Jalna News: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कुटुंब मंदिरात आरतीत मग्न; खेळता खेळता चिमुकल्याचा हौदात पडून मृत्यू

Jalna News: भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी परिसरात हे स्वामी समर्थ केंद्र आहे. काल रात्री आठच्या सुमारास घटना घडली आहे.
File Photos
File Photossaam tv
Published On

Jalna News: जालन्यातील स्वामी समर्थ केंद्राच्या आवरात असलेल्या गणपती विसर्जनाच्या हौदात पडून एका पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी परिसरात हे स्वामी समर्थ केंद्र आहे. काल रात्री आठच्या सुमारास घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

गणपती विसर्जनाच्या हौदात पडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.उदयन भाऊसाहेब लहाने असं पाच वर्षाची मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. लहाने कुटुंब रात्री आठच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्र आरती करण्यात मग्न होतं.

File Photos
Mumbai Crime News: मुंबई हादरली! आरे जंगलात रिक्षाचालकाचा प्रवासी महिलेवर अत्याचार; आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

क्षणात होत्याचं नव्हतं झालं

उदयन आणि त्याचा भाऊ विराज हा मंदिर परिसरात खेळत खेळत हौदाजवळ गेले. त्याचवेळी उदयनचा खेळता खेळता तोल गेल्याने हौदात तो पडला. या घटनेची माहिती विराज याने धावत येऊन मंदिरात येऊन सांगितली. मात्र त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही.

आरती संपल्यानंतर त्यांनी वडिलांना सर्व प्रकार सांगितल्या नंतर त्यांनी धाव घेऊन हौदात उडी घेऊन नागरिकांच्या मदतीने उदयन याला बाहेर काढले.

File Photos
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेला हव्या असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचा डोळा? अजित पवारांमुळे शिंदे गटाची कोंडी!

कुटुंबावर शोककळा

त्यानंतर उदयनला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केलं. उदयनच्या मृत्यूने शहरात एकच शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

उदयन यांचे वडील भोकरदन पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असल्याने तेथील पोलीस ठाणे परिसरातही शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com