Maharashtra Live Update: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे निषेध आंदोलन

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 18th December 2024 : आज बुधवार, दिनांक १८ डिसेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, संसदेत वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा, महाराष्ट्रात थंडीची लाट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 12 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे निषेध आंदोलन

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन केले जाणार आहे. हे निषेध आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथे करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे. संविधानवादी आणि फुले आंबेडकरवादी जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.

शिवसेना आमदार विजय शिवतारेच्याविरोधात अंधेरीत आरपीआय कार्यकर्ते आक्रमक

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात विजय शिवतारे यांनी पदाचा गैरवापर करून जमिनीवरील झोपड्या तोडल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला. आमदार विजय शिवतारे यांनी गरिबांच्या झोपड्या लॉकडाऊन मध्ये पदाचा गैरवापर करून तोडल्याचा आरोप आहे.

बोटीच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू- फडणवीसांची माहिती

मुंबईतील गेटवेजवळी दोन बोटींचा अपघात झाला. एका स्पीड बोटीने प्रवासी बोटला धडक दिली होती. त्यात १३ जणांचा मृत्यू झालाय.

Maharashtra Politics: रणधीर सावरकर भाजपचे नवे मुख्य प्रतोद

भाजप नेते रणधीर सावरकर यांची विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रणधीर सावरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याआधी आशिष शेलार मुख्य प्रतोद होते.

Mumbai Sea Boat Accident: समुद्रात बुडालेल्या बोटीतून ७७ जण बचावले, एकाचा मृत्यू, पाच जण बेपत्ता

मुंबई: गेटवेकडून एलिफंटाला जाणारी बोट उलटली. त्यात ८० प्रवासी असल्याची माहिती आहे. जीवरक्षकांनी ७७ जणांना वाचवलं. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. पाच जणांचे बचावकार्य सुरूय.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, ६६ जण बचावले, तिघांचा मृत्यू

एलिफंटाला जाणारी दोन बोटी एकमेकांनी धडकली. ज्यात ८० प्रवासी असल्याची माहिती आहे. त्यातून ६६ जणांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसने नेहमीच संविधानाचा अपमान केलाय - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काँग्रेस हा संविधानविरोधी पक्ष आहे काँग्रेसने सावरकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेसने आणीबाणी आणून राज्यघटना फाडली. लष्करांचा अपमान केला. भारताची सीमा तोडून परक्या देशाला देण्याची हिंमत केली, असं अमित शहा म्हणाले.

मुंबईकडून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत ३०-३५  प्रवासी असल्याची माहिती

मुंबई: मुंबईकडून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटली आहे. या बोटीत ३० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. गेटवेकडून ही बोट एलिफंटाला जात असताना बोट उलटली. ज्यामध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, प्रवाशांचे बचावकार्य सुरूय.

गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केला असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आलाय. दरम्यान, आज लातूरच्या महात्मा गांधी चौकात काँग्रेस कमिटीच्यावतीनं अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निषेध नोंदवण्यात आला.

अमित शहा घेणार महत्वाची पत्रकार परिषद

दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होणार आहे. पत्रकार परिषदेत अमित शहा कोणत्या मुद्द्यावर बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Maharashtra Live Update: गुणरत्न सदावर्ते याच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सदावर्ते जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत अडवण्याचा केला प्रयत्न

सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुण रत्न सदावर्ते करत असल्याचा केला आरोप

तुळजाभवानीचे दर्शन व एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते आले आहे तुळजापुरात

Vegetable Price: फूलगोबीला मिळतोय कवडीमोल भाव, शेतकरी अडचणीत

अँकर:- बाजारात सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फूलगोभी सारख्या भाज्यांना तर आता बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे फुलगोबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील रामराव नांदेडकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमध्ये फुलगोबी ची लागवड केली होती. त्यांची फूलगोबी सध्या काढणीला आलेली असून बाजारात या फुलगोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने आता ही फूलगोबी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे ते सांगत आहेत. एक एकर फूलगोबी लागवडीसाठी त्यांना 80 ते 90 हजार रुपये खर्च आला. या एक एकर मधून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. परंतु लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने फुलगोबी उत्पादक शेतकरी रामराव नांदेडकर हे हतबल झाले आहेत.

