Badlapur Crime News: बदलापूरमध्ये धक्कादायक घटना; कचरा वेचणाऱ्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

१९ नोव्हेंबर रोजी मुलगा बदलापूर रेल्वे स्थानकात बाटल्या वेचत असताना त्याला आरपीएफ पोलिसांनी पकडून चौकीत नेलं.
Badlapur Crime News
Badlapur Crime NewsSaam TV
Published On: 

Badlapur Crime News: बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचणाऱ्या तरुणाला आरपीएफच्या दोन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीत तरुणाचा चेहरा सुजला असून त्याच्या कानात पू झाला आहे. त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी या तरुणाने केली आहे. (Latest Marathi News)

१७ वर्षीय मुलगा उल्हासनगरच्या शाहू महाराज उड्डाणपुणाखाली वास्तव्याला असून तो निराधार आहे. तो बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचण्याचं काम करतो. १९ नोव्हेंबर रोजी तो बदलापूर रेल्वे स्थानकात बाटल्या वेचत असताना आरपीएफ पोलीस जी. पी. भारद्वाज आणि विवेक कटियार या दोघांनी त्याला पकडून चौकीत नेलं. तिथे तू भंगार चोरून कुणाला विकतो? अशी विचारणा करत त्याला बेदम मारहाण केली. यावेळी चेतन कश्यप याने आपण भंगार (Scrap) नव्हे, तर फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्या वेचतो, असं पोलिसांना सांगितलं.

मात्र तरीही पोलिसांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली, असा चेतनचा आरोप आहे. यानंतर त्याला शुद्ध आल्यावर तो तिथून निघून उल्हासनगरला आला. मात्र त्याचा कान दुखत असल्यानं त्यानं रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी त्याला मेमो आणण्यास सांगितलं. मात्र कोणतंही पोलीस स्टेशन त्याला मेमो देत नसल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा शिंदे यांच्या मदतीने त्याच्यावर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

Badlapur Crime News
Latur Crime News:लातूरमध्ये चोरांचा सुळसुळाट; घरफोडीमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मारहाणीमुळे त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणात सुजल्याने डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली असता त्याच्या उजव्या कानाजवळ मोठ्या प्रमाणात पू झाल्याचं समोर आलं. तसंच शस्त्रक्रिया हाच यावर एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर चेतन कश्यप याने आरपीएफच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मारहाण करणारे आरपीएफ जवान जी. पी. भारद्वाज आणि विवेक कटियार या दोघांवर कारवाई अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Badlapur Crime News
Crime News : वडिलांच्या खुनाचा काढला वचपा, कारने त्यांना चिरडले; नऊ जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकाराबाबत बदलापूर आरपीएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कॅमेरासमोर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. मात्र या प्रकारामुळे पोलिसांची क्षुल्लक कारणावरून करण्यात आलेली मारहाण एखाद्यासाठी किती जीवघेणी ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.