चंद्रपूर शहरात 99 इमारती धोकादायक

मनपाकडून प्रत्येक पावसाळ्यात यातील बहुतांशी इमारतींना नोटीस देऊन सतर्क केले जाते.
चंद्रपूर शहरात 99 इमारती धोकादायक
चंद्रपूर शहरात 99 इमारती धोकादायकसंजय तुमराम
Published On

चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे चांदपुरातील Chandrpur धोकादायक इमारती Building केव्हाही कोसळू शकतात. अशा 99 इमारती चंद्रपूर शहरात असून त्या त्वरित रिकाम्या कराव्या, यासाठी महापालिकेने सर्व मालमत्ताधारकांना नोटीस Notice बजावल्या आहेत. शहरात एकूण तीन झोन असून, यात पहिल्या झोनमध्ये 42, दुसऱ्या झोनमध्ये 35 आणि झोन तीनमध्ये 22 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची सद्यस्थिती आणि वय लक्षात घेऊन या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनपाकडून प्रत्येक पावसाळ्यात यातील बहुतांशी इमारतींना नोटीस देऊन सतर्क केले जाते.

हे देखील पहा -

मात्र लोकं धोका पत्करून अशा इमारतींमध्ये वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. या धोकादायक इमारतींमध्ये बहुमजली अपार्टमेंट, वैयक्तिक घरे आणि काही व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. या 99 इमारतींमध्ये अतिधोकादायक असलेल्या काही इमारती येत्या दोन दिवसात खाली करण्याची तंबी महापालिकेने नोटिशीत दिली आहे. तसे न केल्यास महापालिका बळजबरीने या इमारती रिकाम्या करणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com