पुण्यातील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेने जाहीर केलं स्पष्टीकरण

पुण्यातील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेने जाहीर केलं स्पष्टीकरण

एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या समुपदेशाकडे केली होती तक्रार

शाळेने या प्रकरणी तात्काळ दखल घेतलेली आहे

घडलेला प्रकार तात्काळ पोलिसांना आम्ही सांगितलं असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे

संबंधित नृत्य शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल झाला आहे

याच प्रकरणाचा तपास करत असताना संबंधित शिक्षकाने आणखी एका विद्यार्थ्यासोबत देखील असाच प्रकार घडल्याचं उघडकीस आलं

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमचं प्राधान्य असून नव्याने शिक्षक भरतीच्या दरम्यान आम्ही गंभीर दखल घेऊन काळजी घेऊन असे स्पष्टीकरण शाळेकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Live Update: परभणी आणि बीड येथील घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलं

- ⁠मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं

- ⁠न्यायालयीन कोठरीत मूर्ती मुखी पडलेल्या परभणीतील युवकाच्या कुटुंबीयांना आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली

- ⁠दोन्ही घटनांमधील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आंदोलकांची मागणी

- ⁠बीड मधील संतोष देशमुख हत्ते प्रकरणी वाल्मीक कराड याला अटक करण्याची आंदोलकांची मागणी

- ⁠केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यांचा निषेध. शहा यांना बाबासाहेब आंबेडकर समजलेलेच नाहीत त्यामुळे त्यांनी असं विधान केल्याचा आरोप.

Maharashtra Live Update: लाल कांद्याच्या भावात घसरण सुरूच

मनमाड बाजार समितीत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 300 रुपयांची घसरण...

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल...

काल सरासरी 2100 रुपये प्रतिक्विंटल विकलेल्या कांद्याला आज 1800 रुपये सरासरी भाव...

कांद्याची आवक वाढल्याने कांदा भावावर होतोय परिणाम

पुण्यातील शाळेत झालेलं लैंगिक अत्याचार प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली उडी

ज्या शाळेत प्रकार घडला त्या शाळेच्या संस्था चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी ने केली आहे.

संस्थेच्या हलगर्जीपणामुळे शाळेतील शिक्षकाने हे कृत्य केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी ने केला आहे.

शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या बाबत सुद्धा असा प्रकार घडला आहे का या अनुषंगाने सुद्धा तपास व्हावा अशी पक्षाची मागणी.

शाळेत असलेले सी सी टिव्ही यांची संख्या वाढवावी, पालक शिक्षक यांच्यातील बैठका सुद्धा सातत्याने व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी ने केली आहे.

Maharashtra Live Update: डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत विरोधकांचा सभात्याग

Beed News : बीड पोलिसांची मोठी कारवाई

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा प्रमुख आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात...

हत्या प्रकरनात मास्टरमाइंड म्हणून चाटेवर होतोय आरोप

तथा पवनचक्की अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली देखील विष्णू चाटेवर गुन्हा दाखल झाल्याची नोंद

बीड परिसरातून च चाटेला घेतल ताब्यात..

भाजप आमदारकडूनच विधिमंडळ कामकाजाचे वाभाडे

तुरीच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांची चिंता वाढली

वाशिम जिल्ह्यात तुरीचा दर ९ हजार रुपयांखाली घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवक कमी झाली असूनही तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यंदा वाशीम जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली असून, मागील हंगामात १३ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उत्पादन वाढवले होते. मात्र अचानक तुरीच दर 9 हजार च्या आत घसरलेल्या मागील दोन वर्षात सर्वात कमी दरांने तूर विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

Maharashtra Live Update: जयंत पाटील विधानभवनात दाखल झाले. पण जयंत पाटील यांनी पायर्‍यांवर विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. दोन दिवसांपासून जयंत पाटील अधिवेशनाला गैरहजर होते.

Maharashtra Live Update: छगन भुजबळ यांच्या भेटीला शरद पवार गटाचे नेते.

छगन भुजबळ यांच्या भेटीला आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर आले आहेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू

ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार

भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिक मधे जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता

सूत्रांची माहिती

Sangali News: सांगलीत 50 हजाराची लाच घेताना महिला पोलीस जाळ्यात

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवलदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर हिला 50 हजार रुपये लाज घेताना लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलिसात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी बडेकरी हिने केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करून पथकाने काल रात्री सांगलवाडी येथे सापळा रचला तिथे तिला लाज घेताना रंग हात पकडले. संशयित विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tanaji Sawant: तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत

आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे परंडा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सावंत यांना डावलल्यामुळे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व सरपंच लवकरच आपले सामूहिक राजीनामे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठवणार आहेत. बैठकीला तालुक्यातील १५ सरपंचांचीही उपस्थिती होती. पुन्हा एकदा मंत्री मंडळात तानाजी सावंत यांना स्थान द्यावे अशी मागणी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Federal Bank: फेड बँकेची कर्मचारी आणि शेतकऱ्यांकडुन फसवणुक 27 जणांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील फेड बँकेचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मिळुन बँकेला तब्बल १ कोटी २७ लाख ७१ हजार रुपयांचा गंडा घातलाय.

