मन हेलवणारी घटना; १७ वर्षीय अल्पवयीन गर्भवती मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना जालन्यात उघडकीस आली
Jalna Crime
Jalna Crimeलक्ष्मण सोळुंके
Published On

जालना: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती करुन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना जालन्यात (Jalna) उघडकीस आली आहे. अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव शिवारात अर्जुन जाधव याचे शेतातील विहिरीत (Well) घडली आहे. अंबड पोलीसात (police) मयत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 376, 306 भादविसह कलम 3 व 4 बालकांचे लैंगिक अत्याचार कायदाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत सुरू केला आहे.

हे देखील पहा-

नेमके काय आहे प्रकरण

अंबड (Ambad) तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई- वडील हे ऊसतोडीच्या कामाकरीता बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा अल्पवयीन मुलगी ही तिचे २ भावासह ईश्वरनगर तांडा येथे राहत होती. दरम्यान अज्ञात आरोपीने (accused) तिला काही तरी आमिष दाखवुन किंवा तिच्या मनात भिती निर्माण केली व तिच्या सोबत लैंगिक संभोग करून ती ८ महिन्याची गर्भवती राहिली असता तिला जाणीव पुर्वक टाळल्याने तिला मरणाशिवाय पर्याय न उरल्याने तिने अज्ञात आरोपीच्या त्रासाला कंटाळुन 19 मार्च रोजी विहिरीतील पाण्यात उडी घेऊन जिव दिला आहे.

Jalna Crime
बेकायदा कर्ज प्रकरण: सांगली बँकेला नाबार्ड; सहकार आयुक्तांची नोटीस

अज्ञात आरोपीने तिला गर्भवती करुन आत्महत्येस प्रवृत केले आहे. त्यानंतर तिच्या प्रेतावर वैद्यकीय अधिकारी जालना यांनी शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पोटात आठ महिन्याचा स्त्री जातीचे बाळ असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अंबड पोलीसात मयत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 376, 306 भादविसह कलम 3 व 4 बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अंबड पोलीस तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com