Sambhajinagar: पाणीप्रश्न पेटला! वैजापूर तालुक्यातील 5 गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Sambhajinagar Water Crisis : गेले 5 दिवस उलटून गेले तरी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होत वक्ती येथे आज (बुधवार) सकाळी कोरड्या पाटावर बादली मोर्चा धडकविला.
5 villages demanded water from nandur madhmeshwar or else will not cast vote in sambhajinagar constituency
5 villages demanded water from nandur madhmeshwar or else will not cast vote in sambhajinagar constituencySaam Digital

छत्रपती संभाजीनगर लाेकसभा मतदारसंघातील वैजापूर तालुक्यातील पाच गावातील ग्रामस्थांनी दाेन दिवसांत गावाला पाणी द्यावे अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा आज (बुधवार) प्रशासनास दिला आहे. त्यापूर्वी ग्रामस्थांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला हाेता. या माेर्चात माेठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या हाेत्या. (Maharashtra News)

गंगापूर वैजापूर तालुक्यातील 102 गावांची तहान भागावी म्हणून नांदूर मधमेश्वर पाटबंधारे कार्यालयाला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी करण्यात आली. यावर कुठलाही निर्णय न झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

5 villages demanded water from nandur madhmeshwar or else will not cast vote in sambhajinagar constituency
Nashik Crime: युवकाच्या खूनानंतर रोकडोबावाडीत उडाली एकच खळबळ, पाेलिसांचा रात्रीत फाैजफाटा दाखल

पाच दिवसांपूर्वी सुमारे दोन हजार नागरिकांनी नांदूर मधमेश्वर कालव्यावर डोक्यावर हांडे ठेवत आक्रोश मोर्चा काढला होता. हा मोर्चा नांदूर मधमेश्वर कार्यालयावर धडकला. मात्र सायंकाळ पर्यंत जबाबदार अधिकारी हे कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. यामुळे सायंकाळी मोर्चाचे साखळी उपोषणात रूपांतर करण्यात आले. यानंतर रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली मात्र तोडगा निघला नाही. यानंतर आंदोलकांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

5 दिवस उलटून गेले तरी अधिकाऱ्यांनी फिरकुन न बघितल्याने पुन्हा मंगळवारी एनएमसी कार्यालयावर आंदाेलकांनी हंडा मोर्चा धडकला. त्यातही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आक्रमक होत वक्ती येथे आज (बुधवार) सकाळी कोरड्या पाटावर बादली मोर्चा धडकविला. या प्रसंगी नागरिकांनी कोरड्या पाटात अंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी वक्ती, नांदूर ढोक, सावखेड गंगा, मुद्देश वाडगाव, सिरसगाव या पाच गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

5 villages demanded water from nandur madhmeshwar or else will not cast vote in sambhajinagar constituency
Baramati News : बारामतीत काल रात्री तिघांकडून गोळीबार, नागरिकांमध्ये घबराट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com