Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमधील बालगृहातून ९ मुली पळून गेल्याची घटना घडली होती. या ९ मुलींना सापडल्या असून त्यांच्या चौकशीतून धक्कादायक कारण समोर आले. या गंभीर प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगाने दखल घेतली.
Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
Sambhajinagar News Saam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी देखरेख बालगृहातून ९ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. मानसिक छळाला कंटाळून या मुली पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

गंभीर त्रुटीमुळे तातडीने कारवाईची आवश्यकता असल्याच्या त्यांनी सूचना केल्या. निष्पक्ष, कालबद्ध चौकशी, बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. पीडितांचे त्वरित पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी डीजीपींना पत्र पाठवण्यात आले आहे.

मानसिक छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून ९ मुली पळून गेल्या होत्या. राज्यात गाजलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली आहे. या विषयावर येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले.

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
Sambhajinagar : एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीला व्हीआयपी वागणूक, बिर्याणी देणे पडले महागात; ३ कर्मचाऱ्याचे निलंबन

विद्यार्थी बालगृहातून ३० जूनला ९ मुली पळून गेल्या होत्या. त्याच दिवशी दामिनी पथकाला सात मुली सापडल्या. दुसऱ्या दिवशी आठवी मुलगी आणि दोन दिवसांपूर्वी नववी मुलगी सापडली. घटनेला ८ दिवस उलटले तरी याविषयी अजूनही कुणावरही कारवाई झाली नाही. मात्र, या प्रकरणावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली.

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरख्याचा वाद पेटला; तरुणांचा पीइएस कॉलेजमध्ये गोंधळ

या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. उपायुक्त (बाल विकास) राहुल मोरे (पुणे) या समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, राहुल मोरे आणि त्यांचे सहकारी संभाजीनगर शहरात दाखल झाले. त्यांनी विद्यादीप बालगृह, बालकल्याण समिती तसेच जिल्हा महिला बाल विकास विभागाची चौकशी केली. आता या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचे ठरेल.

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com