वरोरा येथे जिनिंगला आग, लाखोंचा कापूस राख
वरोरा येथील मारडा रोडवर असलेल्या 'रवीकमल जिनिंग'मध्ये आज दुपारी अचानक भीषण आग लागली.
या आगीत जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कापूस जळून राख झाला आहे.
दुपारी जिनिंगमध्ये कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते.
मात्र, अचानक कापसाच्या ढिगाऱ्यातून धूर निघू लागला. हवेमुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.
कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आगीची भीषणता एवढी होती की संपूर्ण परिसराला आगीने कवेत घेतले.
खेड तालुक्यातील राक्षेवाडील आणि मावळ तालुक्यातील उर्से परिसरात अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात ‘मे. मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम’ याच्याकडे हा साठा आढळून आला दरम्यान, सकल हिंदू समाज या संघटनेकडून सोशल मीडियावर पोस्ट करत हा फ्रुट जिहाद’ असा उल्लेख करत पोस्ट करण्यात आली असून, संबंधित व्यक्ती कमी पैशात मँगो पल्प विकत असल्यामागील उद्देशही या पोस्टमधून अधोरेखित करण्यात आला आहे.पोस्टमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
- नाशिकच्या ओझरमध्येही बांधकाम व्यावसायिकांच्या घरी ईडीचे पथक दाखल
- अशोक खरातशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या घरी ही ईडी आणि आयकर विभागाची अचानक छापेमारी
- भोंदू अशोक खरातच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी सुरू
- नाशिक शहरासह ग्रामीण भागात असलेल्या अशोक खरातच्या जमिनीच्या संदर्भातील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडी आणि आयकर विभागाचे पथक ओझरमध्ये दाखल
- भोंदू अशोक खरातची गाडी सीझ
- ईडीकडून खरातच्या सीझ होणाऱ्या आलिशान गाडीची किंमत तब्बल ८० लाख ते १ कोटीच्या रुपयांच्या घरात आहे
रायगडच्या इशाळ गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू
रायगडच्या खालापुर तालुक्यातील इर्शाळ वाडी येथील घटना
भिवंडी येथील आकाश वाघमोडे वय वर्ष 26 हा तरुण काल रविवारी इर्शाळगड येथे सोलो ट्रेकिंगसाठी आला होता
आकाश याची मोटर सायकल इर्शाळगडाच्या पायथ्याशी सापडली तर त्याचा संपर्क होत नव्हता
खालापुर पोलिस आणि खोपोली येथील हेल्प फाऊंडेशन यांनी सोमवारी शोध कार्य सुरु केले
इर्शाळगडाच्या दरीत आकाशाच मृतदेह सापडला
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मंगरुळ दस्तगीर मार्गावर भीषण अपघात..
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार शेख मुश्ताक शेख तुराब यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक इतकी तीव्र होती की, त्यांना घटनास्थळीच प्राण गमवावे लागले
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
हिंगोली सेनगाव महामार्गावर भीषण अपघात घडला आहे.
राहुल पाटी जवळ भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने पिकपला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे
या अपघाताच्या घटनेनंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे
दरम्यान हा अपघात इतका भीषण होता कि अपघातग्रस्त पिकप वाहन एका शेतात जाऊन पलटी झाले
या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे
नाशिकच्या मनमाड शहरात 14 एप्रिल निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सहात साजरी होत असते,
शहराच्या विविध भागातून 50 पेक्षा जास्त चित्ररथ आणि मोठी गर्दी या दरम्यान होत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार, उद्या सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजे पर्यंत इंदोर-मनमाड-पुणे या राज्य मार्गावरील रोज होणारी अवजड वाहतूक बंद
ही वाहतून अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
- नाशिकमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या
- नाशिकच्या विल्होळी परिसरात महिलेकडून एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या
- कोयत्याने वार करून हत्या, मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
- हत्येचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत चालला असून आज परभणी जिल्ह्यात उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. आज तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वाचण्यात आला निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढा. सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच धाराशिव येथील पदाधिकारी झाले आक्रमक झाले आहे.
मागील ११ तासांपासून भोंदू अशोक खरातच्या निवासस्थानी ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. भोंदू खरातने जमवलेल्या बेनामी संपत्ती, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून सखोल तपास सुरू केला आहे.
