बेकायदा कर्ज प्रकरण: सांगली बँकेला नाबार्ड; सहकार आयुक्तांची नोटीस

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड आणि सहकार आयुक्तांनी बेकायदा कर्ज प्रकरणी नोटीस (Notice) बजावली
Sangli
Sangli विजय पाटील
Published On

सांगली:  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड आणि सहकार आयुक्तांनी (Commissioner) बेकायदा कर्ज प्रकरणी नोटीस (Notice) बजावली आहे. राजकीय नेत्यांच्या संस्थांना तसेच अन्य बेकायदेशीर कर्ज प्रकरणावर झालेल्या तक्रारीबाबत बँकेला (bank) नोटीस बजावली गेली आहे. याबाबत ७ दिवसात खुलासा करण्याची सूचना ही दिली गेली आहे. बड्या नेत्यांची कर्ज बुडीत खात्यात वर्ग करण्याच्या व एक रकमी परतफेड योजना लागू करण्यावरून जिल्हा (District) बँकेबाबत सध्या तक्रारी सुरू आहेत.

हे देखील पहा-

बँकेचे संचालक मंडळ साखर कारखानदार (Sugar manufacturer) आणि काही नेत्यावर मेहेरनजर दाखवत असल्याचा आरोप विविध संघटनांकडून होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेने नुकतच आक्रमक आंदोलन देखील जिल्हा बँकेसमोर केले होते. त्यातच आता नाबार्ड व सहकार आयुक्तांच्या नोटीसीमुळे जिल्हा बँकेच्या संचालक व प्रशासनासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी जिल्हा बँकेत बेकायदेशीर कर्ज प्रकरणाविषयी तक्रार केली होती.

Sangli
चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक; डीजीसीएचा मोठा निर्णय

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने अनेक कारखानदार संस्थांना बेकायदा कर्जपुरवठा केला असल्याची तसेच बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील यांनी अनेकवेळा बेकायदा कामे केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक शासन आणि संचालक मंडळास ही नोटीस बजावली आहे. सहकार आयुक्त यांनी देखील बँकेतील तक्रारीविषयी बँकेला विचारणा केली आहे. याविषयी लेखी खुलासा करण्याच्या सूचना बँकेला दिले गेले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com