फेडरल बँकेची सबसीडरी बँक असलेल्या फेड बँकेला शिरूर परिसरातील शेतकरी नागरिकांनी बँक कर्मचारी अशा २७ जणांनी बनावत कागदपत्रे सातबारा बनावट प्रॉपर्टी दाखवून बँकेचीच फसवणूक केलीय. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी यातील काही मुख्य आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केलाय.

Weather Update: सांगली जिल्ह्यामध्ये थंडी वाढली, पारा १३ अंशापर्यंत खाली घसरला

सांगली जिल्ह्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढत आहे. जिल्ह्यात पारा घसरला असून, मंगळवारी कमाल तापमान १३ अंश सेल्सअस नोंदवले. बोचऱ्या थंडीमुळे आता पहाटे व सायंकाळी शहरासह ग्रामीण भागातील जीवनशैली बदलली आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढली असून, हिवाळ्यात व्यायाम करणे चांगले असल्याने पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार तीन दिवस थंडी आहे.

अवकाळी पावसामुळे थंडीचे आगमनही लांबणीवर पडले होते. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान घसरले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाच्या कडाक्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमानात मात्र रात्रीच्यावेळी चांगलीच घट दिसून येत आहे. किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Maharashtra Live Update : निलंगा शहरात मोकाट कुत्र्यांनी 2 हजार 336 जणांचे तोडलेले लचके

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता पर्यंत 240 दिवसात 2 हजार 366 व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. दरम्यान नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे . मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम कागदावरच असून, नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत.. त्यामुळे तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Maharashtra Live Update: नॉट रिचेबल अजितदादा नेटवर्कमध्ये आले

मागील २ दिवस कोणालाही न भेटलेले अजित पवार आज कार्यकर्त्यांना भेटत आहेत. सकाळपासूनच विजयगड बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूरमधील थंडीमुळे त्यांना त्रास झाला असेल पण आता ते ठीक आहेत. आज ते विधी मंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती देखील पदाधिकारी देत आहेत. विजयगडवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली आ

weather update in marathi : थंड हवेचे ठिकाण असलेलं तोरणमाळ गारठलं

थंड हवेचे ठिकाण असलेलं तोरणमाळ गारठलं....

कश्मीर सारखी सातपुड्यात थंडी नागरिकांना भरली हुरहुडी....

तोरणमाळ मध्ये तापमानाचा पारा 6 अंशांचा पेक्षा खाली...

नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट.....

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये काश्मीर सारखी थंडी....

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या तोरणमाळचा घाटात धूक्याची दाट चादर बर्फ पडल असल्याचा भास....

दाट धुक्यात हरवलला प्रसिद्ध यशवंत तलाव....

Maharashtra Live Update: अमरावती शहरात आजपासून 1जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37 नुसार शहरात प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहे. हा आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 18 डिसेंबर ते एक जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पर्यंत लागू राहणार आहे. या कलमांचे भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी काढले आहे.

tulja bhavani temple : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेली दोन दिवसापासून भाविकांची गर्दी वाढली

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर गेली दोन दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती,देवीचा कुलधर्म,कुलाचार करण्यासाठी राज्यासह आंध्रप्रदेश प्रदेश, कर्नाटक,तेलंगना या राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे मंदीर परीसर भाविकांनी फुलुन गेलेला पाहायला मिळाला.

Maharashtra Live Update : दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेची तयारी पूर्ण

नांदेडच्या माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या यात्रेला 29 डिसेंबर पासून सुरूवात होत आहे.दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेची ओळख आहे.पाच दिवस भरणाऱ्या या यात्रेचे नियोजन नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत.दरम्यान माळेगाव यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कुठलेही गैरसोय होणार नाही,पशु पालकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.

