जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 807 कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 807 कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 807 कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपलीअभिजीत घोरमारे
Published On

भंडारा : कोरोना लसीचे लसीकरण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा भंडारा (Bhandara) जिल्हाधिकारी संदीप कदम याच्या आदेशाला जिल्ह्यातील विविध विभागातील 807 शासकीय (Govt) आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी केराची (Garbage) टोपली दाखविली असून या 807 कर्मचाऱ्यांनी (employees) अद्याप कोरोना (Corona) लसीकरण करून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या 100 टक्के लसीकरणाचे (Vaccination) उद्दिष्ठे पूर्तिसाठी त्यांचे कर्मचारी रोडा टाकत असल्याचे स्पष्ठ झाले असून दिव्याखाली अंधार म्हणन्याची वेळ आता आली आहे. अश्या 807 बहाद्दर कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई होणार असल्याचे सूत्रानुसार सांगण्यात येत आहे. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. नुकतेच भंडारा जिल्ह्याने राज्यात लसीकरणात आघाडी घेतली. मात्र, शंभर टक्के लसीकरणाचे उद्देश्य गाठन्यात प्रशासनाला अडचण येत आहे.

हे देखील पहा-

हिच बाब लक्षात घेता, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात करत अद्याप एकही डोस न घेतलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात मनाई करण्यात आली आहे. तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढण्यात येऊ नये, असे लेखी निर्देशही जारी करण्यात आले आहेत. 30 नोव्हेंबर पूर्वी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यावेळी दिले होते.

त्यावेळेस जिल्ह्यात 2154 शासकीय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण केल्याचे स्पष्ठ झाले. मात्र, या आदेशाला अनेक कर्मचाऱ्यांनी गांभीर्यने घेत आपले लसीकरण करून घेतलं असले तरी अद्याप 807 कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला पाठ फ़िरविली आहे. यामध्ये पोलिस विभागाचे 82, पंचायत राज्य विभागाचे 189, होमगार्ड 52, नगरपरिषद 62, ऑर्डिनेंस फैक्ट्री 359, महसूल विभागाचे 50, आर पी एफ 4, पोलिंगचे 1 आणि इतर 8 असे 807 कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाही.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 807 कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली
बालविवाह; 21 वर्षांचा नवरदेव अन् 9 वर्षांची नवरी, मोहोळमध्ये चौघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 95.50 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 65 टक्के आहे. तर जिल्ह्यात आता पर्यंत 60 हजार 107 रुग्ण आढळले आहेत. 58 हजार 973 कोरोना मुक्त झाले आहे, तर 1133 रुग्णाच्या बळी गेला आहे. जिल्ह्यामध्ये ही बळी संख्येची विदारकता लक्षात घेता अगोदरच काळजी घेण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. तरी स्वता प्रशासनातील लोक याला गंभीर्याने घेत नसल्याचे सामोर येत आहे.

यामुळे लसीकरण न घेतलेले कर्मचारी कोरोना विषाणुचे सुपर स्प्रेडर ठरणार आहेत. आता तर दक्षिण आफ्रिकेच्या ओमिक्रोन नामक घातक व्हेरिएंट जिल्हा नजिकच्या नागपुर जिल्ह्यामध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा प्रशासन कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लस घेतल्याने कोविडचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात होत असल्याची ओरडा जिल्हा प्रशासनाला कडून केली जात आहे. असे होत असतांना देखील तरीही कोरोना लसीकरण टोलावनाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता जिल्हा प्रशासनाच्या कड़क पावले उचलत शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रानुसार मिळत असल्याने आता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम याच्या भूमिकेकड़े लक्ष लागून राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com