Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेला हव्या असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचा डोळा? अजित पवारांमुळे शिंदे गटाची कोंडी!

Cabinet Expansion: शिवसेना शिंदे गटाला हव्या असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचा डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar NCP also wants ministry that Shinde group wants political crisis
Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar NCP also wants ministry that Shinde group wants political crisisSaam TV
Published On

Maharashtra Cabinet Expansion Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. लवकरात लवकर खातेवाटप व्हावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आग्रह धरला जात आहे, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाला हव्या असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचा डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar NCP also wants ministry that Shinde group wants political crisis
Maharashtra Politics: अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

अजित पवारांच्या गटाचा या खात्यांवर डोळा!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक यासारख्या खाती आपल्याकडे असावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश खाती सुद्धा शिंदे गटातील नेत्यांना हवी आहे.

त्याचबरोबर अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती देखील साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सर्वात आधी भाजपा आणि शिंदे गटातील राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) करावा आणि त्यानंतरच खाते वाटप करावा, असा सूर शिंदे गटातील आमदारांकडून पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar NCP also wants ministry that Shinde group wants political crisis
Breaking News: काँग्रेसचे अनेक आमदार अजितदादांच्या संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

शिंदे गटातील (Eknath Shinde Group Mla) आमदारांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. नाराजीचा सूर हा असाच राहिला, तर आणखी काही दिवस हा खाते वाटपाचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा तिसरा टप्पा पार पडणार असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

शिंदे सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केलं जाईल. येत्या १७ जुलैपासून महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. १७ जुलै ते १४ ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करुन खातेवाटप करण्याचा मानस शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा आहे.

Edited by - Sartish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com