Yavatmal News : उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपसह , पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार निशाणा साधला.
सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक फुल्ल दोन हाफ अशी स्थिती आहे. आमचे सरकार होते तर ते तीन चाकाचे सरकार होते. यांचे सरकार लगेच आता त्रिशूळ सरकार झालं असल्याचं सांगतात. हे बेगडी सरकार चिरडून टाकण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही लढणार असाल तर मी पुढे चालणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्यावर आरोप करतात घरी बसलो होतो. मात्र घरी बसून महाराष्ट्र चालवला. माझं नेतृत्व हे तुम्ही ठरवणार नाही, जनता ठरवेल. मी काँग्रेससोबत, पण तुम्ही मला तिथे ढकलले. तुम्ही मुफ्ती मेहबुबा सोबत गेले, मग मी काँग्रेससोबत गेलो तर काय झाले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री संजय राठोडांवरही निशाणा साधला. 200 रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कुणी केलं. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत, असा टोला उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना लगावला. (Political News)
तसेच भाजप आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. अनेक नेत्यांना मोठ्या कष्टाने भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत.
सर्व पक्षातील बंडखोरांचा एकच मालिक आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र चार दिवसातच राष्ट्रवादी फुटली आणि बंडखोर भाजपसोबत गेले. मोदी म्हणाले राष्ट्रवादी भ्रष्ट आता त्याच नेत्यांसोबत मोदींचा फोटो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.