबईला येऊन प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, प्रवेश थांबविण्यामागे अनेक कारणे पुढे येत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याची मागणी आहे.
अंबरनाथ पश्चिम येथे बुवापाडा परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका गोडाऊनला आग लागली होती, या आगीत गोडाऊन जळून खाक झाले असून अग्निशमन दल तात्काळ दाखल झाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे, बुवापाडा परिसरात शारदा चौक येथे हे गोडाऊन असून त्यात कापूस आणि लाकडीचा साठा ठेवण्यात आला होता, सोमवारी रात्री अचानक या गोडाऊन मध्ये आग लागली, लागलीच स्थानिकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवले, गोडाऊन मध्ये आग कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही.
- फुटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृतपणे लॉन आणि निवासी इमारत बांधल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला
- गिट्टीखदान पोलिसांनी माजी नगरसेवक कमलेश चौधरी, त्यांची आई आणि लहान भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय
- पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि अन्याय निवारण मंचाचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी याबाबत तक्रार केली होती.
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने या तक्रारीची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली
-
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.