राजुरा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माणिकगड सिमेंट प्रकल्पाने जमीन बळकावून मोबदला दिला नसल्याचा आरोप करीत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव महापालिकेची निवडणुकीनंतरची पहिलीच स्थायी समितीची सभा पार पडली. भुयारी गटारी व मोबाईल टावर ची थकबाकी या विषयांवरून नगरसेवकांची महापालिकेच्या कारभारावर नाराजी. मोबाईल टावर ची कराची 28 कोटींची थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलावीत नगरसेवक नितीन लढ्ढा व नगरसेवक विष्णू भंगाळे यांची मागणी.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे, या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे,
शिरपूर पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचला असता संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दरम्यान पोलिसांनी केलेल्या अंगझडतीदरम्यान पवन कोतवाल याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते.
जालन्यातील 16 ऊसतोड मजुरांसह त्यांच्या चार मुलांची कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यातून जालना पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. जालना जिल्ह्यातील तीन गावातील 16 मजूर आणि त्यांची चार मुले ऊस तोडीसाठी कर्नाटक येथे गेले असता त्यांना तेथील कंत्राटदाराने डांबून ठेवलं होतं याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर जालना पोलिसांनी कर्नाटकच्या बिजापूर पोलिसांच्या मदतीने या मजुरांची सुखरूप सुटका केली असून हे मजूर जालन्यात दाखल झाल्याची माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे...
रत्नागिरी बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या
रुपेश नागवेकर असं युवकाचं नाव,
रुपेश नागवेकर रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यापारी
रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावातील घटना
राहत्या घरी बंदूकीतून गोळ्या झाडून घेत केली आत्महत्या
आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून रुपेश याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु
अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.. स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच ग्रामस्थांशी ते संवाद साधत आहेत.. आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाली.. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं.. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.. जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली.. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
‘गॉडमॅन’ अशोक खरात यांच्यावर ED ची मोठी कारवाई
PMLA कलम 17 अंतर्गत नाशिक, पुणे, शिर्डीत एकूण 11 ठिकाणी छापे
सरकारवाडा पोलिस ठाण्यातील FIR वरून कारवाई सुरू
खंडणी, धार्मिक फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप
तृतीय पक्षांच्या नावाने बोगस बँक खाती उघडल्याचा आरोप
दैवी शक्ती’च्या नावाखाली वस्तू विकून पैशांची उकळपट्टी
जमा पैसा जमिनीत गुंतवणूक; CA प्रकाश पोफळे यांची मदत संशयित
मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि आर्थिक पुरावे हाती लागण्याची शक्यता
पुण्यात लोणीकंद येथे महसूल अभियान समाधान शिबिराचा शुभारंभ
समाधान शिबिराचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत
लोणीकंद महसूल शिबिराला आमदार माउली कटके यांची दांडी
लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिराचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला शिरूर-हवेलीचे आमदार माउली कटके यांनी अनुपस्थित राहून दांडी मारल्याची चर्चा रंगली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या या शिबिरात विविध शासकीय विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल आला असून सकाळी ११ च्या सुमारास आला ईमेल आल्याची माहिती आहे
अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी
20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची SIT ची मागणी
रायता पुलावर अपघात झाल्याची माहिती
काळी पिली टॅक्सीला मिक्सर ट्रकने दिली धडक
अपघातात पाच ते सहा प्रवाशांचे मृत्यू झाल्याची टिटवाला पोलिसांची माहिती
पुण्यातील येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात स्वच्छता कंत्राटाच्या कामावरून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छता सेवा देणाऱ्या संस्थेकडून कामकाजात त्रुटी झाल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनाने संबंधित संस्थेला नोटीस बजावली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 32 हजार किलोचा मँगो पल्प चा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशोक खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार
पोलीस कोठडी संपल्यानंतर SIT खरातला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करणार
गर्भवती महिलेवर अत्याचार प्रकरणी आजपर्यंत खरातला होती पोलीस कोठडी
चौथ्या गुन्ह्यात पुन्हा ताबा मिळवण्यासाठी SIT न्यायालयात करणार अर्ज
सुनावणी दरम्यान न्यायालय काय निर्णय देणार? याकडं लक्ष
एप्रिलच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर आल्याने पाणीटंचाईची शक्यता.
उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या ५२.५४% पाणी, गेल्या वर्षापेक्षा किंचित सुधारणा.
७ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी फक्त ४७.५०% जलसाठा.
चंद्रभागा प्रकल्प ८५.४६% ने समाधानकारक, पण गर्गा प्रकल्प पूर्ण कोरडा.
