Triple Talaq Case: एकटीच मॉर्निंग वॉकला गेली, पतीला राग आला; फोनवरूनच दिला तलाक

31 year old husband gave triple talaq to his wife: पत्नी एकटी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीनं तिला तलाक दिला आहे. तिचा पती मुंबईतील कुर्ल्याला राहतो. तर पत्नी आपल्या माहेरी मुब्रा परिसरातील कौसा येथे आली होती.
Triple Talaq
triple talaqSaam Tv News
Published On

राज्यात घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. पण पत्नी एकटी फिरायला गेली, या कारणावरून कुणी घटस्फोट दिल्याचं ऐकिवात आहे का? ठाण्याच्या मु्ंब्रा परिसरात असाच काहीसा प्रकार घडला. पत्नी एकटी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीनं तिला तलाक दिला आहे. तिचा पती मुंबईतील कुर्ल्याला राहतो. तर पत्नी आपल्या माहेरी मुब्रा परिसरातील कौसा येथे आली होती. तिहेरी तलाकावर बंदी घालण्यात आली असली असून, पतीने पत्नीला तलाक दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२०१९ मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आलीय. मात्र, अनेक ठिकाणी तिहेरी तलाकच्या घटना घडत आहेत. मुंब्रा परिसरातही अशीच एक घटना समोर आली आहे. माहेरी आलेली पत्नी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तिला तलाक दिला. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Triple Talaq
Triple Talaq: धक्कादायक! बायकोला व्हॉट्सअॅपवर दिला तिहेरी तलाक; नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पत्नीच्या तक्रारीवरून, पोलिसांनी बुधवारी भारतीय दंड विधान कलम ३५१ (४) अंतर्गत मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायद्यानुसार एफआयआर नोंदवला. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी आरोपीला नोटीस देखील पाठवली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे म्हणाले, '२७ जानेवारी २०२४ साली दोघांचं लग्न झालं होतं. ती आपल्या पतीसह कुर्ला परिसरात राहत होती. गरोदर असल्यामुळे ती माहेरी मुंब्रामध्ये गेली होती. १० तारखेला मॉर्निंग वॉकला गेली असताना, तिला तिच्या पतीने फोन केला. कुठे आहेस अशी विचारणा त्याने केली. त्यावर तिने एकटीच मॉर्निंग वॉकला आले असल्याचं सांगितलं.

एकटी मॉर्निंग वॉकला गेले असल्याचे सांगितल्यावर पतीला राग आला. पतीने पत्नीला कुर्लाच्या घरात यायला सांगितलं. मात्र, अशा अवस्थेत असल्यामुळे मला जमणार नाही, असं तिने सांगितलं. तेव्हा त्याने फोन ठेवला. त्यानंतर, त्यानं पुन्हा कॉल केला आणि स्पीकरवर ठेवायला सांगितलं. घरी कोण कोण आहे, अशी विचारणा केली. तसंच पत्नीला तिहेरी तलाक देऊन फोन ठेवला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com