Washim News :  माणगावमधील माजी सैनिक विश्रामगृहाचा बनला भूत बंगला

माणगावमधील माजी सैनिक विश्राम गृहाची पार दुरवस्था झाली आहे. विश्रामगृहाच्या परिसरासह भिंती आणि छप्परावर झाडा झुडप वाढली आहेत. दरवाजे खिडक्या आणि पाट्या देखील तुटलेल्या आहेत. छप्परावरील कौले उडून गेली असून इमारत देखील मोडकळीस आली आहे. ऊन वारा पाऊस आणि थंडी यांची तमा न बाळगता देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या, वेळप्रसंगी बलिदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या माणगाव येथील सैनिक विश्रामगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामिण भागात रहाणाऱ्या सैनिक आणि माजी सैनिकांसाठी माणगाव या मध्यवर्ती ठिकाणी विश्राम गृह ही सुविधा महत्व पूर्ण आहे. विश्रामगृहाची नूतन इमारत बनावी यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तेत महायुतीचे नवीन सरकार आले असून ते माजी सैनिकांच्या या महत्व पूर्ण सुविधेकडे लक्ष देऊन नुतन इमारतींची मागणी पूर्ण करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Mumbai-Pune : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू 

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या लेन वर वडगाव मावळच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती समजताच घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल होत मृत बिबट्याचे शरीर हे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sangli Crime News :  आयुक्तांच्या गाडी अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करा - एमआयएम पक्षाची मागणी.

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताची सीआयडी चौकशी करावी,अशी मागणी एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. सांगली शहरातल्या स्फूर्ती चौक या ठिकाणी 2 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या शासकीय वाहनातून जात असताना आयुक्त शुभम गुप्ता यांच्या वाहनाचा अपघात झाला होता,ज्यामध्ये ते गंभीर जखमी देखील झाले होते..दरम्यान आता या अपघाता प्रकरणी एमआयएम पक्षाच्यावतीने हा घातपात होता की अपघात होता? असा प्रश्न उपस्थित करत, याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे असून या प्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी, त्याचबरोबर अपघाता दरम्यान आयुक्तांसोबत आणखी कोण होतं? अशा सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महेश कुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे केली आहे.

Crime News : दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यास सिनेस्टाईल लुटले, सात लाखांचा ऐवज घेऊन चोरटे फरार

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जखमी करून सराफा व्यापाऱ्याजवळील सात लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात सराफा व्यापारी व त्याचे साथीदार दोघेही जखमी झाले आहेत. स्वप्निल करे असं स्वरा व्यापाऱ्याचे नाव असून हे व्यापारी जळगाव खानदेश वरून आसलगाव कडे जात असताना ही घटना घडली. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद परिसरात अलीकडच्या काळात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून यामुळे मात्र जळगाव जामोद पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरटे हे पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Maharashtra Live Update: भंडारा जिल्ह्यात झेडपीच्या 253 रस्त्यांचे बेहाल

भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे गेल्या 11 वर्षांपासून बेहाल आहेत. यंदा अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने सुमारे 253 रस्ते नुकसानग्रस्त ठरले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने (लेखाशीर्ष 3054-2911 अंतर्गत) 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित सभेत 43 कोटी 14 लाखांचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

Bhanadara : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू व गुटख्याचे सेवन करणाऱ्या 1052 जणांवर कारवाई

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी करण्यात आली आहे. मात्र तरीसुद्धा काही नागरिक व रुग्णांचे नातेवाईक गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन ठिकठिकाणी घाण करतात यावर उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांनी अशांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत 1052 जणांवर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे व बाळगलेल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 64 हजार 336 दंड वसूल करण्यात आला आहे. पंचनामेंती 60 किलो तंबाखूजन्य पदार्थ खड्डात पूरण्यात आले.

Maharashtra Live Update: सभापतीपदासाठी राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार

विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपचे राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या मध्ये लढत झाली होती

मात्र राम शिंदे याचा पराभव झाला त्यांनतर अजित पवार याच्यावर आरोप करण्यात आले होते

त्यामुळे भाजप कडून राम शिंदे सभापती पदाची संधी देण्यात आली

Maharashtra Live Update: राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या प्रतोदपदी चेतन तुपेंची निवड, लवकरच होणार घोषणा

Maharashtra Breaking Live Marathi Headlines : राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या प्रतोदपदी चेतन तुपेंची निवड करण्यात आली आहे. लवकरच घोषणा होणार आहे. यापूर्वी अनिल पाटील यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी होती. विधानसभा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या बैठकीत गटनेता म्हणून अजित पवारांची निवड झाली. फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळात अनिल पाटलांना संधी मिळाली नाही. यानंतर पक्षातील इतर नेत्यांना जबाबदारी द्या, अशी विनंती त्यांनी वरिष्ठांकडे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com