Breaking News: काँग्रेसचे अनेक आमदार अजितदादांच्या संपर्कात, लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Political News: काँग्रेसचे काही नेते अजित पवार यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असं वक्तव्य अजित पवार गटाचे युती सरकारमधील मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे.
Congress Many  MLAs in touch with Ajit Pawar, Cabinet Minister Anil Patil sensational claim
Congress Many MLAs in touch with Ajit Pawar, Cabinet Minister Anil Patil sensational claimSaam Tv
Published On

Maharashtra Political News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजित पवार यांच्या प्रवेशामुळे युती सरकारचं बहुमत आणखीच मजबूत झालं आहे. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा ताजी असतानाच आता दुसरीकडे काँग्रेसचे देखील आमदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील बड्या नेत्याने याबाबतचे संकेत दिले आहेत.

Congress Many  MLAs in touch with Ajit Pawar, Cabinet Minister Anil Patil sensational claim
Uddhav Thackeray Speech : 'राज्यात एक फुल्ल दोन हाफ सरकार', उद्धव ठाकरेंचा भाजपसह राज्य सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे काही नेते अजित पवार यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असं वक्तव्य अजित पवार गटाचे युती सरकारमधील मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांचे पहिल्यांदाच जळगावात (Jalgaon) आले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर अनिल पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

Congress Many  MLAs in touch with Ajit Pawar, Cabinet Minister Anil Patil sensational claim
Ajit Pawar News: अर्थ खाते अजित पवार गटाकडे जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काय म्हणाले मंत्री अनिल पाटील?

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावर बोलताना मंत्री अनिल पाटील यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं. "काँग्रेसचे अनेक आमदार-खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार (Congress Mla) आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील", असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

'एकनाथ खडसे यांनी अजित दादांसोबत यावं'

एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत यावं, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणत्याही नेत्याला आम्ही तोच मान सन्मान देवू, असं अनिल पाटील म्हणाले. आमचं आवाहन आहे की गल्लीपासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत ज्यांना दादांसोबत काम करायचं आहे, जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहेत, त्यांच्याशीही आम्ही संपर्क करू, असंही मंत्री अनिल पाटील म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com