'नेहमी मलाच खर्रा का मागतो...?' वादातुन मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला

चित्रपटगृहात सिनेमा बघतांना खर्रा (मावा) मागणे एका मित्राला चांगलेच महागात पडले असून झालेल्या वादात मित्रानेच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे.
Bhandara Crime News, Bhandara News
Bhandara Crime News, Bhandara NewsSaam Tv

अभिजित घोरमारे

भंडारा: "नेहमी मलाच खर्रा का मागतो स्वतःच्या पैशाने घे" म्हणत मित्राने मित्राला चाकुने भोसकले आहे. चित्रपटगृहात सिनेमा बघतांना खर्रा (मावा) मागणे एका मित्राला चांगलेच महागात पडले असून झालेल्या वादात मित्रानेच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली आहे. (Bhandara Crime News)

विशाल विजय लिमजे (वय 28 रा. लाला लजपतराय वॉर्ड भंडारा असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी भारत गुलाब कंगाले (वय 30 रा. केसलवाडा ता. भंडारा) व सरोज शहारे या विरुद्ध भंडारा शहर पोलिसात (Bhandara Police) गुन्हा नोंद करत अटक केली आहे.

Bhandara Crime News, Bhandara News
मान्सूनचा लंपडाव सुरुच; राज्यात आता 'या' तारखेला आगमन

कामातून थोडी सवड मिळावी म्हणून जखमी विशाल आपल्या मित्रासोबत भंडारा शहरातील आदर्श टॉकीजमध्ये रात्री सिनेमा (Cinema) पहायला गेला होता. दरम्यान विशालने त्यावेळी बाजूला बसलेल्या भारत गुलाब कंगाले याला खर्रा मागितला. "नेहमी मलाच खर्रा मागतो स्वतःच्या पैशाने घे" असे भारत विशालला म्हणताच त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की या वादात भारत व त्याचा मित्र सरोज शहारे याने आपल्या जवळील चाकू काढून विशालच्या पोटावर तसेच छातीवरही सपासप वार केले.

हे देखील पाहा-

यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्वरित जखमी विशालने भंडारा शहर पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जखमी विशालला भंडारा सामान्य उपचारासाठी दाखल करत पोलिसांनी आरोपी भारत गुलाब कंगाले आणि सरोज शहारे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवित उशीरा रात्री अटक केली आहे. एका क्षुल्कक कारणाने घडलेल्या या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून तरुणात वाढलेल्या गुन्हेगारीने चिंतेत ही भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com