Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत २६२ कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले: संजय राठोड

Sanjay Rathod News: जिल्ह्यात 69 हजार शेतकऱ्यांना 262 कोटींचे प्रोत्साहन वितरीत करण्यात आले आहे, असे मंत्री संजय राठोड म्हणाले आहेत.
Sanjay Rathod
Sanjay RathodSaam Tv
Published On

Yavatmal News:

शेती आपल्यासाठी अतिशय प्राधान्याचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात 69 हजार शेतकऱ्यांना 262 कोटींचे प्रोत्साहन वितरीत करण्यात आले आहे, असे मंत्री संजय राठोड म्हणाले आहेत.

प्रजासत्ताकदिनाचा मुख्य ध्वजारोहन समारंभ येथील समता मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी ध्वजारोहन केले. त्यावेळी शुभेच्छा देतांना ते असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Rathod
Weather Update: देशातील या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह पसरणार दाट धुक्याची चादर, हवामान विभागाने दिला इशारा

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील शुरविरांना अभिवादन केले. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. घटनाकारांनी अतिशय दुरदृष्टीने तयार केलेल्या राज्यघटनेचे हे फलीत आहे, असे राठोड म्हणाले. (Latest Marathi News)

जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच यावर्षी आतापर्यंत 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 2 हजार 126 कोटीचे पिककर्ज वाटप झाले आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच 3 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. गेल्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 2 लाख 55 हजार7 शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांची पिकविमा नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे.

Sanjay Rathod
Shinde Government: मराठा आरक्षणामुळं शेतकऱ्यांना शेतमाल थेट‌ मुंबईत‌ विकण्याची‌ मुभा, सरकारनं काढलं परिपत्रक

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन देखील मदत देते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला 238 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 19 हजार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वळविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळेच यावर्षी 567 शेतकऱ्यांनी 623 हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com