Buldhana Water Crisis : 300 गावांत पाण्याचे दुर्भिक्ष,साडेतीन लाख ग्रामस्थांचे हाल; धरणांतील पाणीसाठ्याने बुलढाणाकरांची चिंता वाढवली

Water Scaricty In Buldhana : पेन टाकळी, खडकपूर्णा आणि नळगंगा या तीन मोठ्या धरणात मिळून सरासरी 11.18 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
67 villages gets water from 71 tanker in buldhana
67 villages gets water from 71 tanker in buldhana Saam Tv
Published On

बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची पाण्याच्या थेंबासाठी होरपळ होत आहे. यामुळे लाखो जिल्हावासीयांना दमदार पावसाच्या प्रतिक्षा लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईने जिल्हावासी व जिल्हा प्रशासन यांची कठोर परीक्षा घेतली. मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील 290 गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. 67 गावांतील तब्बल 2 लाख 18 हजार 252 ग्रामस्थांना, शेतक-यांना आपली तहान व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केवळ टँकरचाच आधार राहिला आहे.

67 villages gets water from 71 tanker in buldhana
Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

या गावांना 71 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 223 गांवातील 259 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याबराेबरच 51 धरणांनी तळ गाठला आहे. तसेच जिल्ह्यातील 51 लहान मोठया सिंचन प्रकल्पात आता नाममात्र जलसाठा उपलब्ध आहे Edited By : Siddharth Latkar

67 villages gets water from 71 tanker in buldhana
काेल्हापुरात शेतक-यांचा माेर्चा, तुघलकी निर्णय मागे घ्या अन्यथा 6 जूननंतर आंदाेलनाची तीव्रता वाढविणार; सरकारला इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com