बोर्डी नाला धरणात केवळ ४.७०% पाणी; लघु प्रकल्पांमुळे ग्रामीण पाणीपुरवठ्यावर धोका.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा जबाब घेतला जातोय
प्रतिभा चाकणकर या रूपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत
सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे विकलेल्या कांद्याला पंधराशे रुपये पर्यंत अनुदान द्यावे शासकीय मका खरेदी केंद्र बंद झालेले मका केंद्र खरेदी पुन्हा सुरू करावे अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाण जोश सह परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता . पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे विकलेल्या कांद्याला पंधराशे रुपये पर्यंत अनुदान द्यावे शासकीय मका खरेदी केंद्र बंद झालेले मका केंद्र खरेदी पुन्हा सुरू करावे अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाण जोश सह परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता . पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. अकोला बार्शीटाकळी रस्त्यावरील शिवापूर फाट्याजवळ ही जलवाहिनी फुटली आहेये.. विशेष म्हणजे, जलवाहिनी फुटल्यावर 80 ते 90 फुटांपर्यंत उंच असे पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळालेये.. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हे पाण्याचे फवारे उडत आहेत.. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया गेलेये.. याचा फटका अकोला शहराला बसण्याची शक्यता व्यक्त होत असून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा अंदाज व्यक्त होतोय..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाराज शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते.या कारवाईमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.आज हे सर्व कार्यकर्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकांपासून सुरू झालेली शिवसेनेतील गटबाजी आता पुन्हा तीव्र होताना दिसत आहे,यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर येथील तरुणीवर केलेल्या ऍसिड हल्ल्याला आता वेगळे वळण लागले आहे. कोणी अज्ञात आणि हल्ला केला नसून तो स्वतः तरुणीने ऍसिड हल्ला करून घेतल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे
घरातील कौटुंबिक वाद आणि घरातील कारणांमुळे नैराश्यातून तिने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे महादेवाची काठी यात्रा भरली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. साडेतीनशेहुन अधिक वर्षाची परंपरा या यात्रेला लाभली आहे.शिखर शिंगणापूर येथून 28 दिवसाचा पायी प्रवास करून पदयात्रा रविवारी सगरोळी येथे पोहोचली.या संपूर्ण प्रवासात 33 किलो वजनाची काठी खांद्यावर घेऊन वाहिली जाते.शिखर शिंगणापूरहून ही काठी पोहोचल्यानंतर यात्रेला सुरुवात होते.
पिकअप टेम्पो, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील तिन्ही वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत चार तरुणांना गंभीर दुखापत झाली स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, एक वाहन रॉंग साइडने येत असल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पालकांची सर्रासपणे लूट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित संस्था शाळेतूनच खुलेआमपणे शालेय साहित्याची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. शाळेतूनच वही, पुस्तक, स्कूल बॅग, युनिफॉर्म, यासह इतर साहित्याच्या नावाखाली या संस्थांनी शिक्षणाच व्यावसायिकरण केलं, दरम्यान या सगळ्या प्रकाराकडे शिक्षण विभाग कुठलीच कारवाई का करत नाही असा ही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे .
बातमी बीड मधून बीड शहरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका बालिका आश्रमातून दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही बाब उघडकीस आली, त्यानंतर आश्रम प्रशासनाने तातडीने शोध सुरू केला मात्र दोघींचा कुठेही मागमूस लागला नाही. नातेवाईकांनाही संपर्क साधून खात्री केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील यात्रेदरम्यान भाविकांना अडवून लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकलसह सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यात्रेच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांना टार्गेट करून ही टोळी चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून,यात्रेकरूंमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिस कोठडीच्या पहिल्या दोन दिवसांत पोलिसांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतीत असून आपण लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला झाल्याची माहिती तपास पथकातील सूत्रांनी दिली. खरात कोठडीत जास्त बोलत नाही, जेवणही कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. न्यायालयातील सुनावणी व्हिसीद्वारेच व्हावी, असे खरात अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहे. खरातला तपास अधिकाऱ्यांनी पत्नी कल्पना कुठे असेल? याबाबत पुन्हा पुन्हा विचारले असता देवालाच माहीत, असे उत्तर त्याने दिले. मात्र मुलगा हर्षवर्धन हा खरातचा घरात सर्वात लाडका आहे. त्यामुळे मुलाशी फोनवर बोलू देण्याची विनंती तो तपास यंत्रणांना करत असून मुलाची काळजी वाटते, असे तो वारंवार बोलून दाखवतोय, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.
लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या गंभीर पॉक्सो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी अचानक भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला पालकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर कठोर कारवाई होईल व आरोपीला कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेत एकूण १७७ विद्यार्थी असून त्यापैकी ८८ विद्यार्थिनी आहेत, मात्र एकही महिला शिक्षिका कार्यरत नसल्याचे समोर आले.
किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी,नाचकाम करणाऱ्या महिलांना ही मारहाण झाल्याचा आरोप तर मारहाणीत महिला ही जखमी
हातात कोयते रॉड तलवारी घेऊन घातला गोंधळ, महिलांच्या गळ्याला कोयते लावून रोख रक्कम व सोने नेहल्याचं तक्रारीत उल्लेख
महिलांना मारहाण करणाऱ्या तरुणांनी पूर्ण कला केंद्र टाकले फोडून
तर कला केंद्र चालवणाऱ्या येडशी गावातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केली म्हणून गावातील तरुण जाब विचारायला गेले असता कला केंद्र चालकांनी मारहाण केल्याचाही ही आरोप
जेवणाच्या आमंत्रणावरून जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधीच जेवणाला बोलावलं नाही.. कधी नाही ते, जयंत पाटलांनी जेवायला बोलावल्याने त्यांच्या घरी जेवण कसं असतं..ते बघायला आलो आहे.. आणि जेवणामुळे भाषण करायची वेळ आली, असं मिश्किल विधान खासदार विशाल पाटलांनी केलं.. तर विशाल पाटलांच्या विधानावरून आमदार विश्वजीत कदम यांनी देखील तुमचं जेवण झालं..आता पुढची बारी आमची असेल आणि आमचा पाहुणचार जोरात असतो..असे विधान केले. तर हे जेवण आपलं नाही,जिल्हा परिषद अध्यक्षांचा आहे.. पण आपलं जेवण नक्की देऊ,असा मिश्किल खुलास आमदार जयंत पाटलांनी यावेळी केला..त्यामुळे एकाच हशा पिकला.. सांगलीच्या कासेगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये या तिन्ही नेत्यांमध्ये ही टोली बाजी रंगली.
- तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला देण्यात आली होती ५ दिवसांची पोलीस कोठडी
- खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार
- मागील काही दिवसांपासून SIT कडून या प्रकरणाची कसून सुरूय चौकशी
- खरातने केलेले अनेक काळे कारनामे झाले आहेत उघड
- अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती
- SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती
- प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास
- प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय? याचा शोध सुरू
- काही प्रॉपर्टीजमध्ये पार्टनर का लावले? याचाही तपास
- सील केलेल्या बँक खात्यांवरील व्यवहारांचं देखील विश्लेषण सुरू
- नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- नाशिककर घामाघूम, दुपारी बाहेर पडणे कठीण, उकाडा आणि दमटपणामुळे नागरिक त्रस्त
- मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ
- पुढील 5 दिवस उष्णतेची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
- तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला देण्यात आली होती ५ दिवसांची पोलीस कोठडी
- खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार
- मागील काही दिवसांपासून SIT कडून या प्रकरणाची कसून सुरूय चौकशी
- खरातने केलेले अनेक काळे कारनामे झाले आहेत उघड
- धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय
- केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने प्रकरणाची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती
- संबंधित गुन्हा करण्यामागे संघटित प्रयत्न आहेत का? यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील आहे का? संशयितांना कुठून फंडिंग येत होत का? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती
- बड्या कॉर्पोरेट, IT क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय
- कंपनीचे अंतर्गत अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ईमेल, कॉल रेकॉर्डचीही तपासणी केली जात असल्याची माहिती
सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिधापत्रिकेवरून ब्रोकोल देण्याचा निर्णय घेतला आहे प्रति लिटर 62 रुपये या दराने हे रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे शासनाकडून कमी पुरवठा झाल्याने नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच या रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पीएमपीच्या सेवेचा दर्जा घालवल्याने प्रवाशांची पाठ फिरवली असून दरमहा तब्बल एक लाख फेरा रद्द होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे परिसर संस्थेने आयोजित केलेल्या विबिनार मध्ये 2025 च्या सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण केले असून यात पीएमपीच्या दुरावस्थेची चित्र स्पष्ट झाले आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.