Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Marathi Breaking Live Headlines Updates : MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्यात उकाडा वाढला, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, शिवसेना सुनावणी, राहुल गांधी आंदोलन, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

छत्रपती संभाजीनगर- जिल्ह्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात

दुष्काळी परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ ऑक्टोबरपासून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कडा अधीक्षक अभियंत्यांना दुष्काळी पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले आहेत. भविष्यातील परिस्थितीनुसार कपातीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याला प्राधान्य असणार आहे.

घरगुती वापरासाठी पाणी एका विशिष्ट मापदंडानुसार घ्यावे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीगळतीसाठी मोहीम राबवावी. पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. उद्याने, दुभाजकातील झाडांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे. बांधकाम, औद्योगिक, धुलाई, हरितक्षेत्रांसाठी हेच पाणी वापरावे. तर मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पातून अनधिकृत जलउपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.

नागपुरात ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका; तापमान ३६.२ अंशांवर

नागपुरात ऑक्टोबरच्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मंगळवारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. सकाळपासूनच सूर्याच्या तीव्र किरणांमुळे नागरिक हैराण होत आहेत. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे

सर्पदंशाच्या ९९.९ टक्के रुग्णांचे प्राण वाचले; पुणे जिल्ह्यात २८ महिन्यांत ३ हजारांहून अधिक घटना

सर्पदंशाला अनेकदा प्राणघातक घटना मानले जाते. मात्र, वेळेत उपचार मिळाल्यास सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत पुणे जिल्हा आणि परिसरात सर्पदंशाच्या ३ हजार ८४ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ३ हजार ८२ रुग्ण म्हणजेच ९९.९ टक्के रुग्ण उपचारांनंतर सुखरूप बचावले, तर केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते जुलै २०२६ या २८ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात मंचर, चांदोली, भोर आणि जुन्नर हे सर्पदंशाचे प्रमुख हॉटस्पॉट ठरले. विशेषतः पावसाळ्यात आणि शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना सर्वाधिक घडतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

Pune : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील तर निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com