Palghar MIDC Fire: पालघरमध्ये आणखी एका कारखान्यात भीषण स्फोट; आकाशात धुराचे लोट अन् लोकांची पळापळ

Palghar's Boisar Tarapur MIDC Blast : पालघरच्या एका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत ही भीषण दुर्घटना घडली आहे.
Palghar MIDC Fire: पालघरमध्ये आणखी एका कारखान्यात भीषण स्फोट; आकाशात धुराचे लोट अन् लोकांची पळापळ
Palghar's Tarapur MIDC BlastSaam TV

पालघर : पालघरच्या एमआयडीसीतील एका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत ही दुर्घटना घडली आहे. कारखान्यातील स्फोटानंतर आग सर्वत्र पसरली. आकाशात धुराचे लोट पसरले आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर परिसरात लोकांची गर्दी झाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. पालघरमधील एमआयडीसी प्लॉट क्रमांक एन जवळील कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

Palghar MIDC Fire: पालघरमध्ये आणखी एका कारखान्यात भीषण स्फोट; आकाशात धुराचे लोट अन् लोकांची पळापळ
Pubs and Bar Entry rules : मुंबई, पुण्यात बार-पब प्रवेशासाठी वयाचा पुरावा लागणार, काय आहे शासनाचा नवा नियम?

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियत्रंण मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले . काही तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Palghar MIDC Fire: पालघरमध्ये आणखी एका कारखान्यात भीषण स्फोट; आकाशात धुराचे लोट अन् लोकांची पळापळ
Viral Catch Video: लागली का पैज? असा झेल तुम्ही कधीच पाहिला नसेल ! Video पाहूनही बसणार नाही विश्वास

मुंबईतील भेंडी बाजारात रहिवाशी इमारतीला आग

मुंबईतील भेंडी बाजारातील परिसरात रहिवाशी इमारतीला आग लागली. भेंडी बाजारातील तीन मजली असलेल्या रहिवाशी इमारतीला ही भीषण आग लागली. आग लागल्यानंतर चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com