Beed News : मराठा आरक्षणासाठी तरूण शेतकऱ्यानं संपवलं जीवन; मृत्यूपूर्वी चिठ्ठीत सांगितल्या वेदना
Young Farmer Ends Life For Maratha Reservation :
आरक्षण मिळत नाही, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलांना शिक्षण देता येईना, असं चिठ्ठीत लिहून तरूण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथे ही घटना घडली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धर्मराज सखाराम डाके (वय ३८) असं मृताचं नाव आहे. धर्मराज डाके यानं घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
सरकार आरक्षण देत नाही. परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मराठा तरुणाने उचललं होतं टोकाचं पाऊल
काही दिवसांपूर्वी बीडमधील (Beed) एका मराठा तरूणानंही आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली होती. गावात कुणबी (Kunbi) नोंद न आढळल्यानं आम्हाला आरक्षण मिळणार नाही. आर्थिक परिस्थितीमुळं मुलालाही शिकवू शकत नाही, असं त्यानं मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं होतं. बाळासाहेब शेंडगे (वय 40) असं या तरूणाचं नाव होतं.
मागील महिन्यात परभणीतही दोघांच्या आत्महत्या
परभणीतही मागील महिन्यात दोन तरुणांनी आरक्षणासाठी मृत्यूला कवटाळलं होतं. गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील पवन भिसे या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. परभणी तालुक्यातील आर्वी येथे 36 वर्षीय सुनील कदम या तरुणानेही विषारी द्रव्य पिऊन जीवनयात्रा